पुरेसे पाणी राहील का?
“पृथ्वीवरील पाण्याच्या एकूण आकारमानातील केवळ २% पाणी गोड आहे व द्रवरूपात, गोड पाणी १% [पेक्षा कमी] वगळून शुद्ध पाणी म्हणून उपयोगी पडेल अशा पाण्याच्या साठ्यातील २/३, धृवप्रदेशीय व हिमनद कटिबंधात गोठलेले आहे.”—अनुसंधान व संशोधन (इंग्रजी), नॅशनल जीऑग्राफिक प्रकाशन.
तुमच्या घरात पिण्यालायक नळाचे पाणी आहे का? जर आहे तर तुम्ही अधिक नशीबवान लोकांपैकी आहात. कोट्यावधी लोकांना पाणी आणावयास बाहेर जावे लागते, पुष्कळदा अनेक किलोमीटर दुरून—व ते सुद्धा अनेकदा पिण्यालायक नसते. इतरांना सार्वजनिक नळ किंवा टँकर असतो तेथे या दुर्मिळ द्रवाची अपुरी शिधा आणावयास जावे लागते. अनुसंधान व संशोधन या प्रकाशनाने म्हटले: “जसजशी लोकसंख्या वाढत जाते तसतशा, पाण्याचा उपयोग व व्यवस्थेसंबंधी समस्या वाढतात. सुमारे १ अरब लोकांना पिण्यालायक पाणी मिळवणे आधीच कठीण किंवा अशक्य आहे अशा विकसनशील देशांमध्ये या समस्या सर्वाधिक बिकट आहेत.” याचा अर्थ असा होतो की जगाच्या लोकसंख्येतील जवळजवळ ५ पैकी १ व्यक्तीला, वापरण्यालायक पाणी मिळवण्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.
पाण्याच्या या टंचाईमुळे, भविष्यातील बिकट प्रश्नांचे बीज आधीच पेरण्यात आले आहेत. एका विशेषज्ञाने म्हटले: “बहुसंख्य लोक झोपडपट्ट्यांमध्येच अडकून पडतील जेथे दारिद्र्य, सांस्कृतिक बिघाड व जातीय संघर्ष यातून वर उठण्याचे प्रयत्न हे, पिण्यासाठी पाणी, मशागत करण्यासाठी जमीन, व जिवंत राहण्यासाठी जागेच्या कमतरतेमुळे निष्फळ होतील.”
या दुर्मिळ संपत्तीचा सुज्ञपणे वापर करण्यासाठी आम्ही व्यक्तिगतपणे काय करू शकतो? ते काटकसरीने व सांभाळून वापरा—ते बहुमोल व मर्यादित आहे.
१) पाणी वाया घालवू नका. गरज नसताना नळ वाहू देऊ नका—जसे दात घासताना किंवा दाढी करताना शॉवरखाली जास्त वेळ घालवू नका—हे गृहीत धरून की शॉवर असण्याइतके तुम्ही नशीबवान आहात!
२) पाणी प्रदूषित करू नका. तुम्ही राहता तेथून एक दूषित नदी किंवा झरा वाहत असल्यास, त्यात वरपासून कोणीतरी, तुमच्या वसाहतीसाठी असलेल्या एका अत्यावश्यक जीवनरक्षकाचा नाश करत आहे. पुष्कळवेळा या प्रदूषणाला, नगर अधिकारी, उद्योगपती, शेतकरी व झरे आणि नद्यांमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी व रासायनिक पदार्थ वाहू देणारे किंवा सोडून देणारे इतर लोक, जबाबदार असतात.
पृथ्वीचा निर्माता व मालक या नात्याने आम्ही आपल्या ग्रहाचा कशा प्रकारे उपयोग करतो याविषयी जाब विचारण्याचा देवाला, हक्क आहे. यहोवा खरोखर ‘पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करेल’ असे बायबल पूर्वभाकित करते.—प्रकटीकरण ११:१८.