वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ६/८ पृ. ३१
  • देशांतर करण्याची किंमत मोजा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देशांतर करण्याची किंमत मोजा!
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही ‘मासेदोनियात जाऊ’ शकाल का?
    आमची राज्य सेवा—२०११
  • मी फॉरेनला जावं का?
    सावध राहा!—२०००
  • तुम्हीही एक नवीन भाषा शिकू शकता!
    सावध राहा!—२००७
  • विदेशी भाषा तुम्हाला शिकायची आहे का?
    सावध राहा!—२०००
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ६/८ पृ. ३१

देशांतर करण्याची किंमत मोजा!

दक्षिण आफ्रिकेमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

दुसऱ्‍या एखाद्या देशात स्थलांतर करण्याचा तुमचा विचार आहे का? त्याची किंमत तुम्ही मोजली आहे का? आम्ही केवळ आर्थिक किंमतीविषयीच बोलत नाही. कारण नाहीतरी, बहुतेक लोक आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता देशांतराचा निर्णय घेतात. दुसऱ्‍या ठिकाणी स्थलांतर झाल्यावर उघडकीस येणाऱ्‍या त्या अज्ञात किंमतींविषयी आम्ही बोलत आहोत. पण, तोपर्यंत मागे वळण्यास बराच उशीर झालेला असतो. खालील मुद्दे तुम्हाला धास्ती देण्याकरता नव्हे, पण विचार करण्यास योग्य असे आहेत:

“नवीन भाषा शिकण्याकरता नम्रता आणि परिश्रम यांची गरज आहे. लहान मुलांना देखील एखादी प्रौढ व्यक्‍ती विचित्र असल्यासारखी वाटते तेव्हा ती व्यक्‍ती अगदी नाउमेद होऊ शकते. नेहमी नेहमी होणाऱ्‍या चुकांवर दुसरे हसतात तेव्हा पुष्कळांच्या स्वाभिमानाला ठेच पोहंचू शकते. स्थानिक भाषा न येणाऱ्‍या परदेशीयांना, जीवनात अगदी असह्‍य एकटेपणा जाणवतो.”—रोजमेरी, जपानमधील एक मिशनरी.

कदाचित, आपल्याला पुरेसे भाषेचे ज्ञान आहे असे तुम्हाला वाटत असेल. पण मागून निराशा होऊ नये म्हणून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला त्या भाषेचे बऱ्‍यापैकी ज्ञान आहे याची खात्री तुम्हाला आहे का?

काही सदस्यांना जबरदस्तीने देशांतर करण्यास लावल्यामुळे याचा कुटुंबावर कोणता परिणाम होईल बरे? स्त्रियांचे मानसशास्त्र त्रैमासिक (इंग्रजी) हे नियतकालिक म्हणते, “[मेक्सिकोमधील] काही स्त्रियांना स्वतःला व्यक्‍त करायला वाव मिळाला नाही आणि त्यांना स्थलांतरण तर नकोच होते, शिवाय स्थलांतरानंतर त्यांना संयुक्‍त संस्थानांत राहण्याची देखील इच्छा नव्हती.” अशा परिस्थितींमध्ये, जबरदस्तीने देशांतर केल्यामुळे कुटुंबाच्या ऐक्याला इजा पोहंचू शकते. परंतु, घरातल्या कमावणाऱ्‍या पतीनेच देशांतर केले तर काय?

आफ्रिकेमधील लोकसंख्या, स्थलांतरण आणि नागरीकरण (इंग्रजी) या पुस्तकाने असा निष्कर्ष काढला की दक्षिण आफ्रिकेच्या एका मागासलेल्या देशात, ५० टक्क्यांपेक्षा जास्त “पुरुषमंडळी विशिष्ट वेळी घरी नसतात.” या गैरहजेरीमुळे कुटुंबामधील समाधान आणि स्थैर्याची भावना नष्ट होते. शिवाय, वैवाहिक जोडीदार अगदी सहजरित्या अनैतिकतेला बळी पडू शकतो. एखाद्या कुटुंबाने कोणताही निर्णय घेतला, मग त्यांनी स्थलांतर करण्याचे ठरवले अथवा नाही, तरी जेव्हा ते एकत्र राहण्याचे ठरवतात तेव्हा ते नेहमीच उत्तम. कौटुंबिक ऐक्य पैशाने कधीच विकत घेता येत नाही.

शिवाय, भेदभावाची मोठी समस्या तर आहेच. स्थलांतर केलेल्या एका भारतीय स्त्रीने म्हटले, “मी इंग्लंडमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतरच मला येथील ‘वर्णभेद’ पाहण्यास मिळाला. तो [अनुभव] अत्यंत भयंकर होता. मला त्यामुळे खरोखरच मोठा धक्का बसला. मला यासर्वांपासून दूर, माझ्या मायदेशी पुन्हा जावसं वाटलं.”—फसवा समभाव (इंग्रजी).

तर मग देशांतर करण्याआधी, स्वतःला विचारा: ‘यासाठी काही दुसरे पर्याय आहेत का? आपण घरीच काही तडजोड नाही का करू शकत? दुसऱ्‍या देशात स्थलांतर करणे खरोखरच लाभदायक ठरेल का?’ ते लाभदायक असू शकेल किंवा नसेलही, पण निर्णय घेण्याआधी येशूचा हा सल्ला लक्षात ठेवा: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?”—लूक १४:२८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा