वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr8-1 पृ. १८
  • शहामृग व करकोचा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शहामृग व करकोचा
  • सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • मिळती जुळती माहिती
  • असे करतात पशूपक्षी आपल्या पिलांचे पालनपोषण
    सावध राहा!—२००५
सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
gbr8-1 पृ. १८

शहामृग व करकोचा

दोघेही मोठे, सपक्ष, पिसे असलेले लांब पायांचे प्राणी आहेत या व्यतिरिक्‍त शहामृग व करकोच्यात काही साम्य नाही. पुष्कळ बाबतीत त्यांजमध्ये भिन्‍नता दिसते.

उडताना करकोचा डौलदारपणाचे प्रतीक असतो. त्याचा पंखविस्तार ८.५ फूट (२.६ मीटर) इतका मोठा असू शकतो. त्याच्या उडण्याच्या अद्‌भूत शक्‍तीमुळे काही करकोचे शरद ऋतु दक्षिणेकडील दूरदूरच्या देशात घालवतात. शहामृगांना अशी सोय नाही. पंखांनी कितीही फडफड केली तरी त्यांचे मोठे शरीर धरणी सोडत नाही. यामुळे पवित्र शास्त्र विचारतेः “शहामृगीचे पंख आनंदाने फडफडतात. तिला करकोच्याचे पर व पिसारे कोठे आहेत?”—ईयोब ३९:१३, न्यू.व.

तथापि, चिडून अथवा घाबरुन मात्र आपल्या पंखांच्या मदतीने शहामृग ताशी ४० मैलांच्या (तासाला ६४ कि.मी.) वेगाने धावू शकते. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, “ती आपली मान उंच उभारुन आपले पंख फडफडवीत धावते तेव्हा ती घोड्याला व स्वाराला हसते.” (ईयोब ३९:१८) शहामृगाने घोड्याचा पाठलाग करुन त्याला जबरदस्त लाथा मारलेल्या एका निरिक्षकाने पाहिल्या आहेत.

दोन्ही पक्षांमध्ये विरोधी गुणलक्षणेही आहेत. करकोचाचे इब्री नाव “प्रेमळ कृपा” किंवा “निष्ठावंत प्रीती” या अर्थाच्या शब्दावरुन बनवलेले आहे. हे नाव किती योग्य आहे! कारण स्थलांतराच्या वेळी वेगळी झालेली करकोच्यांची जोडी त्याच त्या घरट्यात वर्षानुवर्षे भेटते. घरटे पुन्हा बांधणे, अंडी उबवणे व पिलांचे पालन-पोषण करण्यात दोघेही सहभागी होतात. एकावेळी बहुधा चार पिले असतात व अनेक आठवडे त्यांचे आई-बाप त्यांना भरवण्यात मग्न असतात. लौरस एनसायक्लोपिडीआ ऑफ ॲनिमल लाईफ म्हणतेः “पिलांवर लक्ष ठेवणाऱ्‍या व शिकार करण्यास त्यांना शिकवणाऱ्‍या आई-वडीलांसोबत, दोन महिन्याची पिले पहिले उड्डाण करतात.”

याउलट, शहामृग बहुपत्निक असतात व माद्यांना आपल्या अंड्यांची फारशी काळजी नसते. ती सामूहिक घरट्यात गोळा केली जातात. पण काही बाहेरच सोडली जातात. धोका वाटल्यास शहामृग थोड्या वेळासाठी अंडी व पिलांना सोडून पळतात.

हे वरकरणी दुर्लक्ष, पवित्र शास्त्रातील शहामृगीच्या वर्णनाशी जुळतेः “ती आपली अंडी जमिनीच्या हवाली करते. . . . ती कोणाच्या पायाखाली चिरडतील . . . याचे तिला भान नसते. ती आपल्या पिलांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नव्हेतच.” (ईयोब ३९:१४-१६) पक्षीशास्त्रज्ञ डॉ. आर. सी. मर्फी व डॉ. डी. ॲमॅडन म्हणतातः “पवित्र शास्त्राच्या बहुतेक वाचकांना, हा उतारा किती बिनचूक आहे ते ठाऊक नाही.”

शहामृगाचे डोके लहान असते व त्यांचा मेंदू अक्रोडाएवढा असतो. यामुळे “पक्षी हुशार प्राणी असतात या नियमाला एखादा अपवाद असल्यास तो शहामृग होय,” असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक टेरी मर्फी यांनी का म्हटले ते स्पष्ट होईल.

सम ऑफ माय बेस्ट फ्रेंडस्‌ आर ॲनिमल या पुस्तकात मर्फींनी, एक शहामृग कुंपणाला लागून झोपल्याने गारठून मरण पावल्याचे वर्णन दिले आहे. कुंपणाच्या दोन गजांमध्ये मान लपेटल्यामुळे गुदमरुन दुसरे मेले. मर्फी यांनी लिहिलेः “परंतु, त्यांच्या बाबतीत सर्वात हास्यास्पद गोष्ट म्हणजे त्यांचे खाणे.”

नुकतेच एका शहामृगाचा जवळून फोटो काढत असताना एका प्रवाशाचा कॅमेरा त्याच्या हातून ओढून घेण्यात आला. आणि तो शहामृगाच्या लांब मानेतून हळूहळू उतरताना त्या प्रवाशाने हताशपणे पाहिले! द गिनिस्‌ बुक ऑफ ॲनिमल फॅक्ट्‌स्‌ ॲण्ड फीट्‌स्‌ मध्ये शहामृगाच्या पोटात सापडलेल्या वस्तूंच्या यादीत खालील गोष्टी होत्याः “दोरीचा ३ फूट लांब तुकडा, फिल्मचे एक रीळ, गजराच्या घड्याळाची किल्ली, सायकलची एक व्हॉल्व्ह, पेन्सिल, फणी, तीन हातमोजे, एक रुमाल, हातमोजे बांधण्याची बकले, सोन्याच्या साखळीचा तुकडा, कॉलरची दोन बटने, एक बेल्जिमय नाणे, दोन लहान नाणी व चार अर्ध्या पेनी.”

“देवाने तिला बुद्धिहीन असे उत्पन्‍न केले आहे,” असे पवित्र शास्त्रात म्हटलेले योग्यच आहे. (ईयोब ३९:१७) तर मग, सृष्टीकर्त्याने काही चूक केली असा यापासून अर्थबोध निघतो का? मुळीच नाही. वास्तविकपणे शहामृगाकरवी वरकरणी दाखविले जाणारे दुर्लक्ष त्याला संरक्षण देते. निष्काळजीपणे बाहेर सोडलेली अंडी काही वेळा पिलांना खाऊ घालण्यास उपयोगी पडतात. तसेच शहामृगांना दात नसल्याने, खड्यांसारख्या नैसर्गिक वस्तु गिळल्याने पचनाला अतिशय मदत होते.

शहामृग जेव्हा अंडी वा पिलांना टाकून पळतो तेव्हा त्यामुळे शत्रूचे लक्ष अंडी व पिलांपासून विचलित होते. तसे करताना कधी कधी शहामृग असामान्य धैर्य दाखवतात. येणारा ट्रक पाहून एका शहामृगीने आपली पिले सोडली व ती त्या ट्रककडे धावली! मग, दुखापत झाल्याचे भासवीत एक पंख लटकावीत ती बाजूला झाली.

शहामृग व करकोचा यांना असे वेगळे बनवणाऱ्‍याच्या अतर्क्य बुद्धिकडे हे पक्षी आपले लक्ष वेधतात. (रोमकर ११:३३) स्तोत्रकर्त्याने म्हटल्याप्रमाणे, “हे यहोवा, तुझी कृत्ये किती विविध आहेत!तीसर्वतूसूज्ञतेने केली.”—स्तोत्रसंहिता १०४:२४.

[१८, १९ पानांवरील चित्रं]

मॅरॅबू करकोचा

सॅडल-बील करकोचा

शहामृग

वुड करकोचा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा