पवित्र शास्त्रीय दृष्टीकोण
दहशतवाद—एवढी जलद वाढ का?
“तुम्हाला जरी अर्धाखंड उडविणे आहे आणि रानटीपणा नष्ट करण्यात रक्ताचा सागर वाहावा लागला तरी ते करण्यात कचरू नका.”—कार्ले हेन्जन, जर्मन क्रांतीकार, १८०९-८०.
डार्टमंड, जर्मनी मधील एका भव्य वस्तुभांडारात जेव्हा बॉम्ब स्फोट झाला तेव्हा दुकानातील पुस्तके, इतर वस्तु अकस्मात हवेत उडाल्या. बाजार करण्यास आलेल्यांपैकी आठ जण जखमी झाले. काही गंभीररीत्या जखमी झाले. राजकीय अतिरेक्यांचे हे आणखीन एक अमानुष कृत्य का? नाही. “हा केवळ एक विनोद होता,” असे एका २० वर्षीय तरूणाने, त्याला पोलीस कोठडीत नेताना म्हटले. तथापि, त्याच्या ठिकाणी असलेला राजकारणीय हेतूचा अभाव या कृत्याला दहशतवादाच्या कृत्यापेक्षा कमी लेखत नाही.
केवळ नऊ दिवसात—फेब्रुवारी २८ ते मार्च ८, १९८५—उत्तर आयर्लंड, लेबनन, स्पेन आणि फेडरल रिपब्लीक ऑफ जर्मनीमध्ये या दहशत वादाच्या रक्तपाती हातांनी ७२ लोकांची हत्या केली व २४५ लोकांस जखमी केले. तेव्हापासून दहशत, भय आणि गुन्हेगारीच्या हिंसक गुन्ह्यात सतत वाढ होत आहे.
आपली ध्येये बिंबवण्यासाठी सुसंस्कृत जगातील लोक हिंसाचारी मार्ग का अनुसरीत आहेत? तो कधी ताब्यात आणला जाईल का? किंवा तसे कधी शक्य होईल का? पवित्र शास्त्र याची विश्वसनीय उत्तरे देते.
दहशतवाद का
“दुष्कर्म करणाऱ्यावर जळफळू नको . . . राग सोडून दे. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते.” “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.”—स्तोत्रसंहिता ३७:१, ८; उपदेशक ७:७.
जेव्हा सरकार वारंवार उद्भवणाऱ्या अशांतता, अस्थिर वातावरण किंवा सामाजिक तसेच आर्थिक अन्यायांना आळा घालण्यास असमर्थ ठरते, जेव्हा ते दडपशाहीस व तारतम्य बिघडण्यास परवानगी देतात व काही वेळा प्रोत्साहनही देतात, तेव्हा लोक सहाजिकपणे “जळफळू” लागतात. ते रागाने म्हणतात: ‘काही तरी केले पाहिजे व जर आता नाही तर केव्हा? जर मी नाही तर कोणी?’
काही वेळा वैफल्य कोणा ‘शहाण्यालाही वेड्यासारखे वागविते.’ स्वतःस शहाणा समजून, अहिंसात्मक मार्गी विरोध दर्शविणारा सुरवातीला काहीशी गोंधळ माजविणारी कृत्ये करीतो. पण तीच केवढ्या वेगाने हिंसकतेचे रूप धारण करीतात. याचे उदाहरण आज वर्णभेद आणि आर्थिक अडचणींनी विभागिलेल्या आफ्रिकन देशात दिसते. सुरवातीस शांतीमार्गानी अवलंबिलेले विरोध मोर्चे होते. त्यांचे रूपांतर आज लढाऊ मुकाबल्यात झाले. आज सुमारे पंचवीस वर्षाच्या लढ्यानंतर व अलिकडिल सुधारणेच्या अभिवचनानंतरही टाईम मासिक म्हणते: “या विभाजीत खंडात हिंसेने आपले वर्चस्व कायम राखिले आहे.”
“दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानव पुत्राचे हृदय दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.”—उपदेशक ८:११.
हे सर्वसंमत आहे की गुन्हेगारांना पकडणे आणि न्यायालयाधीन करणे हे अत्यंत कठीण काम बनले आहे. काही ठिकाणी आरोपी बरोबरील व्यवहारांत न्यायालये अत्यंत सौम्य बनतात. यालाच जोडून हेही आहे की न्यायालयातील कामकाजही एवढे वाढले आहे की: “दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ” देण्यात अधिकृतांना पुरेसा वेळ मिळत नाही. शिवाय आम्हाठायी जी मिश्रित विचारधारा घोळते जी गुन्हेगाराचे “हृदय दुष्कर्म करण्याकडे (पूर्णपणे) प्रवृत्त” करण्यात हातभार लाविते. जर सरकारांना “नेहमीच्या” गुन्ह्यांना यशस्वीरित्या तोंड देणारे मार्ग सापडत नाहीत, तर जो आंतरराष्ट्रीय दहशतवाद, त्याच्याबद्दल तर फारच कमी—यामुळेच अनेकांना तसाही प्रयत्न करण्याचा मोह टाळता येत नाही.
पण आज एवढी जलद वाढ का?
“शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, . . . मनुष्ये स्वार्थी . . . कृतघ्न, अपवित्र (विश्वासघाती), ममताहीन, शांतताद्वेषी . . . असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, . . . अशी ती होतील.”—२ तिमथ्यी ३:१-३.
पवित्र शास्त्रीय कालगणना आणि भविष्यवादांची होत असलेली पूर्णता हे सूचीत करीतात की आमचीच ही पिढी जी “कठीण दिवसांच्या” सूचक चिन्हांनी भरलेल्या “शेवटल्या काळी,” जगत आहे. आपण असे म्हणणार नाही का की, अनेक पुरुष आणि स्त्रिया, वर उल्लेखित गुणांनी स्वतःस भूषवीत असता, दहशतवादांच्या भावी दृश्यांचे संभवनीय शिल्पकार असतील? जसजसा त्यांच्या विनाशाचा “शेवटला काळ” संपत आहे, तसतशी जरी त्यांच्या संख्येत वाढ होत आहे तरी आम्हास त्याबद्दल तितकेसे नवल वाटू नये की मानवी समाजाच्या प्रत्यके भागात हिंसाचार सतत का वाढत आहे.
“देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली असून ती घोर कर्मांनी भरली” आहे. “नोहाच्या दिवसातल्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे दिवसात होईल.”—उत्पत्ति ६:११, १३; मत्तय २४:३७.
नोहाचे दिवसात, ज्यांनी स्वतःस दुरात्मे बनविले त्या, देवाच्या आत्मिक पुत्रांनी एका हिंसात्मक कृत्यानी भरलेल्या जगतास उदयास आणण्यात एक महत्वाची भूमिका पार पाडली. (उत्पत्ति ६:१-५) या दुष्ट प्राण्यांना आज मानवजातीशी, जसा त्या काळी संपर्क साधण्यास मानवी शरीर धारण करता येई, तसे करता येत नाही, तरी ते अप्रत्यक्ष अदृश्यतेतून मरण प्राय हल्ले करण्यात आजही कमकुवत नाहीत.
आज, येशू ख्रिस्त, जो गौरवप्राप्त “मनुष्याचा पुत्र” याच्या “दिवसांत” जगत असता, जग हे हिंसाचारी वृत्तीच्या कृत्यांमुळे रक्तबंबाळ झालेले असणार हेच आम्ही अपेक्षू शकतो. खरोखरी जसे येशूने भाकीत केले होते तेच पहात आहोत. “अधर्म, (अराजकता)” वाढले आहेत. (मत्तय २४:१२) हे याकारणास्तव खरे ठरत आहे कारण “दियाबल व सैतान म्हटलेला . . . ह्याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याजबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.” याचा परिणाम काय झाला? “पृथ्वी व समुद्र यांवर अनर्थ ओढवला आहे. कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरून तुम्हाकडे गेला आहे.” (प्रकटीकरण १२:७-१२) मग हे, आज जो दहशतवाद जगांत एवढ्या झपाट्याने वाढत आहे त्याचे एक मुख्य कारण असू शकत नाही का?
प्रसूतीच्या वेदना
येशूने, त्याच्या राज्य स्थापनेनंतर व या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या नाशाआधीच्या मध्यंतराच्या काळात अनेक घटना घडण्याबद्दल आधीच भाकीत केले होते. (मत्तय २४; मार्क १३; लूक २१) त्याने म्हटले, जे मार्क १३:८ मध्ये लिखीत आहे: “हा वेदनांचा प्रारंभ होय.” जसे मनुष्य जन्मवेळच्या वेदना, जस जसा जन्म जवळ येतो तसतशा वाढत असतात, तसेच येशूने “शेवटल्या काळी” घडणाऱ्या चिन्हांच्या वेदना जशा संख्येत तशाच तीव्रतेतही वाढत राहतील.
मग यात नवल ते काय की दहशतवादाच्या “वेदना” अधिक वाढत आहेत. यामुळे कदाचित सर्व गोष्टींशी अपरिचित असलेले लोक, येशूच्या भविष्यवादाच्या पूर्णतेत: “भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहाण्याने मनुष्ये मूर्च्छित होतील.” पण ज्यांना पुढील शब्दांचा सखोल अर्थ ज्ञात असेल ते होणार नाहीतः “या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा नीट उभे राहा व आपली डोकी वर करा कारण तुमची मुक्तता (दहशतवादापासूनही) समीप आली आहे.”—लूक २१:२६-२८.
[पानांवरील संक्षिप्त आशय]
जेव्हा सरकार समस्यांना यशस्वी लढा देण्यात मागे पडतात तेव्हा लोक “जळफळू” लागतात
[पानांवरील संक्षिप्त आशय]
नोहाच्या दिवसात एक हिंसात्मक जग उदयास आणण्यांत दुरात्म्यांनी सार्थ भूमिका पार पाडली