वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ४/८ पृ. १४
  • तुम्ही दात खाता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही दात खाता का?
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला दातांच्या कवळीची आवश्‍यकता आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • वक्रदंत चिकित्सा—म्हणजे काय?
    सावध राहा!—१९९८
  • कोवळ्या दातांची काळजी
    सावध राहा!—२००१
  • दंतवैद्याकडे कागेलेपाहिजे?
    सावध राहा!—२००७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ४/८ पृ. १४

तुम्ही दात खाता का?

तणावाखाली असताना दात खाण्याचा प्रकार अगदी आदिम काळापासून आढळतो. क्रोध किंवा व्याकुळतेच्या संदर्भात बायबल देखील वारंवार दात खाण्याचा किंवा चावण्याचा उल्लेख करते. (ईयोब १६:९; मत्तय १३:४२, ५०) आजच्या क्रुद्ध, तणावग्रस्त जगात कोट्यवधी लोक तर अक्षरशः दात खातात; कित्येकांना तर कल्पनाही नसते की आपण दात खातो. पण यामुळे कदाचित हळूहळू त्यांच्या दातांची झीज होऊ शकते.

काही लोक दात खातात यामागचे कारण काय? ही कारणे गुंतागुंतीची असून अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीत. तथापि, काहींच्या बाबतीत मानसिक तणावच यासाठी प्रामुख्याने जबाबदार असल्याचे दिसून येते. युसी बर्क्ली वेलनेस लेटर यात सांगितल्याप्रमाणे: “सहसा दात खाणारे लोक वैवाहिक किंवा आर्थिक समस्या, वार्षिक परीक्षेची किंवा नोकरी हातातून जाण्याची भिती असल्याचे किंवा इतर कारणांमुळे तणावग्रस्त असल्याचे सांगतात.” वरचे आणि खालचे दात एकमेकांत नीट न बसणे, बरोबर झोप न होणे किंवा मद्यपान यांसारख्या गोष्टी देखील संभाव्य कारणांत किंवा जबाबदार ठरणाऱ्‍या बाबींत सामील केल्या जाऊ शकतात. म्हणूनच, वेलनेस लेटर यात सल्ला दिला होता की दात खाण्याची समस्या असणाऱ्‍या लोकांनी मद्याचे सेवन कमी करावे; झोपी जाण्यापूर्वी तणाव दूर करण्यासाठी साधे उपाय करावेत, उदाहरणार्थ गरम पाण्याने आंघोळ करावी; किंवा आपल्याला अस्वस्थ करणाऱ्‍या समस्यांविषयी एखाद्या मित्र/मैत्रिणीजवळ अथवा भरवशालायक सल्लागाराजवळ मन मोकळे करावे.

दिवसा कदाचित आपण दात खात आहोत किंवा ते एकमेकांवर घासत आहोत असे तुमच्या लक्षात येईलही. पण झोपेत आपण असे करतो किंवा नाही हे कसे कळेल? ब्रूक्सिझम या नावाने ओळखली जाणारी, दात खाण्याची गंभीर समस्या असल्यास, तुमचा दात खाण्याचा आवाज खोलीत झोपलेल्या इतरांना जागे करण्याइतका मोठा असू शकतो. जाग येते तेव्हा तुमचे डोके दुखत असते विशेषतः तुमच्या कपाळाच्या बाजूच्या भागांत, किंवा तुमच्या जबड्यातून टिकटिक असा आवाज येऊ शकतो.a दंतवैद्यांना तपासताना तुमचे दात खूप झिजल्याचे आढळेल. उपाय म्हणून ते तुम्हाला काही उपचारपद्धतींचा सल्ला देतील, उदाहरणार्थ रात्री दातांवर ठेवण्याचे एक साधन. अशाप्रकारचे माउथ गार्ड तुमचे दात खाणे थांबवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले नसले तरीसुद्धा, ते तुमच्या दातांचे आणखी नुकसान होण्यापासून बचाव करू शकतात. असो, फार घाबरण्याचे कारण नाही! तुम्ही अनावश्‍यक काळजी करण्याचे जसजसे कमी कराल, तसतसे तुमचे दात खाणे पण कमी होईल.

[तळटीप]

a आणखी माहितीकरता, सावध राहाच्या! (इंग्रजी) जून २२, १९९१ अंकातील, पृष्ठे २०-२ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा