वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ६/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९६
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
सावध राहा!—१९९७
g97 ६/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

संगणक खेळ मी १५ वर्षांचा असून, “तरुण लोक विचारतात . . . मी कॉम्प्युटर किंवा व्हिडिओ गेम खेळू शकतो का?” (सप्टेंबर ८, १९९६, इंग्रजी) या लेखाविषयी आपले आभार व्यक्‍त करू इच्छितो. खरोखरच, त्या खेळांची प्रतिकूल बाजू दाखवली गेली, आणि त्यामुळे ख्रिश्‍चनांना सकारात्मक व नकारात्मक पैलू तोलून पाहण्यास मदत होईल.

एफ. आर., इंडोनेशिया

मी १७ वर्षांचा आहे, आणि हिंसक संगणक खेळ मला फार आवडतात. याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं मला वाटलं पण मी या—खासकरून तुम्ही वर्णन केलेल्या हिंसक खेळांच्या आहारी गेलो. हिंसाचार आणि रक्‍तासंबंधीच्या सर्व संगणक डीस्क्स्‌चा मी नाश केला. त्याचा परिणाम काय झाला? मला खूपच बरे वाटते, आणि माझ्याजवळ आता अभ्यास करायला, शिकायला व यहोवा देवाबद्दल बोलायला भरपूर वेळ मिळतो.

एस. ए., ग्रीस

शरणार्थींचा पेचप्रसंग मी बुरुंडी येथील शरणार्थी आहे, आणि “शरणार्थींचा पेचप्रसंग—तो कधी संपेल का?” (सप्टेंबर ८, १९९६, इंग्रजी) या शृंखलेसाठी मी आपले आभार प्रदर्शित करू इच्छितो. याविषयाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन आणि प्राचीन काळामध्ये त्याच्या लोकांकडून शरणार्थींना प्रेमळ वागणूक देण्याची त्याने केलेली अपेक्षा जाणल्यावर मी खूपच प्रोत्साहित झालो. या लेखांसाठी मी तुमचे आभार मानतो; खरोखरच त्यांनी माझे सांत्वन केले.

डी. एम., केनिया

बस दुर्घटना “यहोवाच्या साहाय्याने दुर्घटनेचा सामना करणे” (सप्टेंबर ८, १९९६, इंग्रजी), हा लेख वाचताना मला रडू आवरता आले नाही, कारण तो लेख माझ्या अंतःकरणाला भिडला. माझ्या मैत्रिणीचा आणि माझा देखील अपघात झाला. गंभीर जखमांमुळे ती काही तासांनंतर मरण पावली. ती दगावली आणि मी वाचले यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये मला तीव्र दुःख आणि अपराधीपणाची भावना सहन करावी लागली. माझा भरवसा आहे की यहोवा माझ्या प्रिय मैत्रिणीची आठवण ठेवील. स्पेनच्या या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासाठीही मला सहानुभूती वाटते.

जे. टी., संयुक्‍त संस्थाने

तोतरे बोलणे “तोतऱ्‍यांची जिव्हा देखील बोलू लागेल,” (सप्टेंबर ८, १९९६, इंग्रजी) या लेखासाठी तुमचे आभार मानतो. पीटर कुंट यांच्या अनुभवाने मला अधिक बळकटी मिळाली. मी देखील तोतरे बोलतो. बायबल भाषण देण्याआधी, ते स्पष्टपणे देता यावे म्हणून मी नेहमी यहोवाकडे मदत मागतो.

एम. एम., इटली

जेव्हा मी २० वर्षांचा झालो तेव्हा इतरांशी आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या सभागृहाच्या व्यासपीठावरून बोलताना मला स्वतःला फारच जड जात होते. एखाद्या नेमणुकीनंतर, मी घामाघूम होऊन, मला कमालीचा थकवा जाणवत असे. अशी समस्या असताना देखील यहोवाची सेवा करणाऱ्‍या एखाद्या सहख्रिश्‍चनाचा अनुभव वाचणे खरोखरच किती प्रोत्साहनदायक आहे. यामुळे, सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास मला मदत मिळाली आहे.

एम. एस., जपान

हा अनुभव प्रकाशित केल्यामुळे मला तुमचे आभार व्यक्‍त करावेसे वाटले. लहानपणापासून मला देखील हीच समस्या होती. पीटरप्रमाणे मी देखील मंडळीमध्ये वडील या नात्याने सेवा करीत आहे, आणि माझ्या नेमणुका पूर्ण करण्यासाठी मला यहोवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहावे लागते. मी आता ईश्‍वरशासित सेवा प्रशाला संचालित करतो आणि त्यामध्ये इतरांशी कसे बोलावे यासंबंधी मदत करतो.

एन. ओ. एन., नायजेरिया

पाँपेई “पाँपेई—जेथे समय गतिहीन झाला” (ऑक्टोबर-डिसेंबर १९९६) हा तुमचा अलीकडील लेख मी वाचला आणि मला तो अतिशय आवडला. जणू तिथंच असल्यासारखं वाटत होतं! पण, एका मुद्याचे स्पष्टीकरण मिळाल्यास मला फार आवडेल. त्या लेखात असे म्हटले आहे की पाँपेईला भेट देणारा कोणीही “मका दळण्यासाठी असलेल्या चक्क्या” पाहू शकतो. मी चुकलो तर मला तसं सांगा, पण अमेरिकन खंडात वाढणारा मका युरोपियन लोकांना, ख्रिस्टोफर कोलंबसच्या दिवसापर्यंत माहीत नव्हता, हो ना?

आर. डी., संयुक्‍त संस्थाने

या विषयात आमच्यामुळे काही गोंधळ झाला असल्यास क्षमा असावी. “धान्य” दळण्यासाठी असलेल्या चक्क्या तेथे पाहायला मिळतात, असे आम्ही म्हणायला हवे होते. गंमत म्हणजे, ‘मका’ या इंग्रजी अर्थाच्या शब्दाचा अर्थ गहू किंवा ओटसारखे “कोणतेही खाण्यालायक धान्य,” असाही होतो.—संपादक.

लहानपणापासूनच मला प्राचीन इतिहासाबद्दल आर्कषण आहे. पाँपेईचा इतिहास मला नेहमीच आकर्षक वाटला आहे. हा लेख वाचल्यावर प्रत्यक्ष मीच त्या शहरात प्रवास करीत असल्यासारखे वाटले. केवढा अद्‌भुत अनुभव! पुष्कळशी नवीन माहिती मला यामधून प्राप्त झाली. आपल्या दिवसांमधील शेवटल्या काळासोबत केलेली तुलना देखील मला फार आवडली. मी भेट देऊ शकत नाही अशा ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे.

जे. एस. ए., ब्राझील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा