राहणीमानाकरता शैक्षणिक साहाय्य
आफ्रिकेतील झिंबाब्वे येथील एका प्राध्यापकाने असे सांगितले, की ते जिथे शिकवतात त्या न्यॉतसिमे कॉलेजात “राहणीमानाविषयी शिक्षण” हा विषय आहे. त्यांनी आपल्या कुटुंबातल्या समस्या सांगितल्या आणि त्या सोडवण्यात आपल्याला मदत हवी आहे असे कबूल केले.
त्यांच्या लग्नानंतर काय घडले याविषयी ते म्हणाले: “लग्न झाले न झाले तेवढ्यात समस्या निर्माण होऊ लागल्या आणि त्यामुळं आम्ही नोव्हेंबर १९८९ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.” इतर समस्याही होत्याच. त्यांनी लिहिले: “मी माझ्या आईचा थोरला मुलगा आहे; माझी आई माझ्या वडिलांची पहिली बायको होती. मी अध्यापक प्रशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात असताना माझे वडील वारले, आणि माझ्यावर १६ धाकट्या भावंडांची जबाबदारी येऊन पडली.”
यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केल्यावर या प्राध्यापकाला आपल्या कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत मिळाली. ते व त्यांची पत्नी आता एकत्रित राहतात व आनंदी आहेत. त्यांनी पुढे लिहिले: “मला आणि माझ्या पत्नीला आता या कष्टदायी अनुभवावरून कळालंय की, मानवाने देवाची मदत न घेता स्वतःहून आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात.” परंतु, आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कशी मदत करतात?
“तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे (इंग्रजी) हे पुस्तक आमच्या हेडमास्तरांनी आणि इतर शिक्षकांनी सुद्धा पाठ्यपुस्तक म्हणून वापरावं असं मी त्यांना सुचवलं,” असे ते लिहितात. “त्या सर्वांना ते मान्य झालं आणि शाळेनं माझ्याकडे ५६ पुस्तकं मागितली, जी मी शाळेला देऊ केली आहेत.”
तुम्हाला देखील या आकर्षक चित्रांकन असलेल्या ३२०-पृष्ठ शैक्षणिक साहाय्याचा निश्चितच पुष्कळ लाभ होईल. तुम्हाला त्याची प्रत हवी असल्यास, अथवा तुम्हाला मोफत गृह बायबल अभ्यास हवा असल्यास, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहून पाठवा.