वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-2 पृ. २३-२५
  • मी अपंगत्व का सहन करावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी अपंगत्व का सहन करावे?
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अपंगांच्या समस्या
  • या बाबतीत देवाचा दृष्टिकोन
  • इतरांशी सामना करणे
  • आशा तुम्हाला यशस्वी लढा देण्यास सहाय्य करील
  • अध्ययन असमर्थतेशी झुंजणे
    सावध राहा!—१९९७
  • माझे पालक मला का समजून घेत नाहीत?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • मुलांनो—यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा आणखी दृढ करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • विशेष गरजा असलेल्या मुलांचे संगोपन
    सावध राहा!—२००६
अधिक माहिती पाहा
सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
gbr13-2 पृ. २३-२५

तरुण लोक विचारतात. . . .

मी अपंगत्व का सहन करावे?

“मी पाच वर्षांची होते,” बेकी म्हणते. “माझी मैत्रिण व मी तिच्या सायकलवरुन फेरी मारत होतो एवढ्यात कोपऱ्‍यावरुन एक मोटार आली व तिने आम्हास धडक दिली.” याचा परिणाम? “माझा पाय मोडला व डोक्याला खूप दुखापत झाली. मी जगेन अशी डॉक्टरांना अपेक्षा नव्हती.” पण बेकी वाचली, आणि आता ती १६ वर्षांची उत्साही तरुणी आहे. तरीसुद्धा, त्या अपघाताचे परिणाम मागे राहिले गेले. “त्याने मला खूप अशक्‍त बनविले,” असे ती म्हणते.

क्रॅग नावाचा एक तरुण तो देखील सीपी (सेरेबल पलसी, मेंदूचा पक्षघात) नावाच्या रोगाने अपंग बनला. “सीपीने माझ्या स्नायूंवर व चेतासंस्थेवर परिणाम झाला,” असे क्रॅग स्पष्टीकरण देतो. “मेंदूद्वारे जो संदेश पोहचविला जातो त्याला माझे स्नायू योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे मला चालताना, बोलताना, व माझा तोल राखताना त्रास होतो. मी ह्‍या सर्व गोष्टी करु शकतो पण सुरळितपणे करु शकत नाही.”

तुम्हाला देखील अशाप्रकारचे कोणते शारीरिक अपंगत्व आहे का? आकडेवारी दाखविते की २००० वर्षांपर्यंत जगभर तरुण लोकांतील अपंगत्वतेचे प्रमाण ५.९ कोटीपर्यंत पोहचेल. (वर्ल्ड हेल्थ, जानेवारी/फेब्रुवारी १९८५) तथापि, तुमच्यासारख्याच इतरांनाही समस्या आहेत ही वस्तुस्थिती, तुम्हाला जेव्हा इतर युवकांप्रमाणे धावणे, उड्या मारणे व खेळण्याची इच्छा होते पण करता येत नाही अशावेळी तुमचे तितके समाधान करीत नाही.

अपंगांच्या समस्या

शारीरिक अपंगत्व काही नवीन नाही. पवित्र शास्त्राच्या काळात देखील अनेकजन लंगडे (२ शमुवेल ४:४; ९:१३), आंधळे (मार्क ८:२२), आणि व्यंगत्व (मत्तय १२:१०) असलेले असे होते. जीवनातील दररोजच्या कामांना पूर्ण करणे अशा अपंग व्यक्‍तींना कठीण जाते.—पडताळा अनुवाद २८:२९; नीतिसूत्रे २६:७.

अपंगत्वामुळे ज्या मर्यादा येतात त्याच्याशी तुम्हाला अशीच लढत द्यावी लागत असेल. तयार होण्यासाठी, जेवण्यासाठी, किंवा शाळेला जाण्यासाठी परिश्रमाची—व इतरांकडून पुष्कळ मदत मिळण्याची गरज लागते. “मी माझ्या उजव्या बाजूच्या अवयवाची हालचाल योग्यपणे करु शकत नाही.” असे बेकी म्हणते. “त्यामुळे मला माझ्या डाव्या हाताने लिहावयास शिकावे लागले. चालणे देखील कठीण बनले. मी आता तशी बऱ्‍यापैकी चालते, पण काही दिवसांपर्यंत माझे पाय बधीर होते.” किंवा ठेंगूपणाचे दुःख असलेल्या तरुण मुलाच्या समस्येचा विचार करा. कोणतीही विनोदबुद्धी न राखता तो म्हणतो: “भिंतीवरील विजेच्या बटणापर्यंत पोहचणे ही दुसरी व्यथा आहे . . . निश्‍चितच घरे ही उंच माणसांसाठीच बांधलेली असतात.”—जील क्रेमेन्टझ्‌ हाऊ इट फील्स टू लीव्ह वीथ फिजीकल डीसॲबीलिटी.

तुम्हाला हे दिसेल की, तुम्हाला असलेल्या अतिशय दुःख देणाऱ्‍या समस्या ह्‍या स्वाभाविक रचनेत तशा नाहीत. पेरेन्टस्‌ मासिक स्पष्टीकरण देते की: “यौवनावस्थेतील मुले इतरांच्या हालचालीबद्दल खूपच कार्यक्षम असतात. खास गरजांमुळे खासकरुन तरुणांना जीवन हे अवघड जाते. . . . त्यांच्या स्वरुपाबद्दल इतर लोक काय विचार करतील याबद्दल ते चिंताक्रात, व मित्रत्वाच्या अविर्भावाबद्दल साशंक असतात, असे अर्थपूर्ण हावभाव व्यक्‍त करणे हे दयाळूपणाचे अस्वागतार्ह भाव होय.” इतरांकडून स्विकारले जाणे व इतरांना आवडणे ही स्वाभाविक इच्छा असते. तरीही, तुम्हाला दुरावा अनुभवावा लागला असेल. तरुण मिशेल असे सांगते की: “माझ्या संपूर्ण आयुष्यात मी सर्वांपेक्षा वेगळी राहिले. याचे कारण मी माझा डावा हात गमावला हे आहे.”

वेगळे असणे हे सततचे सतावणे तुमच्या पाठी लावते. क्रॅग म्हणतो: “मी खास अपंग असणाऱ्‍या मुलांसाठीच्या शाळेत पाचव्या इयत्तेपर्यंत आलो.” “पण पाचव्या वर्गानंतर मी सर्वसाधारण शाळेस जाऊ लागलो. एके दिवशी काही मुले माझ्याकडे पाहून हसू लागली तोपर्यंत मला कधीच समस्या वाटली नाही. याचे कारण मी ज्या पद्धतीने चालत होतो ते होते.” बेकीला देखील तिच्या शाळासोबत्यांच्या निर्दयी वागणूकीच्या आठवणी आठवतात. कारण पहिल्या शस्त्रक्रियेमुळे तिच्या स्वरयंत्राला इजा झाली, त्यामुळे तिचा आवाज थोडासा कर्कश बनला. “शाळेतील मुले मला राक्षसी आवाजाची म्हणून चिडवत असत,” असे ती म्हणते.

पौढ देखील अशाचप्रकारे अयोग्य कलुषित भावना प्रदर्शित करु शकतील. काहीजण तुमच्या सोबत नजरभेट करणे टाळतील. इतरजण तुमच्याशी बोलणे टाळतात, तुम्ही अदृश्‍य असल्याप्रमाणे अथवा वेडसर असल्यासारखे—काहीजण तुमच्याशी बोलणे टाळतील, व तुमच्या सोबत असणाऱ्‍यांना अथवा तुमच्या पालकांकडेच सर्व प्रतिक्रिया दर्शवितात. काही सदिच्छा असलेले तर तुमच्याबाबतीत करूणेचा भडीमार करतात व तुम्ही एखादी बिघडलेली वस्तू असल्याप्रमाणे तुमची भावना मजबूत करतात.

