वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १/८ पृ. ८-९
  • जागतिक उपाय—शक्य आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जागतिक उपाय—शक्य आहे का?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भावी विजय
  • क्षयरोगाविरुद्ध एक नवीन पावित्रा
    सावध राहा!—१९९९
  • विजय आणि दुर्दशा
    सावध राहा!—१९९८
  • क्षयाचे पुन्हा आक्रमण!
    सावध राहा!—१९९६
  • प्राणघातक मिलाफ
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १/८ पृ. ८-९

जागतिक उपाय—शक्य आहे का?

क्षयरोग (टीबी) ही जागतिक समस्या असून तिच्यासाठी जागतिक उपायाची गरज आहे याविषयी तज्ज्ञांचे एकमत आहे. कोणताही देश एकट्याने टीबीवर नियंत्रण मिळवू शकत नाही, कारण कोट्यवधी लोक प्रत्येक आठवडी आंतरराष्ट्रीय सीमा पार करत असतात.

अनेकांचे असे मत आहे की, आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी श्रीमंत राष्ट्रांनी, ज्यांना टीबीचा सर्वात जास्त तडाखा बसतो अशा गरीब राष्ट्रांची मदत करण्यास हवी. डॉ. एरॉटॉ कोची म्हणतात त्यानुसार, “श्रीमंत राष्ट्रांमध्ये टीबीचे रणांगण निर्माण होण्याची पाळी येण्याआधी जर त्यांनी कमी विकसित देशांना मदत केली तर त्यात त्यांचेच हित आहे.”

पण, श्रीमंत राष्ट्रे अशा गोष्टींनी आणि समस्यांनी घेरलेले आहेत जी त्यांच्या मते अधिक तातडीची आहेत आणि म्हणून ते मदतीला धावून आलेले नाहीत. काही गरीब राष्ट्रे स्वतः आरोग्य निगेकडे दुर्लक्ष करतात आणि त्याऐवजी शस्त्रास्त्रांमध्ये आपला पैसा ओतत आहेत. १९९६ च्या मध्यापर्यंत जगातील टीबी रुग्णांपैकी केवळ १० टक्के रुग्णांवर डॉट्‌स कार्यक्रमातला उपचार करण्यात आला; इतक्या लहान संख्येने या साथीवर अटकाव करणे शक्य नाही.

डब्ल्यूएचओ निरीक्षिते: “टीबीविषयी माहिती आणि तो बरा करण्यासाठी स्वस्तातली औषधे तर दशकानुदशकांपासून अस्तित्वात आहेत. सध्या जगाला सत्ताधारी, प्रभावशाली आणि दयाळू लोकांकडून सबंध जगभर या औषधांचा परिणामकारकतेने उपयोग करण्याच्या दिशेने जोरदार प्रयत्नांची गरज आहे.”

भावी विजय

सत्ताधारी आणि प्रभावशाली मानवांवर आपण या समस्येचे निरसन करण्यासाठी आत्मविश्‍वासाने आशा लावून बसू शकतो का? बायबलच्या प्रेरित स्तोत्रकर्त्याने लिहिले: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” मग आपण कोणावर भरवसा ठेवू शकतो? तेच शास्त्रवचन पुढे म्हणते: “ज्याच्या साहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्‍वर ह्‍यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले.”—स्तोत्र १४६:३, ५, ६.

पृथ्वीचा रचनाकार आणि निर्माणकर्ता या नात्याने रोगराईचा नायनाट करण्यासाठी यहोवा देवाकडे शक्‍ती आणि बुद्धी देखील आहे. त्याच्याकडे दयाळुपणाचा गुण आहे का? आपल्या प्रेरित संदेष्ट्याद्वारे यहोवा अभिवचन देतो: “जसा कोणी आपली सेवाचाकरी करणाऱ्‍या पुत्रावर दया करितो तसा मी [आपल्या लोकांवर] दया करीन.”—मलाखी ३:१७.

बायबलच्या शेवटल्या अध्यायात प्रेषित योहानाला दिलेल्या दृष्टान्ताचे वर्णन दिले आहे. त्याने पाहिले की, ‘दर महिन्याला फळे देणारी बारा जातीची जीवनाची झाडे होती.’ ही लाक्षणिक झाडे आणि त्यांची फळे ईश्‍वरी तरतुदींना सूचित करतात जी आज्ञाधारक मानवांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्यासाठी शक्य करतील.—प्रकटीकरण २२:२.

पुढे योहानाने लिहिले: “त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.” ही लाक्षणिक पाने देवाकडील आशीर्वादांना सूचित करतात ज्यांमुळे मानव आध्यात्मिक त्याचप्रमाणे शारीरिकपणे रोगमुक्‍त केले जातील. म्हणून, आपण खात्री बाळगू शकतो की, देवाच्या धार्मिक नवीन जगात टीबीवर पूर्णतः आणि कायमचा विजय मिळवला जाईल.—प्रकटीकरण २१:३, ४.

[८, ९ पानांवरील चित्र]

मानवजातीला कायमचे बरे करण्याचे अभिवचन देव देतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा