जेथे अनोळखी लोकांचे आदरातिथ्य केले जाते
सप्टेंबर १९९४ मध्ये, मिशिगन, अमेरिका, येथून एका मनुष्याने लेबनॉन, टेनेसी येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीला पत्र लिहिले. त्याने म्हटले:
“मी मागे एकदा रविवार, जून ६, १९९३ या तारखेला, तुमच्या जाहीर भाषणाला व टेहळणी बुरूज अभ्यासाला उपस्थित राहिलो. राज्य सभागृहात जाण्याची ती माझी पहिली वेळ होती व सर्वांचे हसरे चेहरे आणि माझ्याबद्दल दाखविण्यात आलेल्या प्रांजळ प्रीतीने मी प्रभावित झालो. मी काही मिनिटे उशिरा पोहंचलो, व आत प्रवेश केल्यानंतर मी एकटाच बसलो. त्याच ओळीत बसलेल्या एका तरुण जोडप्याने मला बायबल दिले व नंतर अभ्यासासाठी टेहळणी बुरूज नियतकालिकाची प्रतही दिली.
“सभा संपल्यानंतर तुमच्या लोकांपैकी जवळजवळ सगळेच माझ्यासोबत बोलले, माझ्याशी हस्तांदोलन केले व त्यांनी माझ्या मुक्कामास एक सुखद अनुभव बनवला. शेवटी मी तुमचे राज्य सभागृह सोडले तेव्हा सोबत तीन पुस्तके नेली—बायबल, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य व तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल. त्या रात्री मी अनंतकाल जगू शकाल पुस्तक पुष्कळसे वाचून काढले व माझ्या देवाचे नवीन नाव मी शिकलो, यहोवा. . . .
“पूर्णपणे अनोळखी व्यक्तींना तुम्ही दाखविलेल्या उल्लेखनीय आदरातिथ्याबद्दल मी किती कृतज्ञ आहे हे मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो व जुलै ९, १९९४ या दिवशी ७० वर्षांच्या या कोवळ्या वयात, माझा बाप्तिस्मा झाला हे मला विशेषतः तुम्हाला सांगावेसे वाटते.”
देवाची सेवा करण्यात आनंद मानतात अशांकडून स्नेहपूर्ण आदरातिथ्य अनुभवायचे असल्यास, कृपया, Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410401, Mah. India., किंवा पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर लिहा. ते तुम्हाला तुमच्या घराजवळील राज्य सभागृहाचा पत्ता देतील.