मुले ठेवा की दगदग?
लोकसंख्येचा स्फोट असे ज्याला म्हटले जाते त्याच्याशी कुटुंब नियोजनाचा जवळचा संबंध आहे. मानवजातीच्या इतिहासभरात लोकसंख्येची वाढ तुलनात्मकरित्या हळू होत होती; जन्मणाऱ्यांची संख्या मरणाऱ्यांएवढीच होती. कालांतराने १८३० या वर्षी जगाची लोकसंख्या एक अब्ज झाली.
यानंतर वैद्यकिय आणि वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती झाल्यामुळे खासपणे बालपणाचे आजार व इतर आजारांचे प्रमाण घटण्याचा परिणाम कमी मृत्यूत झाला. जगाची लोकसंख्या १९३० पर्यंत दोन अब्ज इतकी झाली. व १९६० पर्यंत ती आणखी एक अब्जाने वाढली. त्यात १९७५ पर्यंत आणखी एक अब्जाची भर पडली. ती १९८७ पर्यंत पाच अब्जापर्यंत झाली.
दुसऱ्या मार्गाने याकडे पाहिल्यास, प्रत्येक मिनिटाला १७० लोक या पृथ्वी ग्रहावर वाढत आहेत असे दिसते. म्हणजेच यामुळे प्रत्येक दिवसाला २,५०,००० लोकांची भर पडते, एक मोठे शहर बनण्यास ते पुरेसे आहेत. याचाच अर्थ, कॅनडाच्या लोकसंख्येच्या तीन पटीच्या बरोबरीचे किंवा मेक्सिकोतील लोकसंख्ये समान प्रत्येक वर्षी ९ कोटी लोक वाढत आहे. जगाची ७५ टक्के लोकसंख्या आधीच असलेल्या समृद्ध देशात ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या वाढत आहे.
चिंताकुल सरकारे
परंतु कुटुंब नियोजनाद्वारे अनेक सरकार लोकसंख्येला मर्यादित का ठेवत आहेत? युएन पॉप्युलेशन फंडाचे नायजेरियाचे राष्ट्रीय कार्यक्रमाचे असलेले अधिकारी डॉ. बॅब्स सगो, या प्रश्नाचे उत्तर एका दाखल्याचा उपयोग करून देतात व सावध करतात की ते एका, किचकट आणि वादग्रस्त परिस्थितीला अधिक सुलभ बनवते स्पष्ट करतात:
‘समजा एका शेतकऱ्याला दहा एकर जमीन आहे. त्याला दहा मुले असली व त्याने ती जमीन दहाही मुलांना सारख्या प्रमाणात वाटून दिली तर प्रत्येक मुलाला एक एकर जमीन मिळेल. प्रत्येक मुलाला जर दहा मुले झाली व त्याचप्रकारे जमीन वाटून दिल्यास, प्रत्येक मुलाला फक्त एक दशांश एकर जमीन मिळेल. स्पष्टपणे, ही मुले दहा एकर जमीन असणाऱ्या त्यांच्या आजोबाइतके सुखी नसणार.’
हा दाखला वाढत असलेल्या लोकसंख्येचा पृथ्वीवरील मर्यादित साधनांशी असणारा संबंध दाखवितो. लोकसंख्या वाढत असताना, अनेक समृद्ध देश सध्या असलेली लोकसंख्येची संख्या सांभाळण्यासाठी पराकाष्टेने प्रयत्न करीत आहेत. काही समस्यांचा विचार करा.
साधने. लोक जसजसे वाढत राहतील तसे जंगले, जमीनीच्या वरच्या स्तराची माती, मशागतीखालील जमीन आणि शुद्ध पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासेल. याचा परिणाम? पोप्युल नावाच्या मासिकाने असा खेद व्यक्त केला: “समृद्ध देश, ज्यांवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे त्या नैसर्गिक साधनांचा ते अगदी अतिरेकी प्रमाणात उपयोग करतात.”
पायाभूत मांडणी. वाढत असलेल्या लोकसंख्येला, पुरेशी घरे, शाळा, स्वच्छतेच्या उपाययोजना, रस्ते, आणि आरोग्य सेवा देणे सरकारला मोठ्या मुश्कीलीचे आहे. दुप्पट भाराचे लादलेले मोठे कर्ज, आणि लय पावत चाललेली साधने, यामुळे समृद्ध रा सद्य लोकसंख्येच्या गरजा भागविण्याशिवाय इतर गोष्टींचा विचार करु शकत नाही. ती मोठ्या कचाट्यात सापडली आहेत.
