‘माझ्या मुलाचे जीवन कशामुळे वाचले’
कॅलिफोर्निया, अमेरिकामधील एका मातेने सांगितले की टेहळणी बुरुज आणि त्याच्या सोबतचे नियतकालिक सावध राहा! यात तिने जे वाचले त्यामुळे तिच्या मुलाचे जीवन वाचले. तिने लिहिले:
“पिस्तुलीचा धाक दाखवून माझ्या लहान मुलाला (वय, चार वर्षे) आणि मला पळूवन नेण्यात आले व जबरदस्तीने माझ्या बँकेकडे गाडी नेण्यास लावली. हल्लेखोराने मला लुबाडले परंतु मी माझ्या मुलाला घेऊन निसटून जाऊ शकले. वास्तविकतेत, या सर्वात मौल्यवान नियतकालिकांमध्ये छापलेल्या बायबलच्या व्यावहारिक सुचनांमुळे माझ्या मुलाचे तसेच माझे जीवन वाचले असे मला वाटते.”
त्या मातेने पुढे असे स्पष्टीकरण दिले: “अशा धोकेदायक परिस्थितीचा सामना करताना शांत कसे राहावे हे मी आधी एका सावध राहा! नियतकालिकामध्ये वाचले होते. तत्काळ मला शांत राहण्यास मदत करण्यासाठी मी यहोवा देवाला प्रार्थना केली. हल्लेखोराला बायबलची वचने सांगून मी त्यालाही शांत ठेवू शकले.”
बायबलमध्ये आपल्या त्रस्त काळाविषयी भाकीत केले आहे हे दाखवण्याचा टेहळणी बुरुज आणि सावध राहा! नियतकालिकांचा उद्देश आहे. आजच्या तणावपूर्ण परिस्थितींचा सामना करण्यासाठी ती लोकांना मदतही पुरवतात. परंतु ही नियतकालिके त्याहूनही अधिक काही करतात. ही नियतकालिके एकमात्र कायमस्वरूपी उपाय दर्शवतात—येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना प्रार्थना करावयास शिकवले त्या देवाचे राज्य सरकार. (मत्तय ६:९, १०) निश्चितच, टेहळणी बुरुज आणि सावध राहा! नियतकालिके नियमित वाचल्याने तुम्ही लाभ मिळवू शकता.
तुम्हाला टेहळणी बुरुज आणि अवेक! नियतकालिकांच्या प्रती घरी पोस्टाने मिळवण्याची इच्छा असल्यास, कृपया Praharidurg Prakashan Society, Plot A/35, Nr Industrial Estate, Nangargaon, Lonavla 410 401, Mah., किंवा पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर लिहा.