कुटुंब नियोजन जागतिक विषय बनतो
“मानवजातीसाठी आता उपलब्ध असलेल्या एखाद्या तंत्रज्ञानापेक्षा कुटुंब नियोजन अधिक लोकांसाठी अनेक फायदे कमी किंमतीत आणते . . . लोकसंख्येची समस्या यासारखी परिस्थिती नसतानाही हे सत्य असू शकते.”—द स्टेट ऑफ द वर्ल्डस् चिल्ड्रन १९९२.
गत काळात अनेक मुले असणे मोठे भूषणावह समजले जात असे. जवळजवळ चार हजार वर्षापूर्वी इसहाकाबरोबर विवाह करण्यासाठी मेसोपोटेमिया हे तिचे घर सोडण्यापूर्वी, रिबेकाला तिच्या आईने व भावाने ह्या शब्दाने आशीर्वाद दिला: “ताई ग, तू सहस्त्रावधींची, लक्षावधींची जननी हो.” (उत्पत्ति २४:६०) काळ आता बदलला आहे. आज, अधिकाधिक स्त्रियां मुले कमी पाहिजेत असे म्हणत आहेत.
एक मुलगी असलेल्या २२ वर्षीय बऊ या इंडोनेशियन मातेने म्हटले: “मी सात मुलांपैकी तिसरी होते. माझे वडील मध्य जावा मधील क्लेटन येथे निरा रसाची किरकोळ विक्री करणारे होते. मुलाबाळांना सांभाळताना माझ्या आईवडीलांना मोठा त्रास सहन करावा लागला . . . तुम्हाला कमी मुले असतील तर कुटुंब चालविणे सोपे जाते.”
जगभरात असलेल्या पालकांप्रमाणेच बऊचा अभिप्राय आहे. मुले केव्हा व्हावीत, किती पाहिजेत, त्यांच्यामध्ये अंतर किती असावे, व केव्हा होण्याचे थांबवावे याची योजना जोडप्यामध्ये वाढत असलेली दिसते. गर्भप्रतिबंधक साधनाच्या ऐच्छिकपणे वापराचे प्रमाण नाट्यमयरुपात समृद्ध देशात वाढत आहे, १९६०मध्ये १० टक्के जोडप्यावरून ते आज ५१ टक्क्यांच्यावर गेले हे अमेरिकेच्या आकडेवारी वरुन सूचित होते.
सरकारदेखील कुटुंब नियोजन वाढविण्याबद्दल आस्था दाखवीत आहे. लोकसंख्येच्या वाढीचे प्रमाण कमी करण्यासाठी समृद्ध देशापैकी अर्धी रा योजना राबवीत आहेत. अमेरिकेतील लोकसंख्या-नियंत्रण निधीने अनुमान काढले की प्रत्येक वर्षी लोकसंख्या-नियंत्रण योजनेसाठी एकूण ४,५०,००,००,००० अमेरिकन डॉलर खर्च होतो. भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी, २०००व्या वर्षी ही संख्या दुप्पट होईल अशी आशा अधिकाऱ्यांना वाटते.
जन्मसंख्येच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रों व वैयक्तिकांना याबद्दल एवढी आस्था का वाटत आहे? आणि ह्या महत्त्वपूर्ण गोष्टीविषयी ख्रिश्चनांचा कोणता दृष्टिकोन आहे? पुढील दोन लेख या प्रश्नांचा विचार करतील. (g93 2/22)