तुम्ही आपल्या शेजाऱ्याबरोबर शांतीने राहात आहात का?
आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, असे आपल्याला सांगण्यात आले आहे. पण ते नेहमीच सोपे वाटत नाही. शांती राखणे हे कधी कधी जड जाते. तुमच्या शेजाऱ्याच्या घरातून येणारे रॉक संगीत तुमच्या घराच्या भींती हादरवून टाकते. त्यांची मुले तर दंग्याचे माहेरघर करून सोडतात. बाहेर रस्त्यावर तुम्ही खूपच त्रासून जाता. हमरस्त्यावर वाहनचालक तुम्हाला ओलांडून मोठ्या शिताफीने निघून जातात, तुम्ही हॉर्न वाजवून त्यांना इशारा केला की शिवीगाळी, मारामारी व शेवटी हत्याराने जखमी होणे या गोष्टीही घडतात. हा अतिरेक वाटतो का? मोठ्या शहरात नव्हे पण काही ठिकाणी असे घडते. उपनगरात व ग्रामीण भागात वेगवेगळ्या समस्या आहेत. या सर्वांमुळे शेजारप्रीती दाखविणे मोठे कठीण होऊन बसते.
यापैकीचा बहुतेक त्रास हा आधुनिक उच्च तांत्रिक व्यवस्थेकरवी उद्भवला आहे. एखाद्या बाटलीत भरलेल्या विंचवाप्रमाणे हजारो लोक शहरात चिकटले गेले आहेत. गर्दीच्या रस्त्यावरुन जाताना प्रवाश्यांना मोठा संताप वाटतो. गावात राहणारे शेजाऱ्याच्या कोंबड्यांनी आपला बाग उद्ध्वस्त केला आहे म्हणून तावातावाने भांडायला येतात. कीटकनाशके मारुनसुध्दा पिकांचे नुकसान काही कीटकामुळे होते हे पाहून शेतकऱ्याला किती यातना होतात. आणि सर्वत्र कारखान्यांनी तर आपले प्रदुषणाचे वायु बाहेर सोडलेच आहेत. हवा तपकिरी बनते, आम्ल पदार्थांचा पाऊस पडतो, तळ्यातील मासे मरताहेत आणि पाणीही विषारी होत आहे हे दिसते आहे. याकरवी आरोग्य बिघडते आणि जीवन लय पावते.
या आणि इतर मार्गी, लोकांच्या भावनांना इजा होते व त्यांचा अधिकाधिक विस्फोट होतो तेव्हा दबाव वाढतो. यापासून पळ काढण्याचा मार्ग म्हणून कित्येक जण दैहिक गोष्टींच्या मागे लागतात. स्वार्थपणाचा मार्ग काही अवलंबून स्वार्थी भौतिकवाद, सामाजिक खेळ, मादक औषधे, स्वैराचारी जीवन याचा मागोवा घेतात. शारीरिक खादाडपणा वाढतो आणि जाणीव असणारा आत्मा लोप पावतो तेव्हा शेजाऱ्यावरील प्रेमावर स्वप्रेम मात करते.
पण तेच अविकसनशील देशात शरीर व आत्मा दोन्ही उपाशी राहतात. क्रांत्या लोकांची नासधूस करतात, मऱ्या लोकांचे बळी घेतात, दुष्काळ देशाची हानि करतो, आशा मरते आणि निराशा राज्य करु लागते.
अशा या आधुनिक व्यवस्थीकरणात शेजाऱ्यावरील प्रेम हे तितकेसे सोपे नाही. तरीही हे शेजारप्रेम अस्तित्वात आहे आणि पुष्कळजण या शेजारप्रेमाचा आनंद घेत आहेत. (g86 1/22)