कुटुंब आणि मित्रपरिवाराकरता सांत्वन
मागच्या वर्षी जुलै १७ रोजी जेव्हा टीडब्लूए ८०० हे विमान, अटलांटिक महासागरात कोसळले तेव्हा त्यातून प्रवास करणारे सर्व २३० जीव मृत्यूच्या खाईत लोटले गेले. यात पेन्सिल्व्हानियाच्या ५,००० लोकसंख्या असलेल्या माँटुर्झविल नामक लहानशा नगरातील माध्यमिक शाळेचे १६ फ्रेंच विद्यार्थी आणि पाच प्रौढ देखरेखे समाविष्ट होते. ऑगस्ट १७ रोजी नगरातील स्मारक समारंभाचे वक्ते, न्यूयॉर्क शहराचे महापौर रूडॉल्फ जूलीऑनी यांनी म्हटले, की जर न्यूयॉर्क शहराच्या लोकसंख्येतील तितकेच टक्के लोक मरण पावले असते तर ३५,००० इतकी जीवित हानी झाली असती!
माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डॅन चॅन्लर यांना कित्येक विद्यार्थ्यांच्या अंत्यविधीत भाषण देण्यास विचारणा करण्यात आली होती. त्यांनी प्रकटीकरण २१:४ येथील बायबल अभिवचन उद्धृत केले जे म्हणते, की देवाच्या नवीन व्यवस्थीकरणात ‘मरण नसेल, शोक, रडणे व कष्टही नसेल.’ अशा दुर्घटना का घडत असतात याचे कारण सांगताना त्यांनी उपदेशक ९:११ याचा उल्लेख केला जे, “कालवश व दैववश” आपणा सर्वांवर ओढत असल्याचे सांगते. माध्यमिक शाळेतील आपल्या मुख्याध्यापकांचे हे सांत्वनपर शब्द ऐकून बहुतेक जण स्तिमित झाले.
अतिरिक्त मदतीकरता चॅन्लर यांनी, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी) हे ३२ पृष्ठांचे माहितीपत्रक व मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? ह्या हस्तपत्रिकेसारखी इतर प्रकाशने माध्यमिक शाळेत एका टेबलावर मांडून ठेवली. बायबल साहित्याच्या शेकडो प्रती स्वीकारण्यात आल्या व त्यांत दिलेल्या सांत्वनाकरता अनेकांनी आभार प्रदर्शित केले.
वर उल्लेखिलेले माहितीपत्रक आणि हस्तपत्रिका यांतून तुम्हालाही आवश्यक ते सांत्वन प्राप्त होऊ शकते. तुम्हाला या प्रत्येकाची एक प्रत अथवा एक मोफत बायबल अभ्यास हवा असल्यास कृपया Watch Tower, H-58, Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Courtesy of Williamsport Sun-Gazette
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Corey Sipkin/Sipa Press