कामधंदा. युएन पॉप्युलेशन फंड यांचे पॉप्युलेशन अँड द एनव्हायरमेंट: द चॅलेंज अहेड या प्रकाशनाने असे स्पष्ट केले की अनेक समृद्ध देशातील ४० टक्के कामगार वर्ग बेरोजगार आहेत. समृद्ध असणाऱ्या जगात ५० कोटीपेक्षा अधिक लोक एकतर ते बेरोजगार आहेत किंवा पुरेसा रोजगार त्यांना मिळत नाही, व ही संख्या औद्यागिकरणातील जगातल्या कामगार वर्गाच्या संख्येएवढीच आहे.
ही स्थिती अधिक बिघडवण्याचे टाळण्यासाठी समृद्ध देशांनी प्रत्येक वर्षाला ३ कोटी नवीन कामे निर्माण केली पाहिजेत. ज्या लोकांना ही कामे पाहिजेत ती आता हयात असलेली मुले आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये असलेल्या ह्या बेरोजगारीमुळे, मुलकी युद्धे होण्याची तसेच दारिद्य्र आणि नैसर्गिक गोष्टींचा नाश होण्याची शंका तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
या कारणामुळे, अधिकाधिक समृद्ध राष्ट्री कुटुंब नियोजन करण्याकडे हातभार लावीत आहेत हे इतके नवलाईचे नाही. पुढे काय राखून ठेवलेले आहे, याविषयी एका लॅन्सेट या ब्रिटिश वैद्यकिय दैनिकात संपादकाने भाष्य करताना म्हटले: “जगातील गरीब देशात वाढती लोकसंख्या, त्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करायला लावते. . .लाखो त्यांचे जीवन अशिक्षित, बेरोजगार, राहण्याची व्यवस्था नसलेले, चांगले आरोग्य आणि कल्याण व स्वच्छतेची सेवा यांच्या अभावाने व्यतित करतील, आणि त्याचबरोबर वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पूर्वउल्लेखीत समस्या उद्भवत आहेत.”
चिंताकुल कुटुंबे
राष्ट्रीय पातळीवर ध्येये ठेवणे आणि कुटुंब नियोजन प्रस्थापित करणे ही एक बाब आहे; लोकांची खात्री करुन देणे ही दुसरी बाब आहे. अनेक समाजाच्या संस्कृतीत मोठ्या कुटुंबाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन अजूनही दृढ आहे. उदाहरणार्थ, जन्मसंख्येचे प्रमाण कमी करण्याविषयी सरकारने दिलेल्या उत्तेजनाला नायजेरीयातील एका मातेने प्रतिसाद दिला: “आमच्या कुटुंबात, २६ मुलांमध्ये मी सर्वात धाकटी आहे, माझ्या सर्व वडील बंधु आणि बहिणींना आठ ते बारा मुले आहेत. तर मग सर्वात कमी मुले मलाच असावीत का?”
नायजेरियात सरासरी स्त्रिया सहा मुलांना जन्म देतात, तेव्हा हा दृष्टिकोन बाळगणे एकदा साधारण समजला जात होता तसा नाही. लाखो लोक कुटुंबाचे खाणे व कपड्यांच्या वाढणाऱ्या किंमतीचा सामना करताना खूप अडचणीत पडले आहेत. खरेपणाने अनेक लोक अनुभवाद्वारे योरुबा म्हणीप्रमाणे, हे शिकले आहेत की: “ऑमॉ बॅर ओशी बॅर” (कुटुंब महान तर सुख लहान).
जरी अनेक कुटुंबे, कुटुंब नियोजन करीत नाही तरी त्याचे फायदे त्यांना समजतात. याचा परिणाम? संयुक्त राष्ट्रसंघाच्या चिल्ड्रन्स फंड ने द स्टेट ऑफ द वर्ल्डस् चिल्ड्रन १९९२ प्रकाशित केले त्यात म्हटले, वर्षभरात समृद्ध देशात ३ पैकीची १ गर्भधारणा ही केवळ योजनारहितच नाही तर नको असलेली आहे.
कुटुंब नियोजन जीवन वाचविते
आर्थिक संकटाव्यतिरिक्त, कुटुंब नियोजनाला विचारात घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे मातेच्या आणि तिच्या मुलाच्या आरोग्याचा विचार करणे होय. पश्चिम आफ्रिकेतील एक म्हण अशी आहे की “गरोदरपण ही जुगार आहे; जन्म देणे हा जीवन-आणि-मरणाचा झगडा आहे.” समृद्ध देशातही, प्रत्येक वर्षी, गरोदरपणात आणि बाळंतपणात पाच लाख स्त्रियांचा मृत्यु होतो, दहा लाख मुलांना माता नसते आणि या व्यतिरिक्त मुलांना जन्म दिल्यामुळे आरोग्यावर झालेल्या परिणामामुळे ५० लाख ते ७० लाख स्त्रिया असाहाय्य किंवा निर्बल होतात.
समृद्ध देशातील सर्वच स्त्रियांवर अशा प्रकारचे प्रसंग येत नाहीत. सोबतची पेटी दाखवते त्याप्रमाणे, अधिक मुले प्रसवलेल्या, अति लवकर, पाठोपाठ किंवा फार उशिरा मुले झालेल्या स्त्रियांनाच याचा सामना करावा लागतो. युएनच्या उगमाने अंदाज काढला की स्त्रियांच्या गरोदरपणात किंवा बाळंतपणात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कुटुंब नियोजन एक चतुर्थांश ते तीन चतुर्थांश एवढे कमी करू शकते. आणि त्यापासून होणाऱ्या अनेक असाह्यतेलाही टाळू शकते.
परंतु लाखो लोकांचे जीवन वाचविल्यामुळे लोकसंख्या वाढविली जाणार नाही का? अनेक विचारवंत लोक नाही, म्हणतात हे आश्चर्याचेच आहे. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टने १९९१ मध्ये लिहिले, “त्याचा विचार केला पाहिजे कीः “जर अधिक मुले वाचली तर लोकसंख्येची समस्या अधिकच वाईट होईल. याच्या अगदी विपरीत. त्यांची मुले बचावतील असा पालकांना आत्मविश्वास आल्यावर जननक्षमता देखील कमी होईल.”
तरीसुद्धा, खासपणे गरीब समाजात लाखो स्त्रिया मुलांना पाठोपाठ जन्म देत आहेत. का बरे? कारण त्यांचा समाज त्यांच्याकडून ती अपेक्षा करतो, अनेक मुले असली तर त्यातून काही बचावण्याची शक्यता त्यांना वाटत असते आणि कुटुंब नियोजनाची सेवा उपलब्ध नसल्याने किंवा त्याची माहिती नसल्यामुळे ते घडते.
तथापि, मोठे कुटुंब असणाऱ्या अनेक स्त्रिया वेगळ्या पद्धतीचा विचार करीत नाही. प्रत्येक मूल देवाकडील आशीर्वाद आहे असा विचार त्या करतात. (g93 2/22)
[६ पानांवरील चौकट]
समृद्ध देशात गरोदरपणाची मोठी जोखीम
अति लवकर: गरोदरपण आणि बाळंतपणाच्या वेळी २० ते २४ वयोगटाच्या स्त्रियांपेक्षा १५ ते १९ वयाच्या स्त्रियांमध्ये मृत्यूच्या जोखीमीचे प्रमाण तिप्पट असते. नवयौवन स्त्रियांनी जन्म दिलेली मुले, लवकर जन्म झाल्यामुळे किंवा जन्माच्यावेळी फारच कमी वजन असल्यामुळे मरण्याची अधिक शक्यता असते.
कमी अंतर: मुलाच्या बचावासाठी दोन जन्माच्यामधील अंतराचा यावर अधिक प्रभाव होतो. मातेचे पहिले मूल जन्मल्यानंतर दोन पेक्षा कमी वर्षांनी जन्मलेले मूल बाल्यावस्थेतच मरण्याची ६६ टक्के खात्री असते. जर ही मुले जगली, तर त्यांची वाढ खुंटण्याची आणि त्यांची बौद्धिक वाढ दुर्बळ होण्याची मोठी शक्यता असते. योग्य अंतर ठेवल्याने ५ मधील १ अर्भकाचा मृत्यू टाळला जाऊ शकतो. जन्मामधील दोन वर्ष किंवा अधिक काळ अंतर ठेवल्याने जोखीम कमी होते.
पुष्कळ: खासकरून जर आधीच्या मुलांमध्ये दोन वर्षापेक्षा अधिक अंतर ठेवले नाही तर, चारपेक्षा अधिक मुलांना जन्म दिल्यामुळे गरोदरपण आणि बाळंतपणाचा धोका वाढत असतो. चार गरोदरपणानंतर मातेला रक्तक्षय तसेच रक्तस्त्रावाचा त्रास होण्याची शक्यता असते, व त्यांची मुले अक्षमतेत जन्मण्याचा धोका संभावत असतो.
फार उशीरा: गरोदरपण आणि बाळंतपणात, २० ते २४ वर्षे वयाच्या स्त्रियापेक्षा ३५ वर्षे वय असलेल्या स्त्रियांच्या मृत्यूची शक्यता पाच पटीने अधीक असते. प्रौढ स्त्रियांना जन्मलेल्या मुलांची देखील मरण्याची अधिक शक्यता असते. (g93 2/22)