वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ९/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • रेव्ह्स अनापायकारक मौज आहे का?
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ९/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

जगावरील दृष्टिक्षेप मी एक पत्रकार आहे आणि माझ्यासोबत काम करणाऱ्‍या अनेकांना “जगावरील दृष्टिक्षेप” हे सदर फार आवडते कारण त्यातून त्यांना काम करण्यासाठी कल्पना सुचतात. काही लेखांतून मलाही प्रेरणा मिळाली आहे असे म्हणण्यास मला वावगे वाटत नाही. तुमचे ट्रान्सलेटर आणि प्रुफरिडर विशेष प्रशंसनीय आहेत. भाषेचा इतका उच्च दर्जा सामान्य प्रसारमाध्यमातही पाहायला मिळत नाही.

जे. बी. चेचीया

काही वर्षांपूर्वी मी सावध राहा! नियतकालिक वाचण्यास सुरवात केली तेव्हा त्यातील “जगावरील दृष्टिक्षेप” हे सदर माझ्या इतक्या आवडीचे नव्हते. आता मात्र ते अतिशय माहितीवर्धक वाटते. खरे तर, जगातील अनेक घटना ज्या अद्याप टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या नाहीत त्यांची माहिती “जगावरील दृष्टिक्षेप” या सदरात देण्यात आली आहे. तुम्ही हे उत्तम काम असेच करत राहा!

आय. के. एम. सी., ब्राझील

समलैंगिकता मला जानेवारी ८, १९९८ चा सावध राहा! अंक मिळाला तेव्हा मी अगदी रोमांचित झाले. या नियतकालिकामध्ये “बायबलचा दृष्टिकोन: ख्रिश्‍चनांनी समलिंगींचा तिरस्कार करावा का?” हा लेख होता. या नाजूक विषयावर खूपच चांगले आणि संतुलित विचार मांडण्यात आले होते.

एल. डब्ल्यू., संयुक्‍त संस्थाने

कंटाळा मी माझ्या महिला-सुपरवायझरला “तुमच्या कामाचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?” (जानेवारी ८, १९९८) हा अंक दिला. लेख अगदी उत्तम असल्याचे तिने मला दुसऱ्‍या दिवशी सकाळी सांगितले. माझ्यासोबत काम करणाऱ्‍या काही लोकांनाही तिने तो लेख वाचण्यास दिला आणि त्या अंकाची एक प्रत दिवाणखान्यात ठेवली. तुमचा लेख अगदी समयोचित होता!

व्ही. एल., संयुक्‍त संस्थाने

या मनोरंजक माहितीसाठी मी तुमचे आभार मानते. मी १७ वर्षांची असून पूर्णवेळेची नोकरी करते. कामात गोडवा कसा निर्माण करावा, याबद्दल या लेखाने मला उत्तम मार्गदर्शन केले. तुमची आभारी आहे!

इ. ए., इटली

या लेखाबद्दल मी तुमचे फार फार आभार मानते. माझे ॲप्रन्टिसशीपचे हे दुसरे वर्ष चालू आहे आणि मी अगदी निराश असल्यामुळे माझे कामात काही केल्या लक्ष लागत नव्हते. कामात पुन्हा रस घेण्यास या लेखाने माझी मदत केली.

आय. एफ., जर्मनी

रेव्हस मी १९ वर्षांची असून टेक्नो संगीताचा मनमुराद आनंद लुटला आहे. पण, “तरुण लोक विचारतात . . . रेव्हस अनापायकारक मौज आहे का?” या लेखामुळे मला फार आनंद झाला. (जानेवारी ८, १९९८) अशाप्रकारच्या संगीताविषयी इतकी अचूक माहिती देणारा लेख मला पहिल्यांदाच वाचायला मिळाला. “रेव्हस खरोखर तुमच्यासाठी आहेत का?” या मथळ्याखाली असलेल्या माहितीबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानू इच्छिते. प्रश्‍नांच्या आणि शास्त्रवचनांच्या आधारे सरळ आणि तर्कसंगत निर्णय घेण्यास मला मदत मिळाली आहे.

ए. पी., स्लोवेनिया

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा