जेव्हा सर्व जाती शांतीने एकत्र राहतील
देवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रों निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे.” (प्रे. कृत्ये १७:२६) मानवी कुटुंबाच्या उगमाविषयी ते पवित्र शास्त्राचे सोपे विधान आहे.
ते असा बोध करते की, मानव कोठेही राहात असोत किंवा त्यांचे कोणतेही शारीरिक वैशिष्ट्ये असोत, सर्व मानवजात एकाच समाईक वंशातून आली आहे. त्याचा अर्थ असाही होतो की, सर्व दृश्य विविधता असतानासुद्धा, बुद्धी आणि क्षमतांविषयी पाहिले तर “माणसांची सर्व राष्ट्रे” यांचे तेच गुणधर्म आहेत. होय, देवाच्या नजरेत, सर्व जातीचे किंवा राष्ट्राचे लोक सारखेच आहेत.—प्रे. कृत्ये १०:३४, ३५.
पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन बरोबर असला तर, जातीय विविधतांवर आधारित असलेला सर्व कलुषितपणा तसेच अन्याय यांना संपूर्णतः काढून टाकले जाईल अशी आशा आहे. शिवाय, मानवी कुटुंबाच्या उगमाबद्दल पवित्र शास्त्र अचूक असेल तर मग, तर्कशुद्धतेत तेच पुस्तक आम्हाला, मानवजात कशाप्रकारे शांतीने एकत्र राहू शकेल ही माहिती देखील पुरवू शकते.
तर मग, वास्तविकता काय दर्शवतात? मानवी उगमाविषयी पवित्र शास्त्रीय अहवालास विज्ञान पुष्टी देते का?
वैज्ञानिक पुरावा
आर. बेनेडीक्ट आणि जी. वेल्टफीश या मानवशास्त्रज्ञांचे मानवजातीच्या जाती [इंग्रजी] हे प्रकाशन असे निरीक्षिते: “संपूर्ण मानवजातीचे पिता आणि माता, आदाम आणि हव्वा यांच्याबद्दलच्या पवित्र शास्त्रीय गोष्टीने, आज विज्ञानाद्वारे प्रमाणित केलेल्या सत्याला शतकांआधी सांगितले होते: पृथ्वीवरचे सर्व लोक एकाच कुटुंबाचे आहेत आणि त्यांचा एकच उगम आहे.” हेच लेखक असे म्हणतात की “सर्व लोकांचा एकच उगम नसता तर, मानवी शरीराची गुंतागुंतीची घडण . . . सर्व मनुष्यांमध्ये सारखीच असण्यासाठी ‘एकाएकी’ शक्य झाले नसते.”
एल. के. डुन्न या कोलंबिया विश्वविद्यापीठातील प्राणीशास्त्राच्या प्राध्यापकांनी, लिहिलेली जात व जीवशास्त्र [इंग्रजी] ही पत्रिका अशी म्हणते: “सर्व लोक एकाच जातीचे आहेत, व सर्वजण मूलभूत शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये सारखेच आहेत. सर्व गटातील लोक अंतरजातीय विवाह करू शकतात आणि करतात सुद्धा.” पुढे ती स्पष्टीकरण देते: “तरीसुद्धा, प्रत्येक मानव अद्वितीय आहे आणि प्रत्येक दुसऱ्या मानवापेक्षा अल्प गोष्टींमध्ये भिन्न असतो. एक गोष्ट म्हणजे, लोक वेगवेगळ्या वातावरणामध्ये राहत असल्यामुळे आणि दुसरी म्हणजे, त्यांना आनुवंशिकतेने मिळालेल्या जनुकातील भिन्नतेमुळे हे असू शकते.”
वैज्ञानिक पुरावा निर्णायक आहे. जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हणायचे झाले तर, श्रेष्ठ किंवा कनिष्ठ जात, शुद्ध किंवा दूषित जात अशाप्रकारची कोणतीही गोष्ट नाही. काहींसाठी, जातीयरीत्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या त्वचा, केस किंवा डोळ्यांचा रंग, ही वैशिष्ट्ये एखाद्याच्या बुद्धी किंवा क्षमतेच्या प्रमाणाला दर्शवणारी नाहीत. त्याउलट, ती जनन आनुवंशिकतेचे परिणाम आहेत.
खरे म्हणजे, जातीय भिन्नता फारच कमी आहे, त्याबद्दल हॅम्पटन एल. कारसन त्यांच्या आनुवंशिकता आणि मानवी जीवन [इंग्रजी] या पुस्तकात लिहितात: “यातील विरोधाभास हा आहे की, प्रत्येक मानवांचे गट बाहेरून भिन्न आहेत आणि तरीसुद्धा या भिन्नतेमागे मूलभूत सारखेपणा आहे.”
