बायबलचा दृष्टिकोन
बायबलचा दृष्टिकोन मुलांना स्वतःचा धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे का?
बाळपणापासून किशोरावस्थेपर्यंत पालक आपल्या मुलाकरता निर्णय घेत असतात. त्याचवेळी, एखाद्या समंजस पालकाला लवचीक कधी असावे ते माहीत असते, अर्थात आपल्या मुलाच्या आवडीनिवडींचा ते विचार करतात.
तरीही, आपल्या मुलाला निवड करण्याविषयी केवढे स्वातंत्र्य द्यावे असे आव्हानच पालकांसमोर असेल. मुलांना योग्य निवड करता येते आणि थोड्याफार स्वातंत्र्याने त्यांना लाभ होतो हे खरे असले, तरी ते चुकीची निवड करू शकतात आणि स्वतःवर संकट ओढवून घेऊ शकतात हे देखील तितकेच खरे आहे.—२ राजे २:२३-२५; इफिसकर ६:१-३.
उदाहरणार्थ, पौष्टिक अन्नाऐवजी मुले बहुधा निकस अन्न पसंत करतात. ते असे का करतात? कारण लहान वयात स्वतःहून योग्य निर्णय घेणे त्यांना जमत नसते. तर अशा या परिस्थितीत, आपली मुले सरतेशेवटी पौष्टिक अन्न पसंत करतील अशी आशा धरून पालकांनी आपल्या मुलांना मनमर्जी करू देणे सुज्ञपणाचे असेल का? मुळीच नाही. त्याउलट, आपल्या मुलांच्या दीर्घकालीन कल्याणाबाबत विचार करून पालकांनी त्यांच्याकरता निवड केली पाहिजे.
यास्तव, अन्न, वस्त्र, वेषभूषा आणि नैतिकतेविषयी पालक अगदी यथार्थपणे आपल्या मुलांकरता निवड करतात. पण धर्माविषयी काय? याबाबतीतही पालकांनी निवड करावी का?
निवड
पालकांनी आपले धार्मिक विश्वास आपल्या मुलांवर थोपवू नयेत असा वाद काहीजण करतील. खरे म्हणजे, १६० वर्षांआधी, ख्रिस्ती विश्वास असल्याचा दावा करणाऱ्या काहींनी “मुले निवड करण्यास समर्थ होत नाहीत आणि निवड करण्यास ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कोणतेच धार्मिक संस्कार केले जाऊ नयेत नाहीतर दुसऱ्या पंथांविषयी त्यांच्या मनात दुजाभाव निर्माण होईल” अशा धारणेस प्रोत्साहन दिले.
तथापि, ही धारणा बायबलच्या दृष्टिकोनाच्या एकवाक्यतेत नाही. जन्मापासून मुलांवर धार्मिक विश्वास बिंबवण्याच्या महत्त्वावर बायबल जोर देते. नीतिसूत्रे २२:६ म्हणते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”
येथे ‘मूल’ असे भाषांतरित केलेल्या इब्री शब्दात बाळपणापासून किशोरावस्थेचा समावेश होतो. कोवळ्या वयातील शिक्षणाविषयी, अमेरिकेतील इलिनॉइस विद्यापीठाचे डॉ. जोसेफ एम. हंट म्हणतात: “पहिल्या चार अथवा पाच वर्षांमध्ये मुलाचा विकास वेगाने होत असतो त्यामुळे त्यात बदल केले जाऊ शकतात. . . . [त्याच्या] पहिल्या वाढदिवसाआधी, २० टक्के मूळ क्षमता विकसित होतात तर निम्म्या मूळ क्षमता चार वर्षे पूर्ण करण्याआधी विकसित होतात.” हा विचार उलट, मुलाला कोवळ्या वयातच पालकांनी सुज्ञ मार्गदर्शन देणे अर्थात त्याला देवाच्या मार्गांचे शिक्षण देणे जरूरीचे आहे, या बायबलच्या प्रेरित सल्लावर भर देतो.—अनुवाद ११:१८-२१.
मुलांनी यहोवाबद्दल प्रेम निर्माण करणे आवश्यक आहे हे देव-भीरू पालकांनी त्यांच्या मनात बिंबवावे असे मार्गदर्शन शास्त्रवचने देतात. अनुवाद ६:५-७ म्हणते: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीति कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” (तिरपे वळण आमचे.) “बिंबव” असे भाषांतरित केलेले इब्री क्रियापद, जणू शाणन दगडावर एखाद्या अवजारास धार लावणे अशी कल्पना देते. फक्त एकदोनदा पाते फिरवल्यावर काम होत नाही तर परिश्रमाने, पुनः-पुन्हा पाते फिरवावे लागते. द न्यू इंग्लिश बायबल इब्री क्रियापदाचा अनुवाद “पुनरुक्ती” असे करते. साध्या शब्दांत, “बिंबव” या शब्दावरून कायमची छाप असा अर्थ ध्वनित होतो.—पडताळा नीतिसूत्रे २७:१७.
यास्तव, ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांवर धार्मिक विश्वासांची छाप पाडण्याच्या आपल्या कर्तव्याला गंभीरपणे घ्यावे. आपल्या मुलांना स्वतः निवड करण्याची अनुमती देऊन ते यथायोग्यपणे ही जबाबदारी झटकून देऊ शकत नाहीत. यामध्ये आपल्या ‘बालकांना’ सभांना घेऊन जाणे देखील समाविष्ट होते. तेथे, शास्त्रवचनीय चर्चांकडे लक्ष दिल्याने आणि त्यांत सहभाग घेतल्याने संयुक्त कुटुंबाला मिळणाऱ्या आध्यात्मिक लाभाची कदर बाळगण्यासाठी पालक आपल्या मुलांसोबत बसून त्यांची मदत करू शकतात.—अनुवाद ३१:१२, १३; यशया ४८:१७-१९; २ तीमथ्य १:५; २ तीमथ्य ३:१५.
पालकीय जबाबदारी
एखादा खाद्यपदार्थ पौष्टिक आहे म्हणून मुलाने तो खाल्ला पाहिजे असे सांगितले म्हणजे मुलाला तो आवडेल असे नाही. म्हणून, मुलाला खाद्यपदार्थ आवडावा यासाठी हा आवश्यक आहार होता होईल तितका आकर्षक कसा बनवावा हे सुज्ञ आईला माहीत असते. तसेच, मुलाच्या पचन शक्तीनुसार ती जेवण बनवते.
त्याचप्रमाणे, सुरवातीला एखादे मूल धार्मिक शिक्षण नाकारेल आणि एखाद्या विषयावर कारणमीमांसा करण्याचा काही फायदा होत नाही असे पालकाला दिसून येईल. तथापि, बायबलचे मार्गदर्शन स्पष्ट आहे—की पालकांनी आपल्या मुलांना बाळपणापासून शिकवण्यासाठी आपल्या परीने सर्व प्रयत्न करावेत. यास्तव, सुज्ञ पालक, मुलाची पचन क्षमता लक्षात घेऊन त्याला आकर्षक वाटेल अशा पद्धतीने धार्मिक शिक्षण रुचकर बनवतील.
आपल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यास आपण बांधील आहोत असे प्रेमळ पालकांना प्रखरतेने जाणवेल आणि पुष्कळ प्रकरणांत पाहिल्यास, पालकांशिवाय मुलांच्या गरजा इतर कोणालाही चांगल्याप्रकारे माहीत नसतात. याच्या सुसंगतेत, बायबलनुसार शारीरिक तसेच आध्यात्मिक गरजा पुरवण्याची प्रमुख जबाबदारी पालकांवर असते—मुख्यतः पित्यावर. (इफिसकर ६:४) म्हणून, इतर कोणावर ही जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करून पालकांनी त्यातून मुक्त होता कामा नये. पुरवल्या जाणाऱ्या मदतीचा पालक फायदा घेऊ शकत असले तरीही ही मदत त्यांच्याकडून मिळणाऱ्या धार्मिक शिक्षणास केवळ पूरक ठरेल पण त्याची जागा घेणार नाही.—१ तीमथ्य ५:८.
प्रत्येक व्यक्ती, आपल्या जीवनात कोणत्या न कोणत्या क्षणी कोणते धार्मिक विश्वास बाळगावेत हे ठरवते. आपल्या मुलांवर कोवळ्या वयातच धार्मिक संस्कार करण्याची व्यक्तिगत जबाबदारी ख्रिस्ती पालकांनी स्वीकारली आणि रास्त तत्त्वांच्या आधारे त्यांना कारणमीमांसा करण्याची मदत करण्यात या वेळेचा उपयोग केला, तर मूल मोठे झाल्यावर जी निवड करील ती शक्यतो योग्यच निवड असेल.—२ इतिहास ३४:१, २; नीतिसूत्रे २:१-९.
[१४ पानांवरील चित्र]
The Doré Bible Illustrations/Dover Publications, Inc.