वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 १०/८ पृ. २१-२३
  • तुमच्या गरजा पूर्ण करणारे नकाशे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या गरजा पूर्ण करणारे नकाशे
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नकाशे—केव्हापासून व का?
  • नकाशा कसा वाचावा
  • प्रमाण, उंची व स्थान
  • संगणक युगामधील नकाशे
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०००
  • ‘हा देश फिरून पाहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • क७-क येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूच्या सेवाकार्याआधी घडलेल्या घटना
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • अतिरिक्‍त लेख ख
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
सावध राहा!—१९९५
g95 १०/८ पृ. २१-२३

तुमच्या गरजा पूर्ण करणारे नकाशे

ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

अपरिचित देश किंवा शहराभोवती तुमचा मार्ग शोधणे एक आव्हानच आहे. प्रथम, तुम्ही कोठे आहात हे तुम्हाला समजले पाहिजे. त्यानंतर, सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे ते ठरवा. तुम्ही तो कसा शोधून काढू शकता? तुम्हाला नकाशाची गरज आहे!

नकाशे—केव्हापासून व का?

नकाशे बनवणे किंवा नकाशाशास्त्र म्हटले जाते त्याचा दीर्घ व चढउताराचा इतिहास आहे. नकाशे बनवण्याचे काम ४,३०० वर्षांआधी सुरू झाल्याचा शोध काही अधिकारी लावतात; ते नकाशे बॅबिलोनियातील मातीच्या विटांवर दाखवलेले होते. परंतु, प्रारंभिक ग्रीकांनी नकाशे काढले जे आधुनिक नकाशांचे वाटाडे होते. सा. यु. दुसऱ्‍या शतकात, क्लॉडियस टॉलेमीने प्राचीन जगाचे नकाशे काढल्यावर, नकाशाशास्त्र मध्ययुगात कमी दर्जाचे झाले. अज्ञात ठिकाणे, अक्राळविक्राळ प्राणी व राक्षसांचा प्रदेश असल्याचे दाखवले गेले. धर्माचा नकाशांवर इतका पगडा होता की, अनेकांमध्ये जगावर एदेन बागेचे वर्चस्व असल्याचे दाखवले होते. तत्कालीन ज्ञात जगाच्या नकाशात जेरूसलेम व मध्यपूर्व वरील भागात दाखवण्यात येऊ लागली.

ब्रिटनच्या प्रारंभिक नकाशांमध्ये देखील धर्मोपदेशकांचा पगडा प्रतिबिंबित झाला. अशा एका नकाशामुळे, इंग्लंडच्या धार्मिक पवित्र स्थळी जाण्यासाठी यात्रेकरू जो मार्ग वापरत होते त्याचा शोध लागला. “यात्रेकरूचा उत्तरेकडील मुख्य रस्ता” याविषयी अधिक माहिती देताना, या नकाशाने डरहॅमच्या उत्तरेकडील शहरापासून डोवरच्या दक्षिणेच्या किनारपट्टीवरील बंदरापर्यंत एक मार्ग दाखवला.

गेरॉरडुस मर्केटर (१५१२-९४) आधुनिक नकाशाशास्त्राचा संशोधक होता. त्याने नकाशा प्रक्षेपणाची पद्धत तयार केली; ही अचूक असल्यामुळे जलपर्यटकांमध्ये प्रसिद्ध होती, व मर्केटर प्रक्षेपणानुसार काढलेले अनेक नकाशे आधुनिक ॲटलासमध्ये दिसून येतात.

नकाशे जमीनदारांकरता दान होते. स्पष्ट आखलेल्या सीमारेषांच्या संदर्भामुळे कायदेशीर झगडे मिटवण्यास मदत मिळाली. भाड्याने घेतलेल्या जमिनीच्या मुदतीच्या अचूक नोंदणीवर कराची आकारणी अवलंबून असल्यामुळे सरकारची नकाशांमधील आस्था वाढली.

आजकाल, नकाशे दररोजच्या गरजा पूर्ण करतात. ॲटलास, शाळकरी मुलांना भूगोलाचे घटक समजण्यास मदत करतात. तक्‍ते, हवामानशास्त्रज्ञांना चित्राच्या साहाय्याने हवामानाविषयी आपण काय अपेक्षा करू शकतो हे दर्शवण्यास मदत करतात. एखादा नकाशा आपल्याला सार्वजनिक वाहतुकीचा सर्वोत्तम उपयोग करण्यास मदत करू शकतो. तसेच कुटुंबाच्या सहलीकरता, नकाशा सर्वात नैसर्गिक देखाव्याचा मार्ग दाखवू शकतो.

विशेषज्ञांकडे दुर्लक्ष केले गेलेले नाही. नगर योजकांसाठी लोकसंख्येच्या दाटीचे नकाशे आहेत. नौकाभंगांचा व खनिज पदार्थांचा शोध लावणाऱ्‍यांकरता समुद्राच्या पात्राचे नकाशे मदत करतात. शोध न लागलेल्या वस्तूंचे उत्खनन करणाऱ्‍यांना पुराणवस्तूशास्त्राचे नकाशे मदतदायी ठरतात. एवढेच काय तर, अंतराळ संशोधकांकरता चंद्र व काही ग्रहांचे नकाशे देखील आहेत! नकाशांविषयी इतकी समृद्ध माहिती उपलब्ध असल्यामुळे, त्यांचे वाचन करण्यात तुमचे कौशल्य वाढवणे व सुधारणे तुमच्यासाठी फायदेकारक आहे.

नकाशा कसा वाचावा

तुमच्या नकाशातून अधिक फायदा मिळवणे हे एखादी परदेशी भाषा शिकण्याप्रमाणे आहे. तुम्ही दुसरी भाषा शिकता तेव्हा, तुमच्यासमोर नवीन शब्दसंग्रह व वेगळे व्याकरण असते. नकाशाच्या भाषेत, संकेतांना शब्दांप्रमाणे समजले जाऊ शकते, तर प्रमाणाच्या समोच्च रेषा व वृत्तांची जाळी व्याकरणाचे कार्य करतात. बहुतेक नकाशांमध्ये एक चौकोन असतो व त्यामध्ये नकाशात उपयोगात आणलेल्या संकेतांचे स्पष्टीकरण असते. हे शब्दकोशाप्रमाणे संकेतांचे स्पष्टीकरण देते.

संकेतांचा अर्थ कळण्यासाठी त्यांची काळजीपूर्वक निवड केली जाते. उदाहरणार्थ, दीपस्तंभ शोधण्यासाठी त्यासारखे दिसणारे चिन्ह पाहा. चर्च किंवा मशीदींसाठी काळे चौकोन किंवा गोलाकार देऊन त्यावर क्रूस किंवा चंद्रकोर दिलेले असेल.

अशा संकेतांच्या अर्थांचा परिचय तुम्ही कसा करून घेऊ शकता? नकाशा अनुसरा (इंग्रजी) या पुस्तकाचे लेखक, जॉन विल्सन “‘नकाशाचे मजेखातर वाचन’ करण्याच्या सुखकारक विरंगुळ्याविषयी” सांगतात. ते पुढे म्हणतात: “नकाशावर नजर फिरवा आणि तुम्हाला दिसतील त्या संकेतांचे अर्थ सांगा.”

तुमच्या नकाशात दाखवल्यापेक्षा तुमचे ठिकाण काही वेगळेच दिसते असे तुम्हाला आढळते का? हे असे का? सामान्यपणे आपण आपल्या परिसरावर आपल्या स्वतःच्या उंचीवरून म्हणजे, भूमीपेक्षा १.५ ते १.८ मीटर उंचीवरून पाहतो. परंतु, नकाशे त्या प्रदेशाला प्रत्येक बिंदूपासून वरती फार उंचीवरून दाखवतात. ही कल्पना समजण्याकरता तुम्हाला नकाशाच्या व्याकरणाची समज होणे महत्त्वाचे आहे.

प्रमाण, उंची व स्थान

समुद्रसपाटीपासूनच्या उंचीमधील विविधता व जमिनीवरील कोणत्याही मानवनिर्मित वैशिष्ट्यांची नोंद करणे हे नकाशा बनवणाऱ्‍याचे आव्हान आहे. हे सर्व आटपसर तक्‍त्‌यावर छापले गेले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी, नकाशे ठराविक प्रमाणावर तयार केले जातात. एक प्रसिद्ध ब्रिटिश नकाशांची श्रृंखला त्या देशाचे प्रमाण १:५०,००० असे दाखवते—याचा अर्थ नकाशावरील प्रत्येक सेंटीमीटर भूपृष्ठावरील ५०,००० सेंटीमीटरला सूचित करतो.

तथापि, सपाट नकाशा, उंचीमधील फरक कसा दाखवू शकतो? पर्वतांवरील तिरकस छायापद्धत, त्रिकोण पद्धत जोडण्याचा एक मार्ग आहे. नकाशाच्या वरील डाव्या कोपऱ्‍यातून सूर्य प्रकाशत असल्याचे दिसते. त्यामुळे पूर्व तसेच आग्नेय दिशेकडील उतार, सावलीत असल्यामुळे, गडद रंगात काढले जातात. आधुनिक नकाशांमध्ये पुष्कळदा, सरासरी समुद्रसपाटीपासून समउंचीच्या ठिकाणांना जोडण्याकरता समोच्चरेषा असतात. ही चिन्हे फिकट रंगात छापल्यामुळे नकाशाची इतर वैशिष्ट्ये कमी केली जात नाहीत.

अनेक नकाशांमध्ये तुमचे स्थान स्पष्टपणे दाखवण्यासाठी छेदणाऱ्‍या रेषांची पद्धत वापरली जाते. यास वृत्तांची जाळी म्हटले जाते व ती या रेषांच्या जाळीतील कोणतेही ठिकाण दाखवण्यास अक्षरे किंवा अंकांचे सहनिर्देशक देणे शक्य करते. उदाहरणार्थ, एखादे शहर ग-१३ येथे असेल, म्हणजे, ग हे उभ्या बाजूला व १३ हे आडव्या बाजूला असेल. हे दोन बिंदू जेथे मिळतात तेथे तुम्हाला ते शहर आढळेल. परंतु, तुमचा नकाशा अचूक चित्र दाखवेल याची खात्री तुम्हाला कशी असू शकते?

संगणक युगामधील नकाशे

लष्कराच्या गरजांमुळे बहुधा अचूक नकाशांचे प्रकाशन झाले आहे. मागील ४० वर्षांमध्ये, आकाश-छायाचित्रांच्या स्टीरियोस्कोपीक तुलनेचा उपयोग करून अचूक नकाशांची निर्मिती करणे वास्तविकता बनली आहे, व अनेक देश अशाच योजना अनुसरत आहेत.

आताच, काही वाहनांमध्ये संगणकीकरण केलेले चल नकाशांचे प्रदर्शन आहे तसेच घरातील संगणकांसाठी पूर्ण माहिती असणारे प्रवासाचे नकाशे आहेत. “मायक्रो चिप्स चालकास निर्देशित करतात,” असे निरीक्षक (इंग्रजी) मधील मथळा होता. त्या वृत्ताने एका प्रयोग प्रकल्पाबद्दल समजावून सांगितले जो बोलण्याच्या संयोग क्रियेशी जोडलेल्या संगणकाच्या डिस्कचा उपयोग करतो ज्यात नकाशाची माहिती असते. चालक केवळ आपल्या प्रवासाच्या मुक्कामाचे ठिकाण सांगण्यासाठी संगणकाच्या स्क्रीन नकाशाला काही आज्ञा देतो. गोंधळविणाऱ्‍या रस्त्यांच्या जंक्शनबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही! का बरे? कारण कार प्रत्येक आडव्या रस्त्याजवळ आली की, चालकाने कोणती दिशा निवडावी हे त्याला एक आवाज सांगतो. होकायंत्र व चाकांचे सेन्सर्स कारच्या मार्गाची नोंद ठेवतात. अलीकडील विकास आणखी विश्‍वसनीय आणि साधे आहेत.

याचा नकाशांच्या भवितव्याकरता काय अर्थ होईल? कागदी नकाशे, संग्रहकाच्या वस्तू बनतील का? वेळच याचे उत्तर देईल. दोन्ही बाबतीत, तुमच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नकाशा हे अष्टपैलू साधन असेल.

[२२ पानांवरील नकाशा/चित्रं]

अनेक नकाशांमध्ये, उपयोगात आणलेल्या संकेतांचा अर्थ देण्यासाठी स्पष्टीकरण किंवा तपशील समाविष्ट असतो

उंचीतील फरक, बहुधा फिकट रंगांच्या समोच्च रेषांनी दाखवले जातात

वृत्तांच्या जाळी पद्धतीमुळे नकाशावर एखादे स्थळ शोधणे शक्य होते

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक इंच किंवा एक सेंटीमीटरच्या बरोबरीचे जे आहे (येथे दाखवलेले नाही) ते नकाशांमध्ये बहुधा दाखवले जाते

मैल किंवा किलोमीटरच्या प्रमाणामुळे तुम्हाला ठिकाणांमधील अंतर मोजणे शक्य होते

[चित्राचे श्रेय]

Crown Copyright Reserved

[२१ पानांवरील चित्राचे श्रेय]

From the book Die Heiligkeit der Gesellschaft Jesu

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा