वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g94 ४/८ पृ. २८
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९४
  • उपशिर्षक
  • सरकारचा बेभरवसा
  • प्लेसेबोसची शक्‍ती
  • उभारणीकारक अनुभव एखाद्याला निरोगी राहण्यात मदत करतात
  • वर्षा दैवते निराश करतात
  • हातमिळवणी वर हातमिळवणी
  • रोमी खजिना ब्रिटनमध्ये सापडतो
  • जागतिक आरोग्य अहवाल
  • अमेरिकेत धुम्रपानामुळे घडणारे मृत्यू कमी आहेत
  • फिरते रुग्णालय
  • दृष्टिपथात अंत दिसत नाही
सावध राहा!—१९९४
g94 ४/८ पृ. २८

जगावरील दृष्टिक्षेप

सरकारचा बेभरवसा

“जगातील सर्व लोकांचा व्यवस्थेवरील विश्‍वास कमी होत चालला आहे,” असा दावा वॉशिंग्टन टपालाने (इंग्रजी) अलिकडेच केला. त्याने पुढे असे म्हटले, “सगळीकडे सरकारचा तिरस्कार केला जातो.” अलिकडील वर्षात लोकांच्या घेतलेल्या पुष्कळ मतांवर विवेचन देत असता, या वृत्तपत्राने असे म्हटले: “कॅनडा ते जपानपर्यंत व मधल्या काही ठिकाणांमध्ये, आश्‍चर्यदायक संख्येने नागरिक मतदान घेणाऱ्‍यांना सांगत आहेत की, त्यांच्या देशातील सरकारवर भरवसा ठेवला जाऊ शकत नाही. त्यांच्या देशातील आर्थिक परिस्थिती नाशाच्या मार्गावर आहे. परिस्थिती सुधारण्याऐवजी खालावतच जाईल.” उदाहरणार्थ, फ्रान्समध्ये मतदान दिलेल्यांपैकी ६० टक्के जणांना असे वाटले की, भविष्यात परिस्थिती सुधारण्याऐवजी खालावत जाईल. तसेच, देशाच्या कारभाराबद्दल तितक्याच प्रमाणाच्या लोकांनी असमाधान व्यक्‍त केले. ईटलीमध्ये, जवळजवळ ७५ टक्के लोकांना वाटले की, सरकार पाच ते दहा वर्षांपूर्वी जसे चांगले कार्य करीत होते त्याप्रमाणे आता करीत नाही. कॅनडात निम्म्यापेक्षा अधिक लोकांना असे वाटले की, पुढील पिढी त्याच्यापेक्षा जास्त खराब आर्थिक परिस्थितीचा सामना करील. (g94 3/22)

प्लेसेबोसची शक्‍ती

वैद्यकीय संशोधकांचे पुष्कळ काळापासून असे मत आहे की, प्लेसेबो दिल्यावर जवळजवळ एक तृतीयांश रुग्णांनी काही सुधारणा दाखवली आहे. हा असा उपचार आहे ज्याचा खरोखर कोणताही औषधी गुण नसतो. तथापि, एका नवीन अभ्यासाने हे दाखवून दिले आहे की, प्लेसेबोसचा अधिक शक्‍तिशाली परिणाम असू शकतो. द न्यूयॉर्क टाईम्स्‌ याने असा अहवाल दिला की, ला जॉला, कॅलीफोर्निया, अमेरिका येथील वैज्ञानिकांनी, नवीन प्रयोगाचे उपचार दिलेल्या ७,००० रुग्णांचा अभ्यास केला. ते उपचार नंतर वैद्यकीयरित्या निरुपयोगी ठरल्याचे कळाले. त्या अभ्यासाने दाखवले की, निदान तात्पुरत्या रितीने तरी, उपचाराच्या प्रतिसादात दोन तृतीयांश रुग्णांनी सुधारणा केली हाती. काही घटनांमध्ये, या प्लेसेबोसच्या परिणामात खरोखरची जीवशास्त्रीय सुधारणा गोवलेली असली तरी, वैज्ञानिक असा सल्ला देतात की, सुधारणा झाल्याचे सांगून डॉक्टरांना प्रसन्‍न करण्याची रुग्णाची स्वतःची इच्छा त्यात प्रतिबिंबित होते. यास्तव, नवीन औषधांवर कडक तपासणी करण्यासाठी काही संशोधक या अभ्यासाकडे एक कारण म्हणून बोट दाखवतात. (g94 3/22)

उभारणीकारक अनुभव एखाद्याला निरोगी राहण्यात मदत करतात

“दमवून टाकणारा दबाव व भावनात्मक समस्यांमुळे, शरीराची स्थितीस्थापकता कमी होते. त्याऐवजी, आनंद व प्रसन्‍नतेमुळे प्रतिबंधक रचना उत्तेजित होते व ते रोग प्रतिकारास बळकट करते.” अशाप्रकारे, सायकोन्यूरोइंम्यूनोलॉजी या नवीन विज्ञानाने एकत्रित केलेल्या पुराव्याबद्दल नॉसाऊशे नोई प्रेसी हे जर्मन वृत्तपत्र सारांशात सांगते. कामावरील किंवा घराच्या नकारात्मक प्रभावांमुळे शरीराचा प्रतिकार कमी होतो. दुसऱ्‍या बाजूस पाहता, प्रोफेसर व जीवशास्त्रज्ज्ञ, डॉ. ऑन्टन माईर यांच्याप्रमाणे सकारात्मक भावना व अनुभवांमुळे बळकटी देणारा प्रभाव होतो. त्यांनी दिलेली काही उदाहरणे: “विश्‍वास, आशा, प्रेम, भरवसा, सुरक्षितता, दळणवळण, जीवनातील उत्तेजित करणारी सकारात्मक गोष्ट, मनोरंजन—जगण्याची व निरोगी राहण्याची इच्छा.” (g94 3⁄22)

वर्षा दैवते निराश करतात

कडक अवर्षणाच्या काळाचा सामना करत असल्यामुळे, भारतातील आग्नेयकडील आंध्र प्रदेशातील राज्य सरकारने पाऊस पाडण्यासाठी एका असामान्य युक्‍तीचा आश्रय घेतला. इंडिया टुडे नियतकालिकाप्रमाणे, “वर्षा दैवतांना प्रसन्‍न करण्याच्या वेदांच्या प्राचीन संस्काराला,” राज्य सरकारने वित्त साहाय्य देऊन मदत दिली. राज्याच्या साहाय्यनिधी मंत्र्यांनी असे सांगितले: “देव आमच्या साहाय्याकरता येईल.” ५० निवडक मंदिरातील पुजाऱ्‍यांनी ११ दिवसांसाठी विधी केले.” त्याचा परिणाम? इंडिया टुडे अहवाल देते: “दैवतांवर त्याचा मुळीच प्रभाव झाला नाही. . . . धर्म अयशस्वी ठरल्यामुळे, सरकारने वैज्ञानिक मार्गाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ढगातून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. (g94 3/22)

हातमिळवणी वर हातमिळवणी

अमेरिकेतील लूथरन्स्‌ व ब्रिटनमधील मेथोडिस्ट या दोघांनीही, अलिकडेच पुरुषगमनाच्या विषयाकडे त्यांचे लक्ष वळवले आहे. ब्रिटनमध्ये, मेथोडिस्ट परिषद एका अस्पष्ट निर्णयावर पोहंचली. पुरुषगामी पुरुष व स्त्रियांना सेवक या नात्याने न नेमण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तथापि, त्याच वेळी त्यांनी घोषणा केली की चर्च, “स्त्रीगामी व पुरुषगामीयांचा चर्चमधील सहभाग व सेवा या गोष्टींना मान्यता देते, खात्रीपूर्वकतेने प्रतिपादन करते व जाहीर करते.” अमेरिकेत, लूथरन चर्चच्या सैनिक दलाने २१-पानी अहवाल प्रकाशित केला. तो, चर्चच्या १९,००० पाळकांना त्यांचा प्रतिसाद जाणण्यास पाठवण्यात येण्यासाठी बनवला होता. असोसिएटेड प्रेसप्रमाणे, तो अहवाल निश्‍चयपूर्वक सांगतो की, पवित्र शास्त्र समलिंगी संयोगाला पाठिंबा देते. तो अहवाल, हस्तमैथून “सर्वसाधारणपणे योग्य व आरोग्यदायी” असल्याचा दावा देखील करतो. या निश्‍चयपूर्वक वक्‍तव्याद्वारे व या दाव्याद्वारे, तो अहवाल या बाबतीतील पवित्र शास्त्राच्या भूमिकेच्या विरोधात आहे.—रोमकर १:२६, २७; १ करिंथकर ६:९, १०; कलस्सैकर ३:६, ७. (g94 3/22)

रोमी खजिना ब्रिटनमध्ये सापडतो

सुफोक, इंग्लंड मधील एका शेतात, १४,७८० सोन्याचे, चांदीचे व ब्रॉन्झचे नाणे, एक ९० सेंटीमीटर सोन्याची साखळी, १५ सोन्याच्या कडा व जवळजवळ १०० चांदीचे चमचे सापडले. निवृत्त झालेल्या माळ्याला हा धनाचा संग्रह सापडला. तो त्याची हरवलेली हातोडी शोधण्यासाठी एका धातूच्या वस्तू शोधक यंत्राचा उपयोग करीत होता. मिळालेल्या धनाचे मूल्य, अंदाजे १.५ कोटी डॉलर्स असतील असे एका तज्ज्ञाने सांगितले आहे. ते धन सरकारची मालमत्ता आहे असा निर्णय न्यायपंचाने दिला. याचा अर्थ, ज्यांना हा धनाचा साठा मिळाला त्या ७० वर्षीय एरीक लॉज यांना साठ्याच्या बाजार भावाएवढेच बक्षीस मिळेल. ब्रिटीश संग्रहालयात या साठ्याला जन सामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे असा अहवाल पालकीय साप्ताहिक (इंग्रजी) देते. (g94 4/8)

जागतिक आरोग्य अहवाल

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने, रोगाविरुद्धचा जागतिक लढा याचे एक भयाण चित्र रेखाटले. त्याच्या जागतिक आरोग्य परिस्थितीबद्दलच्या आठव्या अहवालात त्याने असे म्हटले: “उष्ण कटिबंधातील रोगांनी थैमान घातले आहे असे दिसते. या शतकात पहिल्याच वेळी, पटकी अमेरिकेपर्यंत पसरत आहे. पीत-ज्वर व डेन्क साथीचा पुष्कळांवर परिणाम होत आहे व हिवतापाची स्थिती खालावत चालली आहे . . . एडस्‌ची साथ सर्वत्र फैलावत आहे . . . फुफ्फुसाचा क्षय वाढत आहे . . . प्रगतीशील जगात, विकसित देशांमध्ये कर्करोगाच्या घटनांनी पहिल्यांदाच त्यास ओलांडले. मधुमेह सगळीकडे वाढत आहे.” १९८५-९० पर्यंतचा कालावधी लक्षात घेतला तर, अहवाल दाखवतो की, प्रत्येक वर्षी होणाऱ्‍या ५ कोटी मृत्युंपैकी, ४ कोटी ६५ लाख मृत्यू आजार व रोगराईमुळे होतात. प्रत्येक वर्षी जन्मलेल्या १४ कोटी पैकी ४० लाख मुलांचा मृत्यू त्यांच्या जन्मानंतर काही तासातच किंवा दिवसात होतो. दर वर्षी, सत्तर लाख नवीन कर्करोगाच्या घटना उद्‌भवतात. एका वर्षात, एडस्‌ला कारणीभूत असणाऱ्‍या एचआयव्हीने १० लाखापेक्षा अधिक जणांना त्याचा संसर्ग होतो. चांगली बाजू पाहता, गोवर व डांग्या खोकल्यासारखे रोग कमी होत चालले आहेत. आयुर्मर्यादा एक ते दोन वर्षांनी वाढली आहे. जागतिक सरासरी आता ६५ वर्षांची आहे. (g94 4⁄8)

अमेरिकेत धुम्रपानामुळे घडणारे मृत्यू कमी आहेत

यु.एस. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेंशनने, (सीडीसी) याने, धुम्रपानामुळे घडणाऱ्‍या मृत्युची संख्या कमी झाली आहे अशी घोषणा केली. १९८५ पासून अहवाल ठेवण्यास सुरवात केली त्यातील तो पहिला आहे. दर वर्षी धुम्रपानामुळे मरणाऱ्‍या अमेरिकी लोकांची संख्या १९९० मध्ये ४,१९,००० एवढी घटली. ही संख्या १५,००० ने कमी झाली होती. विशेषतः, धुम्रपानामुळे उत्पन्‍न झालेला हृदय विकार कमी झाल्यामुळे ते झाले. १९६५ मध्ये काही ४२.२ टक्के अमेरिकी प्रौढ जणांनी धुम्रपान केले होते. १९९० पर्यंत ते २५.५ टक्के इतके होते. तथापि, धुम्रपान अजूनही प्रतिबंधक रोग आणि मृत्युचे सर्वात मोठे कारण आहे. ते आरोग्याचा खर्च, प्रत्येक वर्षासाठी जवळजवळ २० अब्ज डॉलर्सने वाढवते. सरकार धुम्रपानविरोधी जाहिरातींवर, प्रत्येक वर्षासाठी १० लाख डॉलर्स खर्च करते. परंतु, तंबाखूचे कारखाने, धुम्रपान वाढवण्यासाठी प्रसिद्धी करण्यात व जाहिरातींवर ४ अब्ज डॉलर्स खर्च करतात. सीडीसी अहवाल देते की, धुम्रपानामुळे प्रत्येक धुम्रपान करणाऱ्‍या व्यक्‍तीमागे सरासरीने पाच वर्षांच्या आयुर्मर्यादेचा तोटा होतो. (g94 4⁄8)

फिरते रुग्णालय

भारतात एक असामान्य रुग्णालय रुग्णांची मदत करत आहे: ती लाईफलाइन एक्स्प्रेस नावाची रेलगाडी आहे. ती स्वयंसेवक डॉक्टरांद्वारे चालवली जाते. आशिया सप्ताह (इंग्रजी) हे नियतकालिक असा अहवाल देते की, ही रेलगाडी, “प्रत्यक्षात एक फिरते रुग्णालय आहे.” महिना दीड महिन्यात ते खेडोखेडी जाऊन थांबते. पुढच्या खेड्यात जाण्याआधी त्यातील डॉक्टर निदान ६०० रुग्णांवर उपचार करतात. ते इंपॅक्ट इंडिया फाउंडेशन नावाच्या लाभरहित गटाद्वारे चालवले जाते. या फिरत्या रुग्णालयाने आतापर्यंत ४,००,००० लोकांना मदत दिली आहे. इंपॅक्ट इंडियाची जेल्मा लाजारस असा अहवाल देते: “या प्रकल्पाची झपाट्याने प्रमाणाबाहेर वाढ झाली आहे. इतर देश अशाच फिरत्या रुग्णालयांची व्यवस्था करून देण्यासाठी आमच्याकडे मागणी करत आहेत.” (g94 3/22)

दृष्टिपथात अंत दिसत नाही

क्रेग शरगोल्ड, हा सात वर्षीय ब्रिटीश मुलगा १९८९ मध्ये ब्रेन ट्यूमरने पीडित होता. त्याची जगण्याची अपेक्षा नव्हती. त्याला सर्वात अधिक गेट-वेल कार्ड मिळवून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याची इच्छा होती. प्रसार माध्यमांतून व अटलॅन्टाच्या चिल्ड्रन्स्‌ वीश फाउंडेशन इंटरनॅशनलद्वारे जाहिरात केल्यावर, काही महिन्यातच विक्रम प्रस्थापित झाला. पहिल्या वर्षातच, १ कोटी ६० लाख शुभेच्छा कार्ड मिळाले व १९९२ पर्यंत ३ कोटी ३० लाख कार्ड मिळाले. दोन वर्षांआधीच आणखी पाठवू नये अशी विनंती करूनही अजूनसुद्धा दर आठवड्याला ३,००,००० या संख्येने कार्ड मिळत आहेत. ती संख्या ६ कोटींवर आल्यावर थांबली. आर्थर स्टेन या व्यवस्थापनेचे अध्यक्ष सांगतात, “आमच्याकडे ९०० चौरस मीटरचे कोठार या कार्डांनी छतापर्यंत भरलेले आहे. त्या कार्डांना अजून उघडलेलेही नाही.” एका सत्कृत्य करणाऱ्‍या पुरुषाद्वारे क्रेगवर १९९१ मध्ये एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याद्वारे ९० टक्के अर्बुद काढून टाकण्यात आला आहे. (g94 3/22)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा