स्त्रियांचे दीर्घायुष्य उत्तम प्रकारचे असेलच असे नाही
जगभरात, स्त्रिया उशिराने लग्न करू लागल्या आहेत, कमी मुले होऊ देताहेत आणि दीर्घायुषी आहेत. “स्त्रियांचे जीवन आता बदलत आहे,” असे वृत्त युनेस्को उगम (इंग्रजी) ही पत्रिका देते. सन १९७० आणि १९९० च्या काळादरम्यान, विकसित देशांत, स्त्रियांची आयुमर्यादा जन्मल्यानंतर चार वर्षांनी वाढली, तर विकसनशील देशांमध्ये जवळजवळ नऊ वर्षांनी वाढली आहे. “याचा अर्थ, विकसित देशांमध्ये, स्त्रिया पुरुषांपेक्षा सरासरी ६.५ वर्षे जास्त जगतात. विकसनशील राष्ट्रांमध्ये, लॅटिन अमेरिकेत आणि कॅरिबियनमध्ये पाच वर्षांचा फरक आहे, आफ्रिकेत ३.५ वर्षे तर आशिया आणि पॅसिफिकमध्ये तीन वर्षांचा फरक आहे.”
असे असले तरीसुद्धा, अनेक स्त्रियांच्या बाबतीत दीर्घायुष्य म्हणजे उत्तम प्रकारचे जीवन असेलच असे नाही. आपला ग्रह (इंग्रजी) हे संयुक्त राष्ट्रसंघाचे नियतकालिक म्हणते, की जगातील बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत पाहिल्यास, मूलभूत मानवी हक्क म्हणजे “त्यांच्या वाट्याला कधीच न आलेली दुधावरची साय आहे. ते चटणी-भाकर मिळवण्यातच समाधान मानतात.” पण, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते, हे मूलभूत हक्क देखील लाखो स्त्रियांना मिळत नाहीत, कारण जगातले बहुतांश निरक्षर, निर्वासित आणि गरीब लोक स्त्रियाच आहेत. युनेस्को उगम असा निष्कर्ष काढते, की सुधार झालेला असतानाही “स्त्रियांचे भवितव्य . . . भयाण वाटते.”