शिक्षकांनी त्याचा आनंद लुटला
“मागील वर्षी इयत्ता दहावीतील इंग्रजीच्या वर्गामध्ये असताना जगभरातील धर्मांची व्यापक विविधता, यावर अभ्यास करण्यात आम्ही काही दिवस घालविले,” असे मशिगन, अमेरिका येथील एका युवकाने लिहिले. या मुलाने मानवजातीचा देवाकरता शोध (इंग्रजी) हे पुस्तक शाळेमध्ये आणले होते. तो वर्णन करतो:
“शिक्षकांनाच केवळ ते पुस्तक आवडेल, असा माझा विचार होता. आम्ही विद्यार्थी वर्गामध्ये अभ्यास करत असताना शिक्षक ते पुस्तक वाचत असल्याचे पाहून मला फारच आनंद झाला. परंतु शिक्षकांनी वर्ग संपण्याआधी आम्हा विद्यार्थ्यांना आमचे काम करत असताना मध्येच थांबविले आणि या पुस्तकाचा पहिला अध्याय वर्गात मोठ्याने वाचून दाखविला तेव्हा मला किती आश्चर्य वाटले याची तुम्ही कल्पना करू शकता. त्यांनी आम्हाला त्यावर टिपा घेण्यासाठी देखील सांगितले.
“काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्यांनी या पुस्तकाचा शिकविण्याकरता वापर केला आणि मानवजातीचा देवाकरता शोध या पुस्तकाचा आधार घेऊन आणखी एक अहवाल तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले. या पुस्तकाचा पूर्ण तासाच्या दरम्यान उपयोग करण्यात आला होता.”
तुम्हाला मानवजातीचा देवाकरता शोध या पुस्तकाची प्रत हवी असल्यास किंवा मोफत बायबल अभ्यास हवा असल्यास कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410401, Mah., किंवा पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर लिहा.