सर्व मानव मिळून एकच कुटुंब होत असेल, तर जातीयवादाच्या एवढ्या भयानक समस्या का अस्तित्वात आहेत?
समस्या का आहे
पहिल्या मानवी पालकांनी आपल्या संततीला एक वाईट सुरवात दिल्यामुळे जातीयवाद आज अस्तित्वात आहे, हेच याचे मूळ कारण आहे. आदाम आणि हव्वेने स्वतःच्या इच्छेने देवाविरुद्ध बंड केले आणि त्यामुळे ते अपरिपूर्ण, सदोष असे झाले. त्यामुळे, वाईटाकडे असणारा कल, ही आदामाची अपरिपूर्णता त्याच्या वंशाला दिली गेली. (रोमकर ५:१२) यास्तव, जन्मापासूनच असणाऱ्या मानवाच्या स्वार्थ आणि घमेंडीपणाच्या प्रवृत्तीने जातीय झगडे आणि गोंधळाकडे निरवले आहे.
जातीयवाद का आहे त्याचे आणखी एक कारण आहे. आदाम आणि हव्वा देवाच्या राज्याधिकारापासून वेगळे झाले तेव्हा, पवित्र शास्त्र, ज्याला सैतान किंवा दियाबल म्हणते त्या दुष्ट आत्मिक प्राण्याच्या अधिकाराखाली ते आले. “सर्व जगाला ठकविणारा” याच्या प्रभावाखाली, जातीच्या बाबतीत लोकांना फसवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले आहेत. (प्रकटीकरण १२:९; २ करिंथकर ४:४) एखाद्याच्या वंशाची श्रेष्ठता म्हणजेच, एखाद्याचा गट श्रेष्ठ आहे ही कल्पना बाळगल्यामुळे, तीव्र नाशकारक भावना चेतवली गेली, ज्यामुळे जाणून किंवा अजाणतेत, लाखो लोकांना या हानीकारक परिणामांमुळे शक्तिशालीरितीने प्रभावीत केले गेले.
स्पष्टपणे सांगायचे म्हणजे, सैतानाच्या अधिकाराखाली असणाऱ्या स्वार्थी, अपरिपूर्ण मानवांनी, जातीयवादाच्या समस्यांसाठी कारणीभूत असणाऱ्या जातीबद्दलच्या खोट्या शिकवणी पसरवल्या आहेत.
या कारणास्तव, मानवजातीला एक होण्यासाठी, आम्ही खरोखरीच एक मानवी कुटुंब आहोत आणि देवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रों निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे,” असा सर्वांनी विश्वास ठेवायला हवा. (प्रे. कृत्ये १७:२६) त्याहून अधिक, सर्व जातींना शांतीने एकत्र राहावयाचे असेल तर, मानवांच्या कामातील सैतानाच्या प्रभावाला काढून टाकले पाहिजे. या गोष्टी कधी साध्य होऊ शकतील का? त्या घडतील असा विश्वास ठेवण्यासाठी काही आधार आहे का?
जातीयवादाच्या कलुषितपणाचा अंत करणे
येशूने त्याच्या शिष्यांवर ज्याप्रमाणे प्रीती दाखवली त्याचप्रमाणे “एकमेकांवर प्रीती” करण्याची आज्ञा देऊन, जातीयवादाचा कलुषितपणा कसा काढून टाकला जाऊ शकतो हे त्याने प्रकट केले. (योहान १३:३४, ३५) ही प्रीती केवळ एका विशिष्ट जात किंवा जातींच्या सदस्यांना दाखवायची नव्हती. तसे मुळीच नाही! त्याच्या एका शिष्याने असे उत्तेजन दिले की, “[संपूर्ण, न्यू.व.] बंधुवर्गावर प्रीती करा.”—१ पेत्र २:१७.
ही खिस्ती प्रीती कशी दाखवली जाते? “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर मानण्यात पुढाकार घ्या,” असे आर्जवताना पवित्र शास्त्र त्याची स्पष्टता देते. (रोमकर १२:१०, न्यू.व.) याप्रमाणे केले जाते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो याचा विचार करा! जात किंवा राष्ट्रीयतेला न जुमानता प्रत्येकजण इतरांना, खऱ्या माननीयतेने आणि आदराने वागवतो आणि ते कनिष्ठ आहेत असे न समजता, प्रत्यक्षात त्यांना ‘श्रेष्ठ मानतो’. (फिलिप्पैकर २:३) अशाप्रकारची खरी ख्रिस्ती प्रीती असते तेव्हा, जातीयवादाच्या कलुषितपणाची समस्या सोडवली जाते.
हे खरे आहे की, जातीयवादाच्या कलुषितपणाची भावना ज्यांच्यात घातली गेली आहे अशांना या सैतानाकडून प्रेरित असलेल्या कल्पनांना सोडून देण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक परिश्रम घ्यावे लागतील. परंतु ते साध्य केले जाऊ शकते! पहिल्या शतकात, ख्रिस्ती मंडळीत सामील होणाऱ्या सर्वांना अतुलनीय ऐक्यतेचा आनंद घेण्यास मिळाला. प्रेषित पौलाने त्याविषयी असे लिहिले: “यहुदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहा.” (गलतीकर ३:२८) खरोखरीच, ख्रिस्ताच्या खऱ्या अनुयायांना खऱ्या बंधुत्वाचा आनंद घेण्यास मिळाला.
परंतु काही असा आक्षेप घेतील: ‘आजच्या काळात हे कधीच होणार नाही.’ तरीसुद्धा, यहोवाच्या साक्षीदारांच्या, पंचेचाळीस लाख लोकांनी मिळून बनलेल्या संघटनेमध्ये हे आधीच घडले आहे! हे कबूल केले जाते की, या अभक्त व्यवस्थीकरणाकडून शिकलेल्या जातीयवादाच्या कलुषितपणाच्या भावनेपासून सर्वच पूर्णतः मुक्त झालेले नाहीत. एका काळ्या अमेरिकन व्यक्तीने, गोऱ्या सह साक्षीदारांबद्दल असे खरेपणाने निरीक्षिले: “जातीय श्रेष्ठत्वाच्या काही उरलेल्या मनोवृत्तींना मी काहींच्यात पाहते, आणि काहीवेळा, दुसऱ्या जातीच्या व्यक्तींबरोबर निकट संगतीत असताना मी काहींच्यात एक प्रकारचा अस्वस्थपणा पाहिला आहे.”
तरीपण, या व्यक्तीने कबूल केले: “पृथ्वीच्या इतर लोकांसोबत काही प्रमाणात तुलना करू शकत नाही, अशा जातीयवादाच्या कलुषितपणाला यहोवाच्या साक्षीदारांनी स्वतःमधून काढून टाकले आहे. जातीला न जुमानता, ते एकमेकांवर प्रीती करण्याचा प्रयत्न करतात . . . एका प्रसंगी, गोऱ्या साक्षीदारांचे खरे प्रेम अनुभवल्यामुळे माझे अंतःकरण इतके भरून आले की माझ्या डोळ्यांतून आवरता न येणारे अश्रू वाहिले.”
जातीय श्रेष्ठतेच्या सैतानी कल्पनांनी, लाखो लोक प्रभावीत झालेले असताना, लाखांमध्ये गणना होणाऱ्या एकतेचा आनंद घेणाऱ्या थोड्या लोकांमुळे खरोखरीच काही फरक होतो का? नाही, आम्ही या गोष्टीला मान्य करतो की यामुळे जातीयवादाची समस्या सोडवली जात नाही. ती मानवी प्रयत्नांच्या पलिकडील गोष्ट आहे. केवळ आमचा निर्माणकर्ता, यहोवा देव ते करू शकतो.
यहोवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या हाती असणाऱ्या त्याच्या राज्याद्वारे आता लवकरच, अन्याय आणि स्वार्थीपणाने जातीय किंवा त्याऐवजी कोणताही भेदभाव आणि द्वेष यास चेतवणाऱ्या सर्वांना तो या पृथ्वीवरून काढून टाकणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे. (दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०) मग, ख्रिस्ताच्या व्यवस्थेखालच्या परिपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे सर्व जाती खरेपणाने एक होतील. ते शिक्षण वाढत जाईल तसे, जातीय भेदाचा कोणताही अवशेष न राहता, ते पूर्णपणे एकतेत राहतील. देवाच्या अभिवचनाची शेवटी पूर्तता होईल: “पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. . . . पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो.”—प्रकटीकरण २१:४, ५.
खरे बंधुत्व वास करील आणि सर्व जाती शांतीने एकत्र राहतील अशा समयाची वाट पाहणारी व्यक्ती तुम्ही आहात का? असे असेल तर, यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी नियमितपणे एकत्र भेटतात त्या तुमच्या घराजवळील राज्य सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी आम्ही तुमचे स्वागत करतो. सर्व जातीच्या लोकांसाठी ते खरे ख्रिस्ती प्रेम दाखवतात की नाही हे तुम्ही स्वतःहून पाहा. (g93 8/22)
[१० पानांवरील चित्र]
लवकरच, सर्व जाती सगळीकडे शांतीने एकत्र राहतील