या बाबतीत देवाचा दृष्टिकोन

तर मग, देवाला तुमच्याबद्दल कसे वाटते? तुमच्यातील अपंगत्व हे त्याच्या नापसंतीचे चिन्ह आहे का? येशूला जेव्हा एक “जन्मांध” भेटला तेव्हा तो काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या. त्याच्या शिष्यांनी विचारले: “कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्‍याच्या की ह्‍याच्या आईबापाच्या?” येशूने उत्तर दिले: “ह्‍याने किंवा ह्‍याच्या आईबापानी पाप केले असे नाही.” (योहान ९:१-३) नाही, त्या आंधळ्या मनुष्याला अंधत्व हे काही खास कोणत्या पापामुळे अथवा त्याच्या पालकांमुळे आले नाही. उलटपक्षी, आदामाकडून वारसाने आपणा सर्वांना मिळालेल्या अपूर्णतेचा हा परिणाम होता. प्रेषित पौल स्पष्टीकरण करतो: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२.

शारीरिक अपंगत्व, ह्‍यामध्ये ईश्‍वरी हस्तक्षेप अथवा शिक्षा याचा परिणाम नाही. हा परिणाम काही प्रमाणात निष्काळजीपणाचा आहे. तरीही काही वेळेस “कालवश व अकल्पित घटने”मुळे असे घडते. (उपदेशक ९:११ न्यू.व.) आणि काही तरुण जे शारीरिक अपंग बनले ते केवळ त्यांच्या पालकांच्या अविचाराने किंवा दुर्लक्षितपणामुळे होय.

तुमची कोणत्याही प्रकारची समस्या असो, देव तुम्हाला कमी गणतो असे वाटून घेऊ नका. उलटपक्षी, तो तुम्हाला खूप बहुमोल व उपयुक्‍त समजतो, खासकरुन तुम्ही जर देवभिरु असाल तर. (लूक १२:७) तो तुमची “काळजी वाहतो” अगदी वैयक्‍तिकरित्या व त्याच्या सेवेत तो तुमचा वापर करण्यास संतुष्ट आहे. (१ पेत्र ५:७) देवाचा नेहमी उल्लेखणीय असा सेवक प्रेषित पौल याला देखील दिसून येईल अशाप्रकारचे शारीरिक अपंगत्व—“शरीरात एक काटा असा होता.” (२ करिंथकर १२:७) हे जाणणे किती सांत्वनदायी ठरेल की “मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर [यहोवा न्यू.व.] हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) तो तुमची शक्‍ती पूर्णपणे जाणतो व त्याच्या नवीन व्यवस्थीकरणात पूर्णत्वाला पोहचाल तेव्हा काय करु शकाल हे देखील तो जाणतो.—प्रकटीकरण २१:३, ४.

इतरांशी सामना करणे

तुमचे शाळासोबती व इतर देवाच्या उदात्त दृष्टिकोनात सहभागी नाहीत हे दुःखाचे आहे. लोक कधीकधी खरेच अतिशय दुष्ट वागतात. तेव्हा, जर तुमचे सोबती तुमच्या दुःखाची कदर न करता निर्दयीपणे वागत असतील तर आश्‍चर्य वाटू देऊ नका. तथापि, सर्वसाधारणपणे, लोकांना खरोखरी इजा अथवा पीडा द्यायची नसली तरी; काही वेळा ते चौकस असतात. तुमच्या त्रासाबद्दल चिंतातूर होऊन किंवा कदाचित संवेदनाहीन बनून ते कदाचित मुर्खतेच्या अथवा अपायकारक गोष्टीही बोलतील.

तुम्ही काय कराल? काही वेळेस अशा अडचणीत टाकणाऱ्‍या परिस्थितीला तुम्ही टाळू शकता. उदाहरणार्थ, त्यांना काय बोलावे हे कळत नाही असे तुम्हाला आढळते तेव्हा त्यांचा ताण कमी करु शकता. जे आम्हाला समजले नाही त्याबद्दल आपल्या प्रत्येकांचा भयाकडे कल असतो हे समजून घ्या. इतरांना तुमच्या अपंगत्वतेच्या पलिकडे पाहू द्या जेणेकरुन ते तुम्हाला चांगले जाणू शकतील. जेव्हा परिस्थिती याचे समर्थन करते तेव्हा तुम्ही अशाप्रकारे काही म्हणू शकता: “मी ही पांगुळ खुर्ची का वापरतो याचे तुम्हाला आश्‍चर्य वाटते काय?” पेरेन्टस्‌ मासिकाच्या मते, एक अपंग शिक्षिका, तिच्या विद्यार्थ्याच्या कुतूहलाचे समाधान करण्याकरता स्वतःच संभाषणास सुरूवात अशी करीत असे की: “मला वाटते तुम्ही याचा विचार करीत आहात की काय झाले असेल. तुम्हाला माहीत करुन घ्यावयास आवडेल का?”

तुम्ही कितीही चांगला प्रयत्न केला तरीही तुम्हाला वेळोवेळी दुखाविले जाण्याची शक्यता राहते. तरुण बेकी सांगते: “मी लहान होते, इतर मला चिडवित तेव्हा मी खरोखर खिन्‍न होत असे; माझ्या संपुर्ण जीवनात मी हळवी राहिले. पण आता मी स्वतःला खिन्‍न होऊ देत नाही. काही वेळेस तर मी अशा परिस्थितीकडे पाहून हसू लागते.” होय, अशा अपायकारक अभिप्रायास प्रतिकार विनोद बुद्धिनेच करता येईल. “हसण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:४) शलमोन राजाने पुढे असा सल्ला दिला: “बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नको.” (उपदेशक ७:२१) मुर्ख गोष्टींना हाताळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे हा आहे. “लोक काय म्हणतील याचा विचार करु नका,” असे बेकी म्हणते.

आशा तुम्हाला यशस्वी लढा देण्यास सहाय्य करील

खरे तर सबंध मानवी वंश हा सदोष आहे. “आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” असे पवित्र शास्त्र म्हणते. (रोमकर ८:२२) पण तुम्हाला भवितव्याची आशा आहे. उदाहरणार्थ, एक तरुण मुलगी जिला आपण कॅरोल म्हणू तिचा विचार करु. ती पूर्णपणे बहिरी जन्मास आली. नंतर सायकल अपघातात तिचा पाय कापून काढावा लागला. कॅरोलला आत्महत्या करायची होती. पण ती यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्र अभ्यास घेऊ लागली आणि तिला हे कळून आले की येणाऱ्‍या नीतिमान नवीन व्यवस्थिकरणात “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) खरे पाहता, तिला ही आशा मिळाली की एके दिवशी तिचे अपंगत्व बरे केले जाईल—अगदी अद्‌भुतरितीने!—यशया ३५:५, ६.

देवाबद्दल शिकून घेण्याने कॅरोलच्या मनोवृत्तीवर कोणता परिणाम घडला. काही तिच्या घनिष्ट असणारे ख्रिस्ती तिच्याबद्दल म्हणतातः “ती नेहमी उत्साही असते; कधीही अपंग असल्याचा विचार करीत नाही.” ते आस्थेने असेही म्हणतात की: “आमच्यातील काही सोबत्यांना तर ती बनावट पाय वापरते व पूर्णपणे ऐकण्याची क्षमता गमावलेली आहे हे देखील कळून येत नाही.” का? “कारण ती ओठांच्या हालचाली वरून म्हणणे समजून घेते व ऐकण्याचे साधन वापरते.” खरे पाहता, कॅरोलने केवळ भवितव्यातील आशाच नव्हे तर आणखीन काही मिळवले. पूर्ण शक्‍ती मिळविण्यापर्यंत आता ती पोहचली आहे. तुम्हीही असे कसे करू शकता हा विषय आमच्या पुढील लेखाच्या मालिकेत असेल. (g93 5/22)

[२४ पानांवरील चित्र]

जे चौकस असतात त्यांना आपली स्थिती सांगणे हे काहींना मदतीचे ठरते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा