वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

शास्ते रूपरेषा

      • मीखाने बनवलेल्या मूर्ती आणि त्याचा याजक (१-१३)

शास्ते १७:१

समासातील संदर्भ

  • +यहो १७:१४, १५

शास्ते १७:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:४; लेवी २६:१; अनु २७:१५

शास्ते १७:५

तळटीपा

  • *

    किंवा “तेराफीम मूर्ती.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प ३१:१९
  • +निर्ग २८:६; शास ८:२७
  • +गण ३:१०; अनु १२:११, १३; २इत १३:८, ९

शास्ते १७:६

समासातील संदर्भ

  • +१शमु ८:४, ५
  • +शास २१:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. २७

शास्ते १७:७

समासातील संदर्भ

  • +मीख ५:२
  • +गण ३:४५; यहो १४:३; १८:७

शास्ते १७:८

समासातील संदर्भ

  • +शास १७:१, ५

शास्ते १७:१०

तळटीपा

  • *

    किंवा “वडील.”

शास्ते १७:१२

समासातील संदर्भ

  • +गण ३:१०; शास १७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२२, पृ. २-३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

शास्ते १७:१यहो १७:१४, १५
शास्ते १७:३निर्ग २०:४; लेवी २६:१; अनु २७:१५
शास्ते १७:५उत्प ३१:१९
शास्ते १७:५निर्ग २८:६; शास ८:२७
शास्ते १७:५गण ३:१०; अनु १२:११, १३; २इत १३:८, ९
शास्ते १७:६१शमु ८:४, ५
शास्ते १७:६शास २१:२५
शास्ते १७:७मीख ५:२
शास्ते १७:७गण ३:४५; यहो १४:३; १८:७
शास्ते १७:८शास १७:१, ५
शास्ते १७:१२गण ३:१०; शास १७:५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
शास्ते १७:१-१३

शास्ते

१७ एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात+ मीखा नावाचा एक माणूस राहायचा. २ तो आपल्या आईला म्हणाला: “तुला आठवतं, कोणीतरी तुझे १,१०० चांदीचे तुकडे चोरले होते आणि माझ्यासमोर तू त्याला शाप देत होतीस? ते माझ्याकडे आहेत. खरंतर मीच ते घेतले होते.” त्यावर त्याची आई त्याला म्हणाली: “माझ्या बाळा, यहोवा तुला आशीर्वाद देवो.” ३ मग त्याने ते १,१०० चांदीचे तुकडे आपल्या आईला परत दिले. पण त्याची आई म्हणाली: “ही चांदी मी यहोवाला समर्पित करते. यापासून तुझ्यासाठी एक कोरीव मूर्ती आणि एक धातूची मूर्ती बनव.+ मग ही चांदी तुझी होईल.”

४ त्याने ते चांदीचे तुकडे आपल्या आईला परत केले, तेव्हा त्यातले २०० तुकडे घेऊन तिने सोनाराला दिले. सोनाराने त्यांपासून एक कोरीव मूर्ती आणि एक धातूची मूर्ती बनवली. मग त्या मूर्ती मीखाच्या घरात ठेवण्यात आल्या. ५ मीखा नावाच्या या माणसाचं एक देवघर होतं. त्याने कुलदैवतांच्या मूर्ती*+ आणि एक एफोद*+ बनवलं आणि आपल्या एका मुलाला याजक म्हणून नेमलं.+ ६ त्या काळात इस्राएलवर कोणीही राजा नव्हता.+ प्रत्येक जण स्वतःला योग्य वाटेल तसं करायचा.+

७ यहूदातल्या बेथलेहेम+ शहरात एक तरुण राहायचा. तो एक लेवी+ असून काही काळापासून यहूदाच्या लोकांमध्ये राहत होता. ८ एक दिवस, त्या तरुणाने यहूदातलं बेथलेहेम शहर सोडलं आणि राहण्यासाठी तो दुसरं एक ठिकाण शोधायला निघाला. प्रवास करत करत तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात राहत असलेल्या मीखाच्या घरी पोहोचला.+ ९ तेव्हा मीखाने त्याला विचारलं: “तू कुठून आलास?” तो म्हणाला: “मी यहूदातल्या बेथलेहेममधून आलोय. मी एक लेवी आहे आणि राहण्यासाठी कुठे जागा मिळते का ते शोधतोय.” १० त्यावर मीखा त्याला म्हणाला: “माझ्याकडेच राहा आणि याजक व सल्लागार* म्हणून माझ्यासाठी काम कर. मी तुला वर्षाला चांदीचे दहा तुकडे आणि कपड्यांचा एक जोड देईन. तसंच तुझ्या खाण्या-पिण्याची व्यवस्थाही करीन.” हे ऐकून तो लेवी त्याच्या घरात गेला. ११ मग तो लेवी मीखाच्या घरात राहायला तयार झाला आणि तो मीखाला आपल्या मुलासारखाच झाला. १२ मीखाने त्या लेवीला आपला याजक म्हणून नेमलं.+ आणि तो मीखाच्या घरात राहू लागला. १३ मीखा म्हणाला: “लेवी वंशाचा माणूस माझा याजक असल्यामुळे यहोवा माझं भलं करेल अशी आता मला खातरी आहे.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा