वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • शोक करण्याच्या चुकीच्या पद्धती (१, २)

      • शुद्ध आणि अशुद्ध अन्‍न (३-२१)

      • यहोवासाठी दशांश (२२-२९)

अनुवाद १४:१

तळटीपा

  • *

    किंवा “कपाळावरचे केस काढू नका.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:२८
  • +लेवी २१:१, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००४, पृ. २७

अनुवाद १४:२

तळटीपा

  • *

    किंवा “मौल्यवान संपत्ती.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:२; २०:२६; अनु २८:९; १पेत्र १:१५
  • +निर्ग १९:५, ६; अनु ७:६

अनुवाद १४:३

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:४३; २०:२५; प्रेका १०:१४

अनुवाद १४:४

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:२, ३

अनुवाद १४:७

तळटीपा

  • *

    खडकांमध्ये राहणारा सशासारखा एक प्राणी.

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:४-८

अनुवाद १४:९

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:९, १०

अनुवाद १४:१२

तळटीपा

  • *

    किंवा “कैकर.”

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:१३-२०

अनुवाद १४:१५

तळटीपा

  • *

    एक समुद्री पक्षी.

अनुवाद १४:१६

तळटीपा

  • *

    किंवा “छोटं घुबड.”

अनुवाद १४:१७

तळटीपा

  • *

    पाण्यात सूर मारून मासे पकडणारा एक पक्षी. याच्या पायांची बोटं त्वचेच्या पडद्यांनी जोडलेली असतात.

अनुवाद १४:१८

तळटीपा

  • *

    सुतार पक्ष्यासारखा दिसणारा एक पक्षी.

अनुवाद १४:१९

तळटीपा

  • *

    किंवा “कीटकसुद्धा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२१, पृ. २-३

अनुवाद १४:२१

तळटीपा

  • *

    शब्दशः “फाटकांच्या आत.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:३१; लेवी १७:१५
  • +निर्ग २३:१९; ३४:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००४, पृ. २६

अनुवाद १४:२२

तळटीपा

  • *

    किंवा “दशांश.”

समासातील संदर्भ

  • +अनु १२:११; २६:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२१, पृ. १

अनुवाद १४:२३

समासातील संदर्भ

  • +अनु १२:५, १७; १५:१९, २०
  • +स्तो १११:१०

अनुवाद १४:२४

समासातील संदर्भ

  • +अनु १२:५, ६

अनुवाद १४:२६

समासातील संदर्भ

  • +अनु १२:७; २६:११; स्तो १००:२

अनुवाद १४:२७

समासातील संदर्भ

  • +गण १८:२१; २इत ३१:४; १कर ९:१३
  • +गण १८:२०; अनु १०:९

अनुवाद १४:२८

समासातील संदर्भ

  • +अनु २६:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२१, पृ. १

अनुवाद १४:२९

तळटीपा

  • *

    किंवा “वडील नसलेली मुलं.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२१; अनु १०:१८; याक १:२७
  • +अनु १५:१०; स्तो ४१:१; नीत ११:२४; १९:१७; मला ३:१०; लूक ६:३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२१, पृ. १

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. १४:१लेवी १९:२८
अनु. १४:१लेवी २१:१, ५
अनु. १४:२लेवी १९:२; २०:२६; अनु २८:९; १पेत्र १:१५
अनु. १४:२निर्ग १९:५, ६; अनु ७:६
अनु. १४:३लेवी ११:४३; २०:२५; प्रेका १०:१४
अनु. १४:४लेवी ११:२, ३
अनु. १४:७लेवी ११:४-८
अनु. १४:९लेवी ११:९, १०
अनु. १४:१२लेवी ११:१३-२०
अनु. १४:२१निर्ग २२:३१; लेवी १७:१५
अनु. १४:२१निर्ग २३:१९; ३४:२६
अनु. १४:२२अनु १२:११; २६:१२
अनु. १४:२३अनु १२:५, १७; १५:१९, २०
अनु. १४:२३स्तो १११:१०
अनु. १४:२४अनु १२:५, ६
अनु. १४:२६अनु १२:७; २६:११; स्तो १००:२
अनु. १४:२७गण १८:२१; २इत ३१:४; १कर ९:१३
अनु. १४:२७गण १८:२०; अनु १०:९
अनु. १४:२८अनु २६:१२
अनु. १४:२९निर्ग २२:२१; अनु १०:१८; याक १:२७
अनु. १४:२९अनु १५:१०; स्तो ४१:१; नीत ११:२४; १९:१७; मला ३:१०; लूक ६:३५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद १४:१-२९

अनुवाद

१४ तुम्ही तुमचा देव यहोवा याची मुलं आहात. म्हणून एखाद्या मेलेल्या माणसासाठी आपल्या शरीरावर वार करून घेऊ नका+ किंवा आपल्या भुवया काढू नका.*+ २ कारण तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या नजरेत एक पवित्र राष्ट्र आहात.+ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला स्वतःचे लोक, म्हणजेच आपली खास प्रजा* होण्यासाठी, पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या इतर सर्व राष्ट्रांमधून निवडलं आहे.+

३ तुम्ही कोणतीही किळसवाणी गोष्ट खाऊ नका.+ ४ तुम्ही हे प्राणी खाऊ शकता:+ बैल, मेंढा, बकरा, ५ हरीण, सांबर, भेकर, रानबकरी, काळवीट, रानमेंढा आणि डोंगरांतला मेंढा. ६ ज्याचे खूर दुभागलेले आहेत आणि जो रवंथ करतो असा प्रत्येक प्राणी तुम्ही खाऊ शकता. ७ पण जे फक्‍त रवंथ करतात किंवा ज्यांचे फक्‍त खूर दुभागलेले आहेत, त्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ नका: उंट, ससा आणि बिजू,* कारण ते रवंथ तर करतात, पण त्यांचे खूर दुभागलेले नसतात. ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.+ ८ त्याचप्रमाणे डुक्करही खाऊ नका, कारण त्याचे खूर दुभागलेले असतात, पण ते रवंथ करत नाही. ते तुमच्यासाठी अशुद्ध आहे. यांपैकी कोणत्याही प्राण्याचं मांस खाऊ नका किंवा त्याच्या मेलेल्या शरीराला स्पर्शही करू नका.

९ पाण्यातल्या जीवजंतूंपैकी ज्यांना पंख आणि खवले आहेत असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.+ १० पण ज्याला पंख आणि खवले नाहीत, असा कोणताही जीव तुम्ही खाऊ नका. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.

११ तुम्ही कोणताही शुद्ध पक्षी खाऊ शकता. १२ पण तुम्ही हे पक्षी खाऊ नका: गरुड, काळं गिधाड, मासेमारी घार,*+ १३ लाल घार, काळी घार आणि सर्व प्रकारच्या घारी. १४ सर्व प्रकारचे कावळे, १५ शहामृग, घुबड, कुरव,* सर्व प्रकारचे ससाणे, १६ पिंगळा,* लांब कानांचं घुबड, हंस, १७ पाणकोळी, गिधाड, करढोक,* १८ करकोचा, सर्व प्रकारचे बगळे, हुदहुद* आणि वटवाघूळ. १९ पंख असलेला व घोळक्यात राहणारा प्रत्येक जीवसुद्धा* तुमच्यासाठी अशुद्ध आहे. तुम्ही तो खाऊ नका. २० कोणताही उडणारा शुद्ध जीव तुम्ही खाऊ शकता.

२१ मेलेल्या स्थितीत सापडलेला कोणताही प्राणी तुम्ही खाऊ नका.+ तुम्ही तो तुमच्या शहरांमध्ये* राहणाऱ्‍या विदेश्‍याला देऊ शकता किंवा त्याला विकू शकता. तो विदेशी तो प्राणी खाऊ शकतो. कारण तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या नजरेत एक पवित्र राष्ट्र आहात.

तुम्ही बकरीच्या पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात उकळू नका.+

२२ तुम्ही पेरलेल्या बियांपासून तुमच्या शेतात दरवर्षी जे काही उगवेल, त्याचा दहावा भाग* तुम्ही न चुकता द्या.+ २३ तुमचा देव यहोवा आपल्या नावाच्या गौरवासाठी जे ठिकाण निवडेल, तिथे तुम्ही त्याच्यासमोर आपल्या धान्याचा, नवीन द्राक्षारसाचा आणि तेलाचा दहावा भाग, तसंच, तुमच्या गुराढोरांच्या वा मेंढराच्या कळपात पहिल्या जन्मलेल्या प्राण्यांचं मांस खा;+ म्हणजे तुम्ही तुमचा देव यहोवा याचं नेहमी भय मानायला शिकाल.+

२४ पण तुमचा देव यहोवा आपल्या नावाच्या गौरवासाठी जे ठिकाण निवडेल, ते फार दूर असेल आणि जर तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या आशीर्वादामुळे तुम्हाला मिळालेला उपज तिथपर्यंत नेऊ शकत नसला,+ २५ तर तो भाग विका आणि मिळालेले पैसे घेऊन, तुम्ही तुमचा देव यहोवा याने निवडलेल्या ठिकाणी जा. २६ मग तुम्ही त्या पैशांनी गुरंढोरं, मेंढरं, बकऱ्‍या, द्राक्षारस आणि इतर मद्य, यांपैकी तुमची इच्छा असेल त्या वस्तू विकत घ्या; त्या तुमचा देव यहोवा याच्यासमोर आपल्या घराण्यासोबत खा आणि आनंद करा.+ २७ पण तुमच्या शहरांत राहणाऱ्‍या लेव्यांना विसरू नका,+ कारण त्यांना तुमच्यासोबत जमिनीचा वाटा किंवा वारसा देण्यात आलेला नाही.+

२८ दर तीन वर्षांनी तुम्ही त्या वर्षाच्या तुमच्या उत्पन्‍नातला संपूर्ण दहावा भाग आणून, तो तुमच्या शहरांमध्ये जमा करा;+ २९ म्हणजे तुमच्या शहरांत राहणारे विदेशी, अनाथ मुलं,* विधवा, तसंच ज्यांना तुमच्यासोबत जमिनीचा वाटा किंवा वारसा देण्यात आलेला नाही ते लेवी येऊन पोटभर खातील,+ आणि यामुळे तुमचा देव यहोवा तुमच्या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला आशीर्वाद देईल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा