वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोशवा १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहोशवा रूपरेषा

      • मनश्‍शेला पश्‍चिमेकडे मिळालेला वारसा (१-१३)

      • योसेफच्या वंशजांना आणखी प्रदेश मिळतो (१४-१८)

यहोशवा १७:१

समासातील संदर्भ

  • +अनु २१:१७
  • +उत्प ४१:५१; ४६:२०; ४८:१७, १८
  • +गण २६:५५; ३३:५४; नीत १६:३३
  • +उत्प ५०:२३; गण २६:२९; १इत ७:१४
  • +अनु ३:१३; यहो १३:३१

यहोशवा १७:२

समासातील संदर्भ

  • +शास ६:११
  • +गण २६:२९-३२

यहोशवा १७:३

समासातील संदर्भ

  • +गण २६:३३

यहोशवा १७:४

समासातील संदर्भ

  • +गण २७:१, २; ३४:१७; यहो १४:१
  • +गण २७:७, ११
  • +गण ३६:६, १२

यहोशवा १७:५

तळटीपा

  • *

    म्हणजे, पूर्वेकडे.

समासातील संदर्भ

  • +यहो १३:२९

यहोशवा १७:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “उजवीकडे.”

समासातील संदर्भ

  • +यहो २०:७; २४:१; १इत ६:६६, ६७
  • +यहो १६:५, ६

यहोशवा १७:८

समासातील संदर्भ

  • +यहो १६:८

यहोशवा १७:९

समासातील संदर्भ

  • +यहो १६:९
  • +यहो १६:८

यहोशवा १७:१०

तळटीपा

  • *

    म्हणजे, भूमध्य समुद्र.

  • *

    म्हणजे, मनश्‍शेच्या लोकांची किंवा मनश्‍शेच्या प्रदेशाची.

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ६

यहोशवा १७:११

समासातील संदर्भ

  • +२रा ९:२७
  • +यहो १२:७, २३
  • +१शमु २८:७
  • +यहो १२:७, २१

यहोशवा १७:१२

समासातील संदर्भ

  • +शास १:२७

यहोशवा १७:१३

समासातील संदर्भ

  • +यहो १६:१०; शास १:३०; २इत ८:८
  • +निर्ग २३:३३; गण ३३:५५; अनु २०:१६, १७; यहो २३:१२, १३; शास १:२८

यहोशवा १७:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “मला.”

  • *

    शब्दशः “चिठ्ठ्या टाकून आणि प्रदेश मापून एकच वाटा.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४८:१९; गण २६:३४, ३७
  • +गण ३३:५४

यहोशवा १७:१५

समासातील संदर्भ

  • +यहो २४:३३
  • +निर्ग ३३:२
  • +उत्प १५:१८-२०

यहोशवा १७:१६

समासातील संदर्भ

  • +यहो १७:११
  • +यहो १९:१७, १८; शास ६:३३
  • +अनु २०:१; शास १:१९

यहोशवा १७:१७

समासातील संदर्भ

  • +यहो १७:१४

यहोशवा १७:१८

समासातील संदर्भ

  • +गण ३३:५३; यहो २०:७; शास ४:५
  • +अनु २०:१; ३१:६; यहो १३:६; नीत २१:३१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहो. १७:१अनु २१:१७
यहो. १७:१उत्प ४१:५१; ४६:२०; ४८:१७, १८
यहो. १७:१गण २६:५५; ३३:५४; नीत १६:३३
यहो. १७:१उत्प ५०:२३; गण २६:२९; १इत ७:१४
यहो. १७:१अनु ३:१३; यहो १३:३१
यहो. १७:२शास ६:११
यहो. १७:२गण २६:२९-३२
यहो. १७:३गण २६:३३
यहो. १७:४गण २७:१, २; ३४:१७; यहो १४:१
यहो. १७:४गण २७:७, ११
यहो. १७:४गण ३६:६, १२
यहो. १७:५यहो १३:२९
यहो. १७:७यहो २०:७; २४:१; १इत ६:६६, ६७
यहो. १७:७यहो १६:५, ६
यहो. १७:८यहो १६:८
यहो. १७:९यहो १६:९
यहो. १७:९यहो १६:८
यहो. १७:१०गण ३४:२, ६
यहो. १७:११२रा ९:२७
यहो. १७:११यहो १२:७, २३
यहो. १७:१११शमु २८:७
यहो. १७:११यहो १२:७, २१
यहो. १७:१२शास १:२७
यहो. १७:१३यहो १६:१०; शास १:३०; २इत ८:८
यहो. १७:१३निर्ग २३:३३; गण ३३:५५; अनु २०:१६, १७; यहो २३:१२, १३; शास १:२८
यहो. १७:१४उत्प ४८:१९; गण २६:३४, ३७
यहो. १७:१४गण ३३:५४
यहो. १७:१५यहो २४:३३
यहो. १७:१५निर्ग ३३:२
यहो. १७:१५उत्प १५:१८-२०
यहो. १७:१६यहो १७:११
यहो. १७:१६यहो १९:१७, १८; शास ६:३३
यहो. १७:१६अनु २०:१; शास १:१९
यहो. १७:१७यहो १७:१४
यहो. १७:१८गण ३३:५३; यहो २०:७; शास ४:५
यहो. १७:१८अनु २०:१; ३१:६; यहो १३:६; नीत २१:३१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहोशवा १७:१-१८

यहोशवा

१७ मग योसेफचा प्रथमपुत्र+ मनश्‍शे+ याच्या वंशाला चिठ्ठ्या टाकून+ जमिनीचा वाटा देण्यात आला. मनश्‍शेचा प्रथमपुत्र, म्हणजे गिलादचा पिता माखीर+ हा एक योद्धा होता. त्यामुळे त्याला गिलाद आणि बाशानचा+ प्रदेश मिळाला. २ आणि मनश्‍शेच्या बाकीच्या वंशजांना, म्हणजे अबियेजेर,+ हेलेक, अस्रीयेल, शखेम, हेफेर आणि शमीदा यांच्या मुलांना त्यांच्या घराण्यांप्रमाणे चिठ्ठ्या टाकून जमिनीचा वाटा देण्यात आला; हे सगळे, योसेफचा मुलगा मनश्‍शे याच्या वंशातून आलेले वेगवेगळ्या घराण्यांचे पुरुष होते.+ ३ पण हेफेरचा मुलगा सलाफहाद+ याला एकही मुलगा नव्हता; त्याला सगळ्या मुलीच होत्या. सलाफहाद हा हेफेरचा, हेफेर हा गिलादचा, गिलाद हा माखीरचा आणि माखीर हा मनश्‍शेचा मुलगा होता. सलाफहादच्या मुलींची नावं महला, नोआ, होग्ला, मिल्का आणि तिरसा अशी होती. ४ त्या मुली एलाजार+ याजक, नूनचा मुलगा यहोशवा आणि इस्राएली लोकांचे प्रधान यांच्याकडे येऊन म्हणाल्या: “आम्हाला आमच्या भाऊबंदांमध्ये वारसा दिला जावा अशी आज्ञा यहोवाने मोशेला दिली होती.”+ त्यामुळे यहोवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना त्यांच्या वडिलांच्या भाऊबंदांसोबत वारसा देण्यात आला.+

५ मनश्‍शेच्या वंशाला यार्देनच्या पलीकडे* मिळालेल्या गिलाद आणि बाशान प्रदेशांशिवाय जमिनीचे आणखी दहा वाटे मिळाले;+ ६ कारण मनश्‍शेच्या मुलांसोबत त्याच्या मुलींनासुद्धा वारसा मिळाला. आणि मनश्‍शेच्या बाकीच्या वंशजांना गिलादचा प्रदेश मिळाला.

७ मनश्‍शेच्या वंशाला मिळालेल्या प्रदेशाची सीमा आशेरपासून, शखेमच्या+ समोर असलेल्या मिखमथाथ+ इथपर्यंत होती; पुढे ती दक्षिणेकडे* असलेल्या एन-तप्पूहाच्या लोकांच्या प्रदेशापर्यंत गेली. ८ तप्पूहाचा+ प्रदेश मनश्‍शेचा झाला, पण मनश्‍शेच्या प्रदेशाच्या सीमेवर असलेलं तप्पूहा शहर मात्र एफ्राईमच्या वंशजांचं होतं. ९ तिथून मनश्‍शेच्या प्रदेशाची सीमा खाली कानाहच्या ओढ्याकडे, ओढ्याच्या दक्षिणेकडे गेली. तिथे मनश्‍शेच्या प्रदेशात एफ्राईमचीही काही शहरं होती,+ आणि मनश्‍शेच्या प्रदेशाची सीमा ओढ्याच्या उत्तरेकडे असून ती शेवटी समुद्रापर्यंत जाऊन संपली.+ १० सीमेच्या दक्षिणेकडचा प्रदेश एफ्राईम वंशाचा, तर उत्तरेकडचा प्रदेश मनश्‍शे वंशाचा होता. मनश्‍शेच्या प्रदेशाची एका बाजूची सीमा महासागर* होती,+ त्यांची* उत्तरेकडची सीमा आशेरच्या प्रदेशापर्यंत, आणि पूर्वेकडची सीमा इस्साखारच्या प्रदेशापर्यंत होती.

११ मनश्‍शे वंशाला इस्साखारच्या आणि आशेरच्या प्रदेशांत बेथ-शान, इब्लाम,+ दोर,+ एन-दोर,+ तानख+ आणि मगिद्दो ही शहरं आणि त्यांत राहणारे लोक देण्यात आले; यांपैकी तीन शहरं डोंगराळ भागातली होती. यासोबतच शहरांच्या आसपासची नगरंही मनश्‍शे वंशाला देण्यात आली.

१२ पण ते या शहरांवर कब्जा मिळवू शकले नाहीत; कारण कनानी लोक तिथून निघून जायला तयार नव्हते.+ १३ इस्राएली लोक जेव्हा शक्‍तिशाली झाले, तेव्हा त्यांनी कनानी लोकांना गुलाम बनवलं;+ पण त्यांनी त्यांना पूर्णपणे घालवून दिलं नाही.+

१४ योसेफचे वंशज यहोशवाला म्हणाले: “आजपर्यंत यहोवाचा आशीर्वाद आमच्यावर असल्यामुळे आमची संख्या खूप वाढली आहे.+ पण असं असूनही तू आम्हाला* वारसा म्हणून एकच वाटा*+ का दिलास?” १५ तेव्हा यहोशवा त्यांना म्हणाला: “तुमची संख्या जर एवढी वाढली आहे आणि एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश+ तुम्हाला कमी पडतोय, तर परिज्जी+ व रेफाई+ लोकांच्या प्रदेशात जा, आणि तिथली जंगलं तोडून स्वतःसाठी जागा करा.” १६ त्यावर योसेफचे वंशज म्हणाले: “हा डोंगराळ प्रदेश आम्हाला खरंच कमी पडतोय. शिवाय बेथ-शान+ खोऱ्‍यात आणि त्याच्या आसपासच्या नगरांत, तसंच इज्रेलच्या खोऱ्‍यात+ राहणाऱ्‍या कनानी लोकांकडे युद्धाचे लोखंडी रथ आहेत,+ आणि त्यांच्या चाकांना लांब सुऱ्‍या आहेत.” १७ मग यहोशवा योसेफच्या घराण्याला, म्हणजे एफ्राईम आणि मनश्‍शे वंशांना म्हणाला: “तुम्ही खरोखरच संख्येने जास्त आहात आणि तुमचं सामर्थ्यही अफाट आहे. त्यामुळे तुम्हाला फक्‍त एक वाटा मिळणार नाही,+ १८ तर तुम्हाला डोंगराळ प्रदेशही मिळेल.+ तिथे जंगल असलं, तरी तुम्ही ते तोडून आपल्यासाठी जागा करू शकाल; आणि ती तुमच्या प्रदेशाची सीमा ठरेल. तिथले कनानी लोक जरी शक्‍तिशाली असले, आणि त्यांच्या लोखंडी रथांच्या चाकांना धारदार सुऱ्‍या असल्या, तरी तुम्ही नक्कीच त्यांना तिथून हाकलून द्याल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा