अनुवाद
३३ खऱ्या देवाचा सेवक मोशे याने आपल्या मरणाआधी इस्राएली लोकांना हा आशीर्वाद दिला.+ २ तो म्हणाला:
“यहोवा सीनाय इथून आला,+
सेईरवरून त्याचा प्रकाश त्याच्या लोकांवर चमकला,
पारानच्या डोंगरांतून त्याचं तेज प्रकट झालं,+
त्याच्यासोबत त्याचे लाखो पवित्र स्वर्गदूत होते,+
त्याचे योद्धे त्याच्या उजव्या हाताला होते.+
७ मग त्याने यहूदाला असा आशीर्वाद दिला:+
“हे यहोवा, यहूदाची प्रार्थना ऐक,+
त्याला त्याच्या लोकांमध्ये पुन्हा घेऊन ये.
त्याने आपल्या हातांनी आपल्या वारशाचं रक्षण केलंय,*
त्याच्या शत्रूंविरुद्ध लढण्यासाठी तू त्याला मदत कर.”+
८ लेवीबद्दल तो असं म्हणाला:+
तू त्याच्याशी मरीबा इथे वाद घातलास,+
९ तो माणूस आपल्या आईवडिलांबद्दल म्हणाला, ‘मी त्यांची पर्वा केली नाही.’
त्याने तर आपल्या भावांनाही नाकारलं,+
आणि स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष केलं.
कारण तो तुझ्या आज्ञांप्रमाणे चालला
आणि त्याने तुझा करार पाळला.+
११ हे यहोवा त्याच्या कष्टांवर आशीर्वाद दे,
त्याच्या हातांचं काम स्वीकार.
त्याच्याविरुद्ध उठणाऱ्यांचे पाय मोडून टाक,
म्हणजे त्याचा द्वेष करणारे पुन्हा डोकं वर काढणार नाहीत.”
१२ तो बन्यामीनबद्दल असं म्हणाला:+
“यहोवाचा प्रिय त्याच्याजवळ सुरक्षित राहो;
आणि तो पूर्ण दिवस त्याला आसरा देवो,
तो त्याच्या पाठीवर* निवास करेल.”
१३ तो योसेफबद्दल असं म्हणाला:+
“त्याच्या जमिनीवर यहोवाचा आशीर्वाद असो.+
त्याला आकाशातल्या चांगल्या गोष्टी,
दव आणि जमिनीखालचे झरे,+
१४ सूर्यामुळे उगवणाऱ्या चांगल्या गोष्टी,
आणि दर महिन्याला येणारं शेताचं चांगलं उत्पन्न मिळो;+
१५ त्याला प्राचीन डोंगरांतल्या* चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी,+
आणि कायम टिकणाऱ्या टेकड्यांवरच्या चांगल्या गोष्टी मिळोत,
१६ पृथ्वी आणि तिच्यावरच्या सर्व चांगल्या गोष्टी+ त्याला मिळोत.
जो झुडपात प्रकट झाला, त्याची कृपा त्याच्यावर होवो.+
आपल्या भावांमधून निवडलेल्याच्या डोक्यावर, योसेफवर हे सर्व आशीर्वाद येवोत.+
१७ त्याचं वैभव पहिल्या जन्मलेल्या बैलासारखं आहे,
त्याची शिंगं रानातल्या बैलाच्या शिंगांसारखी आहेत.
तो आपल्या शिंगांनी राष्ट्रांना ढकलेल,*
अगदी पृथ्वीच्या टोकांपर्यंत तो त्यांना ढकलेल.
ही शिंगं म्हणजे एफ्राईमचे लाखो,+
आणि मनश्शेचे हजारो आहेत.”
१८ जबुलूनबद्दल तो असं म्हणाला:+
१९ ते राष्ट्रांना पर्वताकडे बोलवतील.
तिथे ते नीतीने बलिदानं अर्पण करतील.
ते समुद्रातली संपत्ती,
आणि वाळूतला गुप्त खजिना काढून घेतील.”*
२० तो गादबद्दल असं म्हणाला:+
“गादच्या सीमा वाढवणाऱ्याला आशीर्वाद मिळो.+
तो तिथे सिंहासारखा बसतो,
तो आपल्या शिकारीचा हात आणि डोकं फाडायला तयार असतो.
२१ तो स्वतःसाठी जमिनीचा सर्वोत्तम हिस्सा निवडून घेईल,+
कारण कायदा देणाऱ्याने तो त्याच्यासाठी राखून ठेवला आहे.+
लोकांचे प्रमुख एकत्र येतील.
तो इस्राएलमध्ये यहोवाच्या नीतीप्रमाणे,
त्याच्या न्याय-निर्णयांप्रमाणे कार्य करेल.”
२२ तो दानबद्दल असं म्हणाला:+
“दान सिंहाचा छावा आहे.+
तो बाशानमधून झेप घेईल.”+
२३ नफतालीबद्दल तो म्हणाला:+
“नफताली यहोवाच्या कृपेने
आणि त्याच्या भरपूर आशीर्वादाने संतुष्ट आहे.
जा, पश्चिमेचा आणि दक्षिणेचा ताबा घे.”
२४ आशेरबद्दल तो म्हणाला:+
“देवाच्या आशीर्वादाने आशेरला भरपूर पुत्र झाले.
त्याचे भाऊ त्याच्यावर कृपा करोत,
तो आपले पाय तेलात बुडवो.
२६ तो पुढे म्हणाला, “यशुरूनच्या+ खऱ्या देवासारखा कोण आहे?+
तुझ्या साहाय्यासाठी तो आकाशावर स्वारी करतो,
तो आपल्या वैभवात ढगांवर आरूढ होतो.+
२८ इस्राएल सुरक्षित राहील,
धान्य आणि नवीन द्राक्षारसाच्या देशात,+
आकाशातून दव झिरपणाऱ्या देशात,+
याकोबचा झरा सुखरूप राहील.
२९ हे इस्राएल तू सुखी आहेस!+
तुझ्यासारखं दुसरं कोण आहे?+