वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण ९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • पाचवा कर्णा (१-११)

      • एक विपत्ती होऊन गेली, आणखी दोन येणार (१२)

      • सहावा कर्णा (१३-२१)

प्रकटीकरण ९:१

तळटीपा

  • *

    किंवा “खड्ड्याची.”

समासातील संदर्भ

  • +प्रक ८:२
  • +लूक ८:३०, ३१; प्रक ९:११; २०:१-३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४३

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८९, पृ. १७-१८

    १२/१/१९८८, पृ. १९

प्रकटीकरण ९:२

तळटीपा

  • *

    किंवा “खड्डा.”

समासातील संदर्भ

  • +योए २:२, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४३-१४४

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. १९

प्रकटीकरण ९:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४३-१४४

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. १९

प्रकटीकरण ९:४

समासातील संदर्भ

  • +प्रक ७:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४४-१४५, १४७-१४८

प्रकटीकरण ९:५

समासातील संदर्भ

  • +प्रक ९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४४-१४५, १४७-१४८

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. १९

प्रकटीकरण ९:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४४-१४५

प्रकटीकरण ९:७

समासातील संदर्भ

  • +योए २:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४५-१४६, १५३

प्रकटीकरण ९:८

समासातील संदर्भ

  • +योए १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४५-१४६

प्रकटीकरण ९:९

तळटीपा

  • *

    छातीचं संरक्षण करणारं साधन. किंवा “उरस्त्राण.”

समासातील संदर्भ

  • +योए २:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४५-१४६

प्रकटीकरण ९:१०

समासातील संदर्भ

  • +प्रक ९:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३२

    प्रकटीकरण कळस, पृ. १४६-१४८

प्रकटीकरण ९:११

तळटीपा

  • *

    म्हणजे “विनाश.”

  • *

    म्हणजे “विनाशक.”

समासातील संदर्भ

  • +प्रक ९:१; २०:१-३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४३, १४८

प्रकटीकरण ९:१२

समासातील संदर्भ

  • +प्रक ८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४८

प्रकटीकरण ९:१३

समासातील संदर्भ

  • +प्रक ८:६
  • +प्रक ११:१५
  • +प्रक ८:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४८

प्रकटीकरण ९:१४

समासातील संदर्भ

  • +प्रक १६:१, १२; १७:१, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४८-१४९

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. १९

प्रकटीकरण ९:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४९-१५१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. १९

प्रकटीकरण ९:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४९-१५३

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८९, पृ. ३०

    १२/१/१९८८, पृ. १९

प्रकटीकरण ९:१७

समासातील संदर्भ

  • +नीत २८:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४९-१५३

प्रकटीकरण ९:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १४९-१५३

प्रकटीकरण ९:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३२

    ४/१/१९८९, पृ. १९

    १२/१/१९८८, पृ. १९

    प्रकटीकरण कळस, पृ. १५३-१५४

प्रकटीकरण ९:२०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ११५:४-७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३२

    प्रकटीकरण कळस, पृ. १५४

प्रकटीकरण ९:२१

तळटीपा

  • *

    ग्रीक पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३२

    प्रकटीकरण कळस, पृ. १५४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. ९:१प्रक ८:२
प्रकटी. ९:१लूक ८:३०, ३१; प्रक ९:११; २०:१-३
प्रकटी. ९:२योए २:२, १०
प्रकटी. ९:३निर्ग १०:१२
प्रकटी. ९:४प्रक ७:२, ३
प्रकटी. ९:५प्रक ९:१०
प्रकटी. ९:७योए २:४, ५
प्रकटी. ९:८योए १:६
प्रकटी. ९:९योए २:४, ५
प्रकटी. ९:१०प्रक ९:५
प्रकटी. ९:११प्रक ९:१; २०:१-३
प्रकटी. ९:१२प्रक ८:१३
प्रकटी. ९:१३प्रक ८:६
प्रकटी. ९:१३प्रक ११:१५
प्रकटी. ९:१३प्रक ८:३
प्रकटी. ९:१४प्रक १६:१, १२; १७:१, १५
प्रकटी. ९:१७नीत २८:१
प्रकटी. ९:२०स्तो ११५:४-७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण ९:१-२१

योहानला झालेलं प्रकटीकरण

९ पाचव्या स्वर्गदूताने कर्णा वाजवला,+ तेव्हा आकाशातून पृथ्वीवर पडलेला एक तारा मला दिसला. त्याला अथांग डोहाच्या+ भुयाराची* किल्ली देण्यात आली. २ त्याने अथांग डोहाचं भुयार* उघडलं, तेव्हा एखाद्या भल्या मोठ्या भट्टीतून निघावा तसा धूर त्यातून निघाला आणि त्या धुरामुळे सूर्य आणि हवासुद्धा काळवंडली.+ ३ आणि धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले+ आणि त्यांना शक्‍ती देण्यात आली. पृथ्वीवरच्या विंचवांकडे आहे तशी शक्‍ती त्यांना देण्यात आली. ४ त्यांना अशी आज्ञा देण्यात आली की त्यांनी पृथ्वीवरच्या वनस्पतीला, कोणत्याही हिरव्या रोपाला किंवा झाडाला नुकसान पोहोचवू नये, तर ज्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही फक्‍त अशांना हानी करावी.+

५ त्या टोळांना, ठार मारण्याचा नाही, तर लोकांना पाच महिने यातना द्यायचा अधिकार देण्यात आला. एखाद्या विंचवाने माणसाला दंश केल्यावर जशा यातना होतात तशा त्या यातना होत्या.+ ६ त्या दिवसांत लोक मृत्यूचा मार्ग शोधतील, पण त्यांना तो मुळीच सापडणार नाही. ते मरणासाठी आसुसतील, पण मरण त्यांच्यापासून दूर पळेल.

७ टोळांचं स्वरूप, युद्धासाठी तयार केलेल्या घोड्यांसारखं होतं.+ त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखं काहीतरी होतं आणि त्यांचे चेहरे माणसांच्या चेहऱ्‍यांसारखे होते. ८ पण, त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहांच्या दातांसारखे होते.+ ९ त्यांचं कवच* लोखंडी कवचांसारखं होतं आणि त्यांच्या पंखांचा आवाज, युद्धात वेगाने धावणाऱ्‍या बऱ्‍याच घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता.+ १० तसंच, त्यांना शेपट्या आणि विंचवांसारख्या नांग्या होत्या. लोकांना पाच महिने यातना देण्याची शक्‍ती त्यांच्या शेपट्यांमध्ये होती.+ ११ अथांग डोहाचा स्वर्गदूत हा त्यांचा राजा आहे.+ इब्री भाषेत त्याचं नाव अबद्दोन,* तर ग्रीक भाषेत अपुल्लोन* असं आहे.

१२ पहिली विपत्ती होऊन गेली आहे. पाहा! या गोष्टी घडून गेल्यावर आणखी दोन विपत्ती येत आहेत.+

१३ सहाव्या स्वर्गदूताने+ कर्णा वाजवला,+ तेव्हा देवासमोर असलेल्या सोन्याच्या वेदीच्या+ शिंगांतून मला एक आवाज ऐकू आला. १४ तो कर्णा घेतलेल्या सहाव्या स्वर्गदूताला म्हणाला: “महान फरात नदीजवळ+ बांधून ठेवलेल्या चार स्वर्गदूतांना मोकळं कर.” १५ तेव्हा, एकतृतीयांश लोकांना ठार मारण्याकरता ज्या चार स्वर्गदूतांना त्या तासासाठी, दिवसासाठी, महिन्यासाठी आणि वर्षासाठी तयार करण्यात आलं होतं, त्यांना मोकळं करण्यात आलं.

१६ घोडेस्वारांच्या सैन्याची संख्या २० कोटी होती; मी त्यांची ही संख्या ऐकली. १७ दृष्टान्तात मला दिसलेले घोडे आणि त्यांवरचे स्वार असे दिसत होते: त्यांचं कवच धगधगत्या आगीसारखं लाल, गडद निळं आणि गंधकासारखं पिवळं होतं. घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी+ असून त्यांच्या तोंडांतून आग, धूर आणि गंधक बाहेर निघालं. १८ या तीन पीडांमुळे, म्हणजे त्यांच्या तोंडांतून निघणारी आग, धूर आणि गंधक यांमुळे एकतृतीयांश लोक ठार मारले गेले. १९ घोड्यांची शक्‍ती ही त्यांच्या तोंडांत आणि शेपट्यांमध्ये आहे. कारण त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांना डोकी आहेत आणि यांच्या मदतीने ते इजा करतात.

२० पण जे बाकीचे लोक या पीडांमुळे मारले गेले नाहीत, त्यांनी आपल्या कार्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही. त्यांनी दुष्ट स्वर्गदूतांची* आणि ज्यांना पाहता, ऐकता किंवा चालता येत नाही अशा सोन्याच्या, चांदीच्या, तांब्याच्या, दगडाच्या आणि लाकडाच्या मूर्तींची उपासना करण्याचं सोडलं नाही.+ २१ तसंच, त्यांनी केलेले खून, भूतविद्या, अनैतिक लैंगिक कृत्यं* आणि चोऱ्‍या यांबद्दल त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा