वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-2 पृ. १२
  • या धर्मांकडे उत्तर आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • या धर्मांकडे उत्तर आहे का?
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
  • मिळती जुळती माहिती
  • गर्भपात—द्विधा जग
    सावध राहा! माहितीपत्रक ८-४ (gbr8-4)
  • गर्भपात—कोण बरोबर आहे?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-४ (gbr8-4)
  • गर्भपात—कोणत्या किमतीला?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-४ (gbr8-4)
  • गर्भपाताचे दुःखद बळी
    सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
अधिक माहिती पाहा
सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
gbr13-2 पृ. १२

या धर्मांकडे उत्तर आहे का?

गर्भपाताच्या प्रश्‍नांतील नैतिक पेचप्रसंगासाठी, अनेकजण त्यांच्या धार्मिक पुढाऱ्‍यांकडे मार्गदर्शनासाठी पाहतात. ते कसा प्रतिसाद दर्शवितात?

कॅथोलिक चर्च गर्भपाताविरूद्ध खंबीर भूमिका घेते, ते असे शिकविते की गर्भधारणेपासूनच जीवनाची सुरूवात होते. काही पाळक राजकारणात गुंतलेले होते व ज्या कॅथोलिक राजकारणी लोकांनी गर्भपाताला संमती असणाऱ्‍याच्या बाजूने आपली मते दिली अशांना पोपनी बहिष्कृत करावे असे सांगितले. तरीसुद्धा, अनेक कॅथोलिक गर्भपाताला मान्यता देणारे आहेत आणि हे अधिक व्यापक बनविण्याची मागणी करत आहेत.

पेस्टबायटेरियन चर्च (अमेरिका) अहवाल देते की, ४६ टक्के धर्मोपदेशक “गर्भपात हे चुकीचे आहे अशी शिकवण पवित्र शास्त्र देते यावर विश्‍वास ठेवत नाहीत.” चर्चचे अधिकृत धोरण हे गर्भपाताच्या बाजूचे आहे.

युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्टचे धोरण ठरविण्याकरीता भरलेल्या धर्माधिकाऱ्‍यांच्या १६व्या सभेत असा ठराव झाला की, ‘पुरूष व स्त्रियांना पुरेशी कुटुंब नियोजनाची सेवा तसेच सुरक्षित कायदेशीर गर्भपात एक पर्याय म्हणून निवडण्याच्या हक्कास आम्ही उचलून धरतो.’

इव्हेंजलिकल ल्युथर चर्चचे धोरण असे आहे की, गर्भपात “हा दुसरे सर्व मार्ग फोल ठरल्यानंतरच केवळ निवडण्याचा हक्क आहे;” तथापि, त्या धोरणाने गर्भपाताला “पाप” म्हणण्याचे किंवा “गर्भधारणेपासूनच जीवनाची सुरूवात होते” असे म्हणण्याचे नाकारले.

दक्षिण बॅप्तिस्ट कन्व्हेशन हे गर्भपाताच्या अगदी विरूद्ध आहे. पण अमेरिकन बॅप्तिस्ट चर्च म्हणते: “आम्ही चर्चच्या गर्भपातासंबंधीच्या व्यवहारचातुर्याच्या विधानात विभागले आहोत. परिणामतः, आम्ही प्रत्येक वैयक्‍तिकांच्या गर्भपातासंबंधीच्या सार्वजनिक धोरणाच्या स्वतंत्रतेला जाणतो की त्याद्वारे त्याचा किंवा तिचा विश्‍वास दिसून येतो.”

यहुदी विभागलेले आहेत, सनातन मतवादी जास्त प्रमाणात गर्भपात विरोधी धोरण घेतात, पण सुधारणावादी व पुरातनमतवादी यहुदी गर्भपातास जास्त प्रमाणात मान्यता देतात.

इस्लाम गर्भपाताला केवळ ४० दिवसाचे असेपर्यंतच कोणत्याही कारणास्तव पण त्यानंतर केवळ मातेच्या जीवनाला धोका असेल तरच परवानगी देतो. हेडीथ म्हणते की “४० दिवसाचा गर्भ हा बीजाच्या रुपात असतो, त्यानंतर तो साकळलेल्या रक्‍ताच्या रुपात ४० दिवसांच्या कालावधीत असतो, व नंतर मांसाच्या तुकड्याच्या रुपात असतो, त्यानंतर . . . देवदुतामार्फत त्याच्यात जीवनाचा श्‍वास फुंकला जातो.”

शिंटोइझम्‌ कोणत्याही प्रकारचे अधिकृत धोरण बाळगत नाही तर गर्भपाताला वैयक्‍तिक निवडीवर सोडतो.

हिंदू, बुद्धिष्ट, आणि शीख जीवनाला सर्वसाधारणपणे आदर देण्याची शिकवण देतात. पण ते गर्भपाताच्या विषयाबाबतीत वादविवादाच्या भांडणात पडत नाहीत. कारण, त्यांचा पुनर्जन्मावर विश्‍वास असल्यामुळे; गर्भपातामुळे त्या न जन्मलेल्या बाळाला दुसऱ्‍या जीवनात पाठविले जाते असे ते म्हणतात. (g93 5/22)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा