वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ५/८ पृ. १५-१७
  • वक्रदंत चिकित्सा—म्हणजे काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वक्रदंत चिकित्सा—म्हणजे काय?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दंतवैद्यकाची शाखा
  • वक्रदंत चिकित्सा नेमकी काय असते
  • एखाद्या व्यक्‍तीवर उपचार कधी केला जावा?
  • केवळ मुलांसाठी नव्हे
  • उपचाराचा कालावधी आणि त्याच्या पद्धती
  • तुम्हाला दातांच्या कवळीची आवश्‍यकता आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • तुम्ही दात खाता का?
    सावध राहा!—१९९८
  • दंतवैद्याकडे कागेलेपाहिजे?
    सावध राहा!—२००७
  • कोवळ्या दातांची काळजी
    सावध राहा!—२००१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ५/८ पृ. १५-१७

वक्रदंत चिकित्सा—म्हणजे काय?

तुमचे दात मोलाचे आहेत! खाताना आणि बोलताना त्यांची गरज असते आणि लोभस स्मितहास्य करताना किंवा हसतानाही ते आवश्‍यक असतात.

वाकड्या दातांमुळे अन्‍नाचे चर्वण करायला अडचण होऊ शकते, हिरड्यांचा रोग होऊ शकतो, आणि बोलण्यातील बिघाडांनाही ते कारणीभूत ठरू शकतात. तज्ज्ञांना असेही दिसून आले आहे, की काहींच्या बाबतीत वाकडे दात एक सामाजिक अडथळा बनू शकतात कारण आपल्या दातांमुळे आपले हसणे खराब दिसते म्हणून ते स्वतःला मनमोकळेपणाने व्यक्‍त करत नाहीत.

तुमचे दात सरळ नसतील तर काय करता येते? तुमची मदत कोण करू शकते? कोणत्या वयात? कोणत्या प्रकारचा उपचार केला जाऊ शकतो? हा उपचार त्रासदायक असेल का? त्याची आवश्‍यकता असतेच का?

दंतवैद्यकाची शाखा

अशा समस्या हाताळणाऱ्‍या दंतवैद्यकाच्या शाखेला वक्रदंत चिकित्सा म्हणतात. दंत दोष काढण्याचा इलाज यात केला जातो.

वक्रदंत चिकित्सेची मुख्य कार्ये कोणती आहेत? दोषांचे निदान करून त्यांवर प्रतिबंधात्मक इलाज करणे त्याचप्रमाणे दोषनिवारक उपकरणे लावणे यांचा त्यात समावेश होतो.

एकावर एक आलेले, अनियमित आणि पुढे आलेले दात या समस्या प्राचीन काळाच्या लोकांनाही होत्या आणि त्यांच्यावर चिकित्सा करण्याच्या प्रयत्नांचा सा. यु. पू. आठव्या शतकापर्यंत तरी मागमूस लावता येतो. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, ग्रीक आणि एट्रुस्कन पुराणवस्तु संशोधनांत उत्तम रचनेचे प्राचीन वक्रदंत चिकित्सेचे दंतचाप मिळाले आहेत.

आज, जगाच्या बहुतांश भागांमध्ये, वक्रदंत चिकित्सक म्हटले जाणारे खास दंतवैद्य वाकड्या दातांच्या दोषांवर उपचार करतात. याकरता, दात आणि जबड्यांची त्याचप्रमाणे आजूबाजूच्या स्नायुंची आणि ऊतकांची वाढ व विकास यांची त्यांना उत्तम माहिती असावी लागते.

वक्रदंत चिकित्सा नेमकी काय असते

वक्रदंत चिकित्सेची व्याख्या, “दात व चेहऱ्‍याच्या विकास होणाऱ्‍या आणि विकसित रचनांवर देखरेख, मार्गदर्शन आणि दोष निवारण करणारा दंतवैद्यकाचा भाग” अशी करता येईल. त्यामध्ये, “दातांमधील आणि दात व चेहऱ्‍याच्या हाडांमधील संबंधात ताण देऊन बदल करणे आणि/किंवा मस्तिष्क व चेहऱ्‍याच्या संरचनेतील कार्य उद्दीपित करणे आणि पुन्हा प्रस्थापित करणे” हे सामील होते. ही झाली पारिभाषिक व्याख्या पण ती अचूक आहे.

यास्तव, वक्रदंत चिकित्सेत, दातांवर किंवा त्यांच्या आजूबाजूच्या रचनांवर ताण दिला जातो. हे सर्व, प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट समस्यांचा दोष काढून टाकणाऱ्‍या खास त्याच्यासाठीच बनवलेल्या उपकरणांद्वारे, दात आणि हाडे देखील योग्य स्थानात सरकवण्याद्वारे केले जाते.

दातांच्या भोवतीच्या अस्थीत, अस्थिभंजक कोशिका आणि दुसऱ्‍या अस्थिजनक कोशिका असतात. दंतचापांनी निर्माण होणाऱ्‍या ताणामुळे जेथे ताण असतो तेथे अस्थिभंजक कोशिकांचे कार्य सुरू होते आणि अस्थिऊतक फोडले जाते. आकुंचन असलेल्या भागांमध्ये, ती फट अस्थिजनकांद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्‍या नवीन अस्थीने भरण्यात येते. अशातऱ्‍हेने दात हळूहळू सरकू लागतात.

कित्येक महिने तार, राळ आणि कदाचित इलॅस्टिकची अशी बाह्‍य वस्तू तोंडात ठेवणे असोयीस्कर नसते का? ही उपकरणे बसवली जातात किंवा त्यांच्यात बदल केला जातो तेव्हा सुरवातीला थोडीफार अस्वस्थता तर होतेच; परंतु काही काळानंतर त्याची सवय होऊन जाते. तसे पाहिले तर शास्त्रानुसार, दंतचाप घालण्याची सवय कोणीही लावून घेऊ शकतो.

एखाद्या व्यक्‍तीवर उपचार कधी केला जावा?

मुलांमध्ये चर्वण विकृती किंवा वरच्या आणि खालच्या दातांच्या कमानी एकमेकांशी नीट न टेकणे असे सूचित करणाऱ्‍या सर्वच स्थिती प्रौढपणीही तशाच राहतील असे काही नाही. काही प्रकारचे वाकडे दात आपोआपच ठीक होतात. खरे तर, पहिले किंवा दुधाचे दात पडून जेव्हा कायमचे दात येतात तेव्हा हे कायमचे दात समोरच्या बाजूला एकावर एक असे येतात कारण दुधाच्या दातांपेक्षा हे जरासे मोठे असतात.

तथापि, पहिल्या दाढा पडून कायमच्या दाढा येतात तेव्हा दातांच्या तुलनात्मक स्थितीत बदल होतो. वापराने आणि स्नायुंच्या रचनेमुळे दात आपोआप सरळ होतील. म्हणून तुम्ही पालक असाल, तर तुमच्या मुलांचे कायमचे दात सुरवातीला वाकडे-तिकडे येऊ लागतात तेव्हा घाबरून जाऊ नका. त्यासाठी काही करण्याची गरज आहे का हे एखादा वक्रदंत चिकित्सक ठरवू शकेल.

अल्पवयीन रुग्णांवर उपचार केव्हा करावा यावर वक्रदंत चिकित्सकांचे एकमत नाही. काहींच्या मते अगदी लहान वयातच (४-६ वर्षांचे असताना) करावे. इतरांच्या मते, विकास पूर्ण होतेवेळी अर्थात पौगंडावस्थेत (१२-१५ वर्षांचे असताना) करावे. तथापि, इतरजण मधलाच काळ योग्य आहे असे म्हणतात.

केवळ मुलांसाठी नव्हे

परंतु, वक्रदंत चिकित्सा ही केवळ मुलांसाठीच नाही. वाकड्या दातांमुळे प्रौढपणीही पुष्कळ समस्या उद्‌भवू शकतात. तुमचे दात आणि दातांच्या अवतीभोवतीच्या संरचना बळकट असतील तर वयाचे कोणतेही बंधन नसून तुमचे स्मितहास्य सुधारता येते.

वाकड्या दातांमुळे कोणते दोष उद्‌भवतात? निदान तीन प्रकारचे दोष तरी असतात: (१) स्वरूपाशी संबंधित असलेले दोष; (२) क्रियेत दोष, जबडा हलवताना अडचण (वेदना आणि स्नायूंमध्ये सहकार्य नसणे), चर्वण दोष आणि स्पष्टोच्चार आणि बोलण्यात दोष; (३) दात पुढे आलेले असल्याने इजा होण्याची अधिक शक्यता, शिवाय दंतबंधन विकृती (हिरड्यांचा रोग) आणि दात किडणे त्याचप्रमाणे दातांच्या कमानी एकमेकांवर नीट टेकत नसल्याने दात झिजणे व कमी होणे यांची दाट शक्यता.

या शिवाय, काही तज्ज्ञ, दंतचर्वणविकृतीचा संबंध मणक्यातील रचनेसंबंधी (खासकरून मानेच्या भागातील) समस्या तसेच शरीराच्या इतर भागातील स्नायुंच्या कार्यशीलतेतील दोष यांसोबत लावतात. पण उपचार कसा केला जातो? आणि तो किती काळ टिकतो?

उपचाराचा कालावधी आणि त्याच्या पद्धती

तुम्हाला किंवा तुमच्या एखाद्या मुलाला वक्रदंत चिकित्सकाची गरज भासल्यास, विश्‍वासाचा एखादा चिकित्सक निवडा. उपचाराचा कालावधी समस्येपरत्वे आणि वापरण्यात येणाऱ्‍या तंत्रापरत्वे निरनिराळा असेल, पण त्याचा परिणाम पुष्कळ महिने किंवा वर्षांपर्यंत टिकेल.

सुलभतेसाठी उपचार उपकरणांचे दोन गटांमध्ये विभाजन करता येऊ शकते: काढता येणारी उपकरणे आणि कायमची बसवलेली उपकरणे. काढता येणारी उपकरणे रुग्ण स्वतः काढू शकतो परंतु, कायमची बसवलेली उपकरणे अक्षरशः दातांवर बसवली जातात आणि त्यांमुळे अधिक क्लिष्ट दंत हालचाली करता येतात.

संशोधनाने सौंदर्यशास्त्रात बरीच प्रगती केली असल्याने आज अनेक “नैसर्गिक दिसणारी” उपकरणे आहेत. काही उपकरणे दाताच्या रंगाची असल्यामुळे ती दिसत नाहीत आणि इतर आतून, ज्याला लिंग्वल पोझिशन म्हणतात अर्थात जिभेच्या बाजूला बसवली गेल्याने ती सुद्धा दिसत नाहीत. अशा तंत्रांना अदृश्‍य वक्रदंत चिकित्सा म्हणतात.

अत्यंत क्लिष्ट केसेसमध्ये, दंतचापांनी जेव्हा वक्रदंत चिकित्सकाला अपेक्षित परिणाम मिळवता येत नाही तेव्हा तोंड आणि चेहऱ्‍यांच्या समस्यांचे तज्ज्ञ असलेल्या शल्यचिकित्सकाची मदतही तो कदाचित घेईल. चेहऱ्‍याच्या संरचनेतील अस्थी चक्क सरकवण्याची शस्त्रक्रिया तो करू शकतो.

आज, वक्रदंत चिकित्सेच्या साहाय्याने दात आणि जबड्यासंबंधी समस्या असलेल्या अनेकांच्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात; हसताना आपले दात खराब दिसतात अशी जाणीव ज्यांना असते त्यांची निकोप स्मितहास्य असण्याची इच्छा देखील पूर्ण केली जाते. अर्थात, वक्रदंत चिकित्सेचा उपयोग करावा की नाही हा एक व्यक्‍तिगत निर्णय आहे.

सध्या तरी, मानवजातीला शारीरिक विकृतींना तोंड द्यावे लागते; यांतील काही विकृती दोषनिवारक पद्धतींनी काढता येऊ शकतात. तथापि, देवाच्या नवीन जगात तो संपूर्णतः आणि हमेशासाठी अपरिपूर्णतेचे त्याचप्रमाणे तोंडाचेही सर्व दोष काढून टाकील त्या काळाची आपण वाट पाहू शकतो. तेव्हा, परिपूर्ण आरोग्याच्या त्या नवीन व्यवस्थेत, आपल्यातील प्रत्येकजण आपल्याला भेटणाऱ्‍या प्रत्येकाला आत्मविश्‍वासाने प्रेमळ, मैत्रिपूर्ण स्मित करू शकेल.

त्या समयाविषयी बायबल भाकीत करते: “सर्व पृथ्वी विश्राम पावली आहे, शांत झाली आहे. लोक गाण्याचा गजर करीत आहेत.” (यशया १४:७) निश्‍चितच, अशा आनंदाच्या आणि हर्षाच्या जोडीला लोभस स्मितहास्य देखील असेल!

[१५ पानांवरील चित्र]

दाखवण्यात आलेले दंतचाप पुढील कारणांसाठी बनवले आहेत (१) दाढा मागे सरकवण्यासाठी आणि (२) जबड्यांचा विकास घडवण्यासाठी

१

२

[१६ पानांवरील चित्र]

दंतकमानी एकमेकांशी संलग्न करण्यासाठी बनवलेले दंतचाप

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा