वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. २५९८-२५९९
  • ख१ बायबलचा संदेश

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख१ बायबलचा संदेश
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इ.स.पू. ४०२६ नंतर
  • इ.स.पू. १९४३
  • इ.स.पू. १०७० नंतर
  • इ.स. २९
  • इ.स. ३३
  • इ.स. १९१४ च्या आसपास
  • भविष्यात
  • तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारी बायबलची पहिली भविष्यवाणी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • सर्पाचे संतान—कसे उघडकीस आणण्यात आले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • बायबलचा भव्य विषय
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • सर्पाचे खरे स्वरुप उघड करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
ख१ बायबलचा संदेश

ख१

बायबलचा संदेश

छापील आवृत्ती

यहोवा देवाला राज्य करायचा अधिकार आहे. त्याची राज्य करायची पद्धत सगळ्यात चांगली आहे. पृथ्वी आणि माणसांसाठी असलेला त्याचा संकल्प पूर्ण होईल.

एदेन बागेत आदाम आणि हव्वा आहेत; त्यांच्या शेजारी साप आहे

इ.स.पू. ४०२६ नंतर

यहोवाच्या राज्य करायच्या अधिकारावर आणि पद्धतीवर ‘सापाने’ प्रश्‍न उपस्थित केला. यहोवाने एक ‘संतती’ किंवा “बीज” उत्पन्‍न करायचं अभिवचन दिलं. ही संतती शेवटी सापाला म्हणजे सैतानाला चिरडेल. (उत्पत्ती ३:१-५, १५, तळटीप) पण यहोवाने लोकांना सापाच्या प्रभावाखाली स्वतःवर राज्य करायला वेळ दिला आहे.

अब्राहाम देवाचं अभिवचन ऐकतो

इ.स.पू. १९४३

यहोवा अब्राहामला सांगतो, की अभिवचन दिलेली ‘संतती’ त्याच्या वंशजांपैकी एक असेल.—उत्पत्ती २२:१८.

दावीद राजा

इ.स.पू. १०७० नंतर

यहोवा दावीद राजाला आणि मग त्याच्या मुलाला, म्हणजे शलमोनला खातरी देतो, की अभिवचन दिलेली ‘संतती’ त्यांच्या वंशातून येईल.—२ शमुवेल ७:१२, १६; १ राजे ९:३-५; यशया ९:६, ७.

येशू त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी

इ.स. २९

दावीदच्या राजासनाचा वारस असलेला येशू हा अभिवचन दिलेली ‘संतती’ आहे, हे यहोवा स्पष्ट करतो.—गलतीकर ३:१६; लूक १:३१-३३; ३:२१, २२.

येशू त्याच्या मृत्यूच्या वेळी

इ.स. ३३

लोकांना येशूला ठार मारायला लावून सैतान थोड्या काळासाठी ‘संततीला’ इजा पोहोचवतो. पण यहोवा येशूला स्वर्गातल्या जीवनासाठी पुन्हा उठवतो आणि त्याच्या परिपूर्ण जीवनाचं मूल्य स्वीकारतो. त्यामुळे आदामच्या वंशजांना पापांची क्षमा आणि सर्वकाळाचं जीवन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.—उत्पत्ती ३:१५; प्रेषितांची कार्यं २:३२-३६; १ करिंथकर १५:२१, २२.

प्रकटीकरणात भविष्यवाणी केल्याप्रमाणे सापाला म्हणजे सैतानाला पृथ्वीवर फेकण्यात आलं

इ.स. १९१४ च्या आसपास

येशू सापाला म्हणजे सैतानाला पृथ्वीवर फेकून देतो. आणि त्याच्यावर काही काळ तिथेच राहायचं बंधन घालतो.—प्रकटीकरण १२:७-९, १२.

प्रकटीकरणात भविष्यवाणी केल्याप्रमाणे येशू आपल्या सिंहासनावरून पृथ्वीवर राज्य करत आहे

भविष्यात

येशू सैतानाला १,००० वर्षांसाठी कैद करेल आणि मग त्याचा नाश करेल, म्हणजे लाक्षणिक अर्थाने त्याचं डोकं ठेचेल. पृथ्वीसाठी आणि माणसांसाठी असलेला यहोवाचा सुरुवातीचा संकल्प पूर्ण होईल. त्याच्या नावावर लावलेला कलंक पुसला जाईल आणि राज्य करायची त्याची पद्धत योग्य आहे हे सिद्ध होईल.—प्रकटीकरण २०:१-३, १०; २१:३, ४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा