तुमची श्रवणशक्ती जपा!
अलिकडेच, फ्रान्समध्ये घेतलेल्या ४०० युवकांच्या सर्वेक्षणाने, प्रत्येकी ५ जणांपैकी १ जण मंद श्रवणाने पीडित असल्याचे उघडकीस आणले. एका दशकापूर्वी केलेल्या एका साधर्म्य अभ्यासाने, प्रत्येकी १० युवकांपैकी केवळ १ जण अशा प्रकारच्या मंदीने पीडित असल्याचे दाखवून दिले. युवकांमधील श्रवण मंदीच्या या नाट्यमय वाढीसंबंधी, फ्रेंच नॅशनल ॲसेंब्लीने मागच्या वर्षी कार्य करून पर्सनल स्टेरिओंचे ध्वनी प्रमाण १०० डेसिबेलपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी आपले अनुमत जाहीर केले.
मंद श्रवणाचा बहुतांश दोष पर्सनल स्टेरिओंच्या हेडफोनपासून उत्पन्न होणाऱ्या जोरदार ध्वनी स्तरावर लादला जातो. कर्णवैद्य झॉन-पायर कॉव म्हणतात, की १०० डेसिबेलहून अधिक असलेल्या आवाजामुळे, केवळ काही तासांतच कायमस्वरूपी हानी पोहंचू शकते. ज्यावेळी आवाज ११५ डेसिबेलहून अधिक असतो तेव्हा अशा प्रकारची हानी होण्यास केवळ काही मिनिटेच पुरेशी असतात. एफएनएसी नामक एक अग्रेसर फ्रेंच इलेक्ट्रॉनिकचा किरकोळ विक्रेता म्हणतो, की त्यांच्या बहुतेक पर्सनल स्टेरिओंची ध्वनी क्षमता १०० डेसिबेलहून अधिक असते. काही पर्सनल स्टेरिओंची ध्वनी क्षमता तर १२६ डेसिबेल इतकी असते जी १०० डेसिबेल ध्वनीशक्तीपेक्षा ४०० पट अधिक आहे.
ख्रिस्टीयन मेयर बीश या फ्रेंच श्रवणतज्ज्ञानुसार पर्सनल स्टेरिओंपेक्षा रॉक कॉन्सट्र्स, अधिकतर युवकांना घातक ठरत असतील. वास्तविकतः, १८ वर्षांच्या वयोगटांतील सदृढ युवकांच्या तुलनेत रॉक कान्सट्र्सला नियमितपणे हजर राहणाऱ्यांचे श्रवण, लक्षणीयरित्या मंद झाले होते. तर मग, फ्रेंच नॅशनल ॲसेंब्लीचे प्रतिनिधी झॉन फ्रॉन्स्वा माटे यांनी, “आपण कर्णबधिर लोकांची एक पिढीच उत्पन्न करत आहोत” असा जो इशारा दिला त्यात काही एक नवल नाही.
यास्तव, आपली श्रवणशक्ती जपण्यासाठी: त्या आवाजावर लक्ष ठेवा!