वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-4 पृ. ३
  • जात म्हणजे काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जात म्हणजे काय?
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मानवांचे वर्गीकरण करताना येणारी समस्या
  • “मनुष्याची सर्वात भयानक खोटी कल्पना”
  • जेव्हा सर्व जाती शांतीने एकत्र राहतील
    सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • वांशिक अभिमानाबद्दल काय?
    सावध राहा!—१९९८
  • तुम्ही शेवटपर्यंत धीर धरू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • जात—एवढा वादग्रस्त विषय का?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
gbr13-4 पृ. ३

जात म्हणजे काय?

जात! त्या शब्दामुळे तुमच्या मनात कोणते विचार येतात? काही लोकांसाठी त्याचा अर्थ दुजाभाव आणि जुलूम असा होतो. इतरांसाठी, त्याचा अर्थ द्वेष, दंगा आणि खून असा देखील होतो.

अमेरिकेतील जातीय दंग्यांपासून ते दक्षिण आफ्रिकेच्या वर्ण संकरास विरोधी धोरणापर्यंत, पूर्व युरोपातील विशिष्ट वंशाच्या गटांमधील युद्धांपासून ते श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या जागी होणाऱ्‍या झगड्यांपर्यंत, जात ही अगणित मानवी व्यथा आणि नाशाचा केंद्रबिंदू झाली आहे.

परंतु परिस्थिती अशी का आहे? इतर सर्व गोष्टींबद्दल पुष्कळ देशांमधील लोक सहनशील वाटत असताना जातीचा विषय एवढा संवेदनाक्षम का आहे? जात, एवढा गोंधळ व अन्याय पेटवणारी ठिणगी कशामुळे बनते? स्पष्टच सांगायचे म्हणजे, भिन्‍न जातीच्या लोकांचे का जमत नाही?

या प्रश्‍नांची उत्तरे देण्याकरता आम्हाला जात काय आहे आणि जाती कोणत्या प्रकारे भिन्‍न आहेत, यापेक्षाही अधिक जाणून घेण्याची आवश्‍यकता आहे. आम्हाला, आजच्या जातीय संबंधांमध्ये इतिहासाची कोणती भूमिका आहे हे देखील समजून घ्यायला हवे. तरीसुद्धा, विज्ञान आम्हाला या विषयासंबंधाने काय सांगू शकते त्याकडे आपण प्रथम पाहू या.

मानवांचे वर्गीकरण करताना येणारी समस्या

जगाच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्‍या लोकांची वेगवेगळी शारीरिक वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये त्वचेचा वर्ण, चेहऱ्‍यांचे आकार, केसांची घडण, वगैरे गोष्टींचा समावेश होतो. अशा शारीरिक विविधता एका जातीला दुसऱ्‍या जातीपासून भिन्‍न करतात.

याच कारणास्तव, गोरे किंवा काळे असे म्हणून सामान्यतः लोक त्वचेच्या वर्णाकडे लक्ष केंद्रित करतात. परंतु, स्पेनच्या रहिवाशांच्या, बोलण्याशी आणि संस्कृतीशी संबंधीत असलेले लोक, आशियायी लोक, स्कॅन्डिनाव्हीयाचे रहिवाशी, यहुदी आणि रशियाच्या रहिवाशांबद्दलही लोक बोलतात. ही नंतरची ओळखचिन्हे, शारीरिक वैशिष्ट्यांपेक्षा भौगोलिक, राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक भिन्‍नतेला अधिक सूचित करतात. म्हणूनच, पुष्कळ लोकांसाठी, जात केवळ शारीरिक वैशिष्ट्यांनीच नव्हे तर चालीरिती, भाषा, संस्कृती, धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देखील ठरवली जाते.

तरीसुद्धा, या विषयावरचे काही लेखक “जात” हा शब्द वापरण्यास टाळाटाळ करतात; जेव्हा कधी तो शब्द येतो तेव्हा ते त्याला अवतरण चिन्हांमध्ये लिहितात. इतर या शब्दाला संपूर्णतः टाळतात आणि त्याऐवजी “वंशीय वर्गीकरण,” “गट,” “लोकांचे विशिष्ट गट,” आणि “विविधता” या सारख्या शब्दप्रयोगांचा उपयोग करतात. का बरे? हे यासाठी कारण, जात हा शब्द सामान्यपणे जसा समजला जातो त्याप्रमाणे तो इतक्या सल्ल्यांनी आणि अर्थांनी लादलेला आहे की अचूक स्पष्टतेविना त्याचा उपयोग केला तर बहुधा चर्चेतील मुद्याचा दुर्बोध होतो.

जीवशास्त्रवेत्ता आणि मानवशास्त्रज्ञांसाठी अनेकदा याची व्याख्या, “इतर जातींच्या संख्येपासून वेगळा करणारा, शारीरिक वैशिष्ट्ये असणाऱ्‍या जातीचा पोटविभाग” अशी होते. परंतु, प्रश्‍न हा आहे की, मानवाच्या जातीमधील विविध गटांचे वर्णन करण्यासाठी कोणत्या वैशिष्ट्यांचा उपयोग केला जाऊ शकतो?

त्वचेचा वर्ण, केसांचा रंग आणि घडण, नाकाडोळ्यांचा आकार, मेंदूचा आकार आणि रक्‍ताचा प्रकार अशा घटकांना सुचविण्यात आले परंतु, त्यापैकीचा एकही घटक समाधानपूर्वकतेने मानवांच्या विविधतेचे वर्गीकरण करणारा असा ठरला नाही. हे यासाठी कारण, सर्व सदस्य त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये सारखे आहेत असा एकही लोकांचा गट निसर्गतः आढळला नाही.

त्वचेचा वर्णच पाहा. पुष्कळ लोक समजतात की गोरा, काळा, तांबूस तपकिरी, पिवळा आणि लाल या पाच त्वचेच्या रंगांद्वारे मानवांमध्ये सहजपणे भेद केला जाऊ शकतो. गोऱ्‍या रंगाच्या जातीला गोरी त्वचा, फिक्या रंगाचे केस आणि निळसर डोळे असतात असे सामान्यतः समजले जाते. तरीसुद्धा, खरे पाहिले तर, तथाकथित गोऱ्‍या रंगाच्या जातीच्या सदस्यांमध्ये केसांचा रंग, डोळ्यांचा रंग आणि त्वचेचा वर्ण यामध्ये बरीच विविधता आहे. मानवी प्रकार [इंग्रजी] हे पुस्तक असा अहवाल देते: “आज युरोपमध्ये एकाच प्रकारचे बरेच सदस्य असणारे लोकांचे विशिष्ट गट केवळ आताच नाहीत असे नसून अशा लोकांचे विशिष्ट गट आधी कधीच नव्हते.”

निश्‍चितच, मानवांच्या जातींचे वर्गीकरण करणे कठीण आहे, त्याबद्दल मानवजातीचे प्रकार [इंग्रजी] हे पुस्तक असे म्हणते: “आपण याबद्दल जे काही म्हणू शकतो ते असे आहे: सर्व मानव इतर सर्व मानवांप्रमाणे दिसत नसले, आणि पुष्कळ प्रकारे लोक वेगवेगळे दिसतात हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो तरी, मानवजातीचे नेमके किती प्रकार आहेत याविषयी शास्त्रज्ञांची अद्यापही सहमती नाही. लोकांना एका जातीत किंवा दुसऱ्‍या जातीत नेमण्यासाठी कोणते प्रमाण ठरवावे याचा देखील त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. काही शास्त्रज्ञ संशोधन थांबवून असे म्हणू इच्छितात की ही समस्या फारच कठीण आहे व त्याला कोणताही उपाय नाही!”

हे सर्व पेचात पाडण्याजोगे वाटेल. शास्त्रज्ञांना पशू आणि वनस्पतींचे अलौकिक बुद्धी, जाती आणि पोटजातींमध्ये वर्गीकरण करण्यास एवढे जड जात नाही या वस्तुस्थितीला पाहिले तर मग, मनुष्यांचे वेगवेगळ्या जातींमध्ये वर्गीकरण करण्यासाठी त्यांना एवढी समस्या का वाटते?

“मनुष्याची सर्वात भयानक खोटी कल्पना”

ॲशली मॉनटागू या मानवशास्त्रज्ञांच्या मते पुष्कळ लोक असा विश्‍वास करतात की, “शारीरिक आणि मानसिक गुण संबंधीत आहेत, व मानसिक क्षमतांमध्ये काहीशा निश्‍चित विविधतांचा संबंध शारीरिक विविधतांसोबत आहे आणि या विविधता सापेक्षबुद्धीमत्तेचा अंक (आय क्यू) अशा परीक्षांद्वारे आणि या लोकांच्या विशिष्ट गटांच्या सांस्कृतिक साध्य केलेल्या गोष्टींद्वारे मोजल्या जाऊ शकतात.”

वेगवेगळ्या जातींची विविध शारीरिक वैशिष्ट्ये असल्यामुळे पुष्कळ जण असा विश्‍वास करतात की, काही जाती बुद्धीमत्तेमध्ये श्रेष्ठ आहेत तर इतर कनिष्ठ आहेत. तरीसुद्धा, मॉनटागू अशाप्रकारच्या विचारशैलीला “मनुष्याची सर्वात भयानक खोटी कल्पना,” असे म्हणतात. इतर तज्ज्ञ या गोष्टीच्या सहमतात आहेत.

मॉरटन क्लास आणि हॅल हेल्मन, मानवजातीचे प्रकार [इंग्रजी] यामध्ये असे स्पष्टीकरण देतात: “व्यक्‍ती व्यक्‍तींमध्ये निश्‍चितच फरक आहेत; प्रत्येक लोकांच्या विशिष्ट गटांमध्ये अलौकिक बुद्धी असणारे आणि मनोदौर्बल्य असणाऱ्‍या व्यक्‍ती आहेत. परंतु, सर्व संशोधनानंतरही जबाबदार विद्वानांना बुद्धी किंवा क्षमता याबद्दल लोकांच्या विशिष्ट गटांमध्ये आनुवंशिक भिन्‍नता स्वीकारण्यासाठी पुरावा मिळाला नाही.”

तरीपण, क्षुल्लक शारीरिक भिन्‍नता याचा अर्थ, त्या जाती मुळातच वेगळ्या आहेत असा विश्‍वास पुष्कळ जण का करतात? जातीचा खरोखरीच कशाप्रकारे एक वादविषय बनला? या गोष्टींना आम्ही पुढील लेखांमध्ये विचारात घेऊ या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा