वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 १०/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२०००
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९६
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९५
g95 १०/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

कंटाळवाणेपणा “तुमचे जीवन कंटाळवाणे आहे का? तुम्ही ते बदलू शकता!” (जानेवारी २२, १९९५), ही श्रृंखला मी नुकतीच वाचली व तिने मला किती मदत केली हे मला तुम्हाला सांगायचे आहे. मी कंटाळलो आहे असे मला कधीच वाटले नव्हते, पण माझ्या चाकोरीबद्ध नित्यक्रमामुळे मी माझ्या जीवनाबद्दल फार असंतुष्ट होतो. या लेखाने मला सर्व गोष्टींकडे पूर्णपणे नवीन दृष्टिकोनाने पाहण्यास लावले.

एस. वी., अमेरिका

नात्सीवादाचा प्रतिकार करणे “आम्ही हिटलरच्या युद्धास पाठिंबा दिला नाही” हा लेख माझ्या मनाला चाटून गेला. (ऑक्टोबर २२, १९९४) त्यात सहा ऑस्ट्रीयन बिशपांचे, नात्सीवादाला पाठिंबा देण्याच्या ‘विधीयुक्‍त घोषणेचे’ चित्र होते. त्या बिशपांपैकी एक तोच होता ज्याने मला १९२८ मध्ये मी जेसुईट विद्यार्थी असताना दीक्षा दिली होती. ख्रिस्ती विश्‍वासात खंबीर कसे राहावे हे स्वतःलाच माहीत नसलेल्याकडून मिळणाऱ्‍या ‘दीक्षेवर’ मला हसू येते! त्या युद्धाने कॅथलिक चर्चसोबत असलेले माझे संबंध संपुष्टात आणले. मी माझा मायदेशसुद्धा सोडला. मी माझ्या परीने युद्धाला विरोध करण्याचा प्रयत्न केला तरीदेखील, माझ्यामध्ये वूल्फहार्ट कुटुंबातील सदस्यांच्या ठिकाणी असलेले धाडस नव्हते. मला अजूनही दोन यहोवाचे साक्षीदार आठवतात ज्यांनी शस्त्रे उचलण्यास नकार दिला. त्यांना लगेच मारून टाकण्यात आले. मी अशा लोकांची प्रशंसा करतो.

पी. के., चिली

बाळाजवळ झोपणे जुलै २२, १९९४ च्या तुमच्या अंकात आम्ही डॉ. जेम्स मॅकेन्‍ना यांच्या संशोधनाचे वृत्त देणारा उतारा पाहिला. (“जगावरील दृष्टिक्षेप”) त्यात सुचवले होते की मातांचे त्यांच्या बाळांजवळ झोपणे सिड्‌स (सडन इन्फंट डेथ्‌ सिन्ड्रोम [तत्काळ शिशू मृत्यू विकार]) याचे प्रमाण कमी करील. न्यूझीलंड कॉट डेथ्‌ अभ्यासाने स्पष्ट केले आहे की बालके झोपली असताना पालकांच्या बिछान्यात असल्यास सिड्‌सचा धोका आणखीनच वाढतो.

डॉ. एस. एल. टी., न्यूझीलंड

या माहितीसाठी आभारी आहोत. डॉ. मकेन्‍ना यांनी अलीकडेच त्यांचे मत स्पष्ट केले व आई तिच्या बाळाजवळ झोपते तेव्हा, बालक अपघातीपणे गुदमरण्याचे धोके मान्य केले. (पडताळा १ राजे ३:१९.) याच कारणामुळे अनेक डॉक्टर बाळाजवळ झोपण्याचा सल्ला देत नाहीत व उशा आणि जाड रजया नसलेल्या मुलांच्या पलंगावर बाळाला झोपविण्यास सांगतात.—संपादक.

मधमाशी विरुद्ध संगणक “मधमाशी विरुद्ध संगणक” (फेब्रुवारी ८, १९९५) या लेखाबद्दल मला आभार व्यक्‍त करायलाच हवेत. हा लेख माझ्या अंतकरणाला भिडला. आपल्या महान निर्मात्याने माशीसारख्या इवल्याशा जिवालासुद्धा किती विस्मयकारक व अतुल्य असे घडविले आहे.

क. के., जर्मनी

ऑटिझम “ऑटिझम—गोंधळात पाडणाऱ्‍या विकृतीच्या आव्हानांना तोंड देणे” (फेब्रुवारी ८, १९९५) या लेखासाठी तुमचे आभार मानते. माझ्या मंडळीत ऑटिझम या विकृतीने ग्रस्त असलेला मुलगा आहे व मला त्याच्याबद्दल फार जिव्हाळा वाटू लागला आहे. या लेखाने मला ऑटिझम या विकृतीला समजून घेण्यास मदत केली. आता मला कळले की त्याच्यासोबत व त्याच्या आईसोबत केवळ वेळ घालवण्याकरवी देखील मी त्यांची मदत करू शकते.

ए. एफ., जपान

आमच्या मुलीला ऑटिझम नाही, पण तिच्यात त्यासारखी लक्षणे आहेत. अनेक मुलांना असलेल्या समस्यांविषयी तुम्ही लोकांना माहिती देता याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. लोक या मुलांना जीवन जगण्यालायक असलेले मानव म्हणून वागणूक देतात हे पाहणे प्रोत्साहक आहे. ‘मला तुझी कीव येते’ किंवा ‘तू करतेस ते मी कधीच करू शकणार नाही’ असे शेरे उभारणीकारक नसतात. आमची मुलगी आनंदी आहे व कधी कधी आमची इतर मुले आम्हाला त्रासदायक होतात. आम्हाला तिच्या जन्माबद्दल खेद वाटत नाही.

एल. एच., अमेरिका

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा