वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १/८ पृ. ३२
  • त्याची शंका दूर झाली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्याची शंका दूर झाली
  • सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९८
g98 १/८ पृ. ३२

त्याची शंका दूर झाली

जमेकातील कॅरिबियन बेटावर, यहोवाच्या साक्षीदारांची एका मनुष्याशी गाठ पडली; हा मनुष्य देवाच्या अस्तित्वाबद्दल अतिशय साशंक तर होताच, शिवाय बायबल प्रेरित असल्याचेही त्याने साफ नाकबूल केले. तथापि, नाखुषीने त्याने शेवटी बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी) हे पुस्तक घेतले. यानंतर अनेकवेळा त्याला भेटी देण्यात आल्या: पण आपण बोलाविल्याशिवाय त्यांनी पुन्हा येऊ नये असे त्याने साक्षीदारांना शेवटी सांगून टाकले.

साक्षीदार सांगतात, “कित्येक महिन्यांनंतर, त्यानं स्वतःच फोन केला आणि अनेक प्रश्‍न विचारले. पण तरीही बायबलमध्ये दिलेल्या उत्तरांबद्दल त्याची वृत्ती अद्याप टीकात्मकच होती.”

काही काळानंतर, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक त्याला देण्यात आले आणि त्याच्यासोबत एक नियमित बायबल अभ्यासही सुरू करण्यात आला. थोड्याच समयानंतर त्याने असे उद्‌गार काढले: “आता मला समजलं, की असा अभ्यास इतका आवश्‍यक का आहे.” शिकत असलेल्या गोष्टींविषयी तो एवढा उत्साही होता, की आठवड्यातून दोन वेळा अभ्यास करण्याविषयी त्याने विचारले. लवकरच, ख्रिस्ती सभांनाही तो नियमितपणे उपस्थित राहू लागला.

बायबल—देवाचे वचन की मानवाचे? आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकांचा अभ्यास केल्यामुळे लक्षावधी लोकांचा विश्‍वास प्रबळ झाला आहे. तुम्हालाही ही पुस्तके हवी असल्यास अथवा तुमच्यासोबत कोणी गृह बायबल अभ्यास करावा अशी तुमची इच्छा असल्यास, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

पुस्तकाचे मुखपृष्ठ बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी): तिसऱ्‍या शतकातील भूर्जपत्र आणि एस्तेर पुस्तकाची हिब्रू गुंडाळी: The Trustees of the Chester Beatty Library, Dublin; थोर सिकंदरचा अर्धपुतळा: Musei Capitolini, Roma

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा