वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ३/८ पृ. २४-२५
  • जलप्रलय सत्य अथवा दंतकथा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जलप्रलय सत्य अथवा दंतकथा?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वासार्ह तपशिले
  • अधिप्रमाणता प्रस्थापित
  • नोहा आणि जलप्रलय कल्पकथा नव्हे, तर सत्य घटना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • नोहाचा विश्‍वास जगाला दोषी ठरवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • नोहाची नोंदवही आपल्याकरता महत्त्वाची आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • नोहा—तो देवासमागमे चालला सर्वांकरता उद्‌बोधक
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ३/८ पृ. २४-२५

बायबलचा दृष्टिकोन

जलप्रलय सत्य अथवा दंतकथा?

‘सर्व प्राणी जोडीजोडीने नोहाकडे तारवात गेले.’—उत्पत्ति ७:८, ९.

नोहाच्या दिवसांतील जलप्रलयाबद्दल कोणी ऐकलेले नाही? कदाचित बालपणापासूनच तुम्ही ही गोष्ट ऐकली असावी. इतकेच काय, पण जलप्रलयाबद्दलच्या अधिक माहितीकरता तुम्ही एखाद्या स्थानिक ग्रंथालयात गेल्यास या विषयावर प्रौढांपेक्षा मुलांकरता अधिक पुस्तके लिहिली असल्याचे तुम्हाला दिसून येईल. यामुळेच, जलप्रलयाचा वृत्तान्त हा मुलांना झोपताना सांगितल्या जाणाऱ्‍या गोष्टींपैकी एक आहे असे तुम्हाला वाटेल. अनेकांना असे वाटते, की नोहाच्या जलप्रलयाचा वृत्तान्त व त्याबरोबर बायबलचा अधिकतर भाग केवळ एक दंतकथा किंवा फार फार तर मनुष्याद्वारे रचलेला एक नीतिपर धडा आहे.

आश्‍चर्याची बाब अशी, की आपले धार्मिक विश्‍वास बायबलवर आधारित असल्याचा दावा करणारे काहीजण देखील, जलप्रलय खरोखरच आला होता की नाही याबद्दल साशंक आहेत. कॅथोलिक पाळक एडवर्ड जे. मॅकलेन यांनी एकदा म्हटले, की नोहाच्या कथेचे विवरण इतिहास म्हणून नव्हे तर “एक लाक्षणिक अथवा साहित्यप्रकार” म्हणून केले जाण्यास हवे होते.

तथापि, बायबलमधील जलप्रलयाचा वृत्तान्त कदापि हकिकत नसलेला लाक्षणिक वृत्तान्त मानला जावा का? खुद्द बायबल ह्‍या दृष्टिकोनास पुष्टी देते का?

विश्‍वासार्ह तपशिले

सर्वात प्रथम, मोशेने उत्पत्तीच्या पुस्तकात नमूद केलेला अहवाल विचारात घ्या. त्याठिकाणी आपल्याला, पर्जन्यवृष्टी केव्हा सुरू झाली, तारू केव्हा स्थिरावले आणि पृथ्वीचा पृष्ठभाग केव्हा सुकला यांविषयीचे एक विशिष्ट वर्ष, महिना आणि दिवस आढळतो. (उत्पत्ति ७:११; ८:४, १३, १४) उत्पत्तीमध्ये इतरत्र, विशिष्ट अशा तारखा नोंदलेल्या नसल्या तरी ह्‍या तारखा या वास्तविकतेवर जोर देतात, की मोशेने या घटनेकडे एक वास्तविकता असल्याचे पाहिले. कित्येक दंतकथांचे सुरवातीचे नमुनेदार शब्द जसे की, “एकदा असे झाले . . ,” यांची आणि बायबलच्या उघड सत्यतेची तुलना करा.

दुसरे म्हणजे तारवाचेच उदाहरण विचारात घ्या. बायबल, सुमारे ४३७ फूट लांब असलेल्या एका पात्राचे वर्णन करते, ज्याची लांबी, उंचीपेक्षा १० पट आणि रुंदीपेक्षा ६ पट होती. (उत्पत्ति ६:१५) आता नोहा काही एक जहाज बनविणारा कारागिर नव्हता. शिवाय हे देखील लक्षात असू द्या, की ही ४,००० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे! तरीसुद्धा ते तारू अशा काही परिमाणांनिशी बांधले होते की तरंगते पात्र या नात्याने त्याच्या कार्याकरता ते अगदी योग्य होते. इतकेच काय तर संरचनात्मक मजबुती व स्थैर्याकरता आधुनिक नाविक वास्तुशास्त्रज्ञांनाही साधर्म्य गुणोत्तरे अनुकूल असल्याची आढळली आहेत. नोहाने तारू बांधण्यात किती वेळ खर्च केला याबद्दल बायबल विशिष्टपणे सांगत नसले तरी अहवालानुसार बांधणीकरता ५० ते ६० वर्षे लागली असावीत. (उत्पत्ति ५:३२; ७:६) ह्‍या गोष्टी, गिलगामेशच्या बाबेलोनी महाकाव्यातील सर्वज्ञात असलेल्या कथेच्या अगदी विरोधात आहेत. हे महाकाव्य, प्रत्येक बाजूला ६० मीटर असलेल्या एका अवाढव्य, विशोभित घनाकृतीचे वर्णन करते जे केवळ सात दिवसांत बांधण्यात आले होते. त्या बाबेलोनी आख्यायिकेच्या विषमतेत, बायबलमधील प्रलयाचा अहवाल त्याच्या अचुकतेवरील विश्‍वास मजबूत होतो.

उत्पत्तिच्या अहवालाव्यतिरिक्‍त, शास्त्रवचने नोहा अथवा विश्‍वव्याप्त प्रलयाचा दहा वेळा उल्लेख करतात. या संदर्भांनुसार, प्रेरित लेखकांनी जलप्रलयाला एक अस्सल इतिहास म्हणून लेखले की केवळ एक दंतकथा असल्याचे मानले?

अधिप्रमाणता प्रस्थापित

शास्त्रवचनांमध्ये, इस्राएल राष्ट्राच्या दोन वंशावळींत नोहाचा उल्लेख आढळतो, यातील दुसऱ्‍या वंशावळीचा शेवट येशू ख्रिस्तामध्ये होतो. (१ इतिहास १:४; लूक ३:३६) या वंशावळींचे संयोजक, एज्रा आणि लूक हे दोघेही कुशल इतिहासकार असून नोहा एक खरीखुरी व्यक्‍ती असल्याचा त्यांनी साहजिकच विश्‍वास बाळगला असावा.

बायबलमध्ये इतरत्र, धार्मिकता आणि विश्‍वासाचा पुरुष या नात्याने ऐतिहासिक पात्रांच्या यादीत नोहाचेही एक स्थान आहे. (यहेज्केल १४:१४, २०; इब्री लोकांस ११:७) बायबल लेखकांनी, आदर्श म्हणून एखाद्या पौराणिक व्यक्‍तीचा समावेश करणे यात काहीएक अर्थ असेल काय? नाही, कारण यामुळे बायबलचे वाचक असा एखादा निष्कर्ष काढण्यास प्रवृत्त होतील, की विश्‍वास मानवी सामर्थ्याच्या पलीकडील बाब असून केवळ कथापुस्तकांतील पात्रच त्यास प्रदर्शित करू शकतात. नोहाचे तसेच इतर विश्‍वासू स्त्रीपुरुषांचे नाव यादीत आहे कारण ते आपल्यासारखीच दौर्बल्ये व भावना असलेले मानव होते.—इब्री लोकांस १२:१; पडताळा याकोब ५:१७.

बाकीच्या शास्त्रवचनांत, नोहाच्या सभोवतालच्या विश्‍वासहीन पीढीवर देवाने आणलेल्या विनाशाच्या संदर्भात नोहाचा आणि जलप्रलयाचा उल्लेख करण्यात आला आहे. येशूने लूक १७:२६, २७ येथे केलेला प्रलयाचा उल्लेख विचारात घ्या: “नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतहि होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करीत होते व लग्न करून देत होते.”

येशू ख्रिस्त आपल्या पृथ्वीवरील जीवनापूर्वी स्वर्गात अस्तित्वात असल्यामुळे या घटनांचा तो एक प्रत्यक्ष साक्षी होता. (योहान ८:५८) जर प्रलय एक निव्वळ दंतकथा असती तर येशू एकतर असे ध्वनित करत होता, की त्याचे भविष्यातील अस्तित्व कल्पित होते अथवा तो खोटे बोलत होता. यांतील कोणताही निष्कर्ष इतर शास्त्रवचनांशी सुसंगत नाही. (१ पेत्र २:२२; २ पेत्र ३:३-७) यास्तव, व्यक्‍तिगत निरीक्षण केल्यामुळे येशू ख्रिस्ताने बायबलमधील विश्‍वव्यापी जलप्रलय हा एक अधिप्रमाणित इतिहास असल्याचा विश्‍वास बाळगला. खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता, हा निश्‍चितच एक सर्वात खात्रीदायक पुरावा आहे, की नोहाच्या दिवसांतील जलप्रलय दंतकथा नसून एक सत्य आहे.

[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]

L. Chapons/Illustrirte Familien-Bibel nach der deutschen Uebersetzung Dr. Martin Luthers

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा