वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • होरेब पर्वतापासून पुढचा प्रवास (१-८)

      • प्रमुखांची आणि न्यायाधीशांची नेमणूक (९-१८)

      • कादेश-बर्ण्या इथे देवाची आज्ञा मोडली (१९-४६)

        • वचन दिलेल्या देशात जायला इस्राएली लोकांचा नकार (२६-३३)

        • कनानवर विजय मिळवण्याचा प्रयत्न फसतो (४१-४६)

अनुवाद १:२

समासातील संदर्भ

  • +अनु ९:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००४, पृ. २५

अनुवाद १:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “इस्राएलच्या मुलांशी.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +गण ३२:१३; ३३:३८

अनुवाद १:४

समासातील संदर्भ

  • +गण २१:२३, २४; यहो १२:१, २
  • +यहो १३:८, १२
  • +गण २१:३३-३५

अनुवाद १:५

समासातील संदर्भ

  • +अनु ४:८; १७:१८; नहे ८:७

अनुवाद १:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१; गण १०:११, १२

अनुवाद १:७

तळटीपा

  • *

    अराबा म्हणजे मैदानी प्रदेश.

  • *

    शेफीला म्हणजे टेकड्यांचा प्रदेश.

  • *

    नेगेब म्हणजे दक्षिणेकडचा प्रदेश.

  • *

    कदाचित लबानोनची पर्वतरांग.

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१६
  • +यहो १२:२, ३
  • +यहो ९:१, २
  • +यहो १३:१, ५; १रा ९:१९
  • +उत्प १५:१८

अनुवाद १:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “बिजाला.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २६:३
  • +उत्प २८:१३
  • +उत्प १२:७; १३:१४, १५; १७:१, ७

अनुवाद १:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:१७, १८

अनुवाद १:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१, ५; निर्ग ३२:१३; गण २६:५१; अनु १०:२२

अनुवाद १:११

समासातील संदर्भ

  • +१रा ३:८
  • +उत्प १२:१-३; २२:१५, १७; २६:३, ४; निर्ग २३:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८९, पृ. २२-२३

अनुवाद १:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:१७, १८; गण ११:११; २०:३

अनुवाद १:१३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०००, पृ. ३२

अनुवाद १:१५

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:२५

अनुवाद १:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:८; अनु १६:१८; योह ७:२४
  • +निर्ग २२:२१; लेवी १९:३४; २४:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९२, पृ. १७

अनुवाद १:१७

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१५; रोम २:११
  • +निर्ग २३:३
  • +नीत २९:२५
  • +२इत १९:६
  • +निर्ग १८:२५, २६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००४, पृ. २५

    १०/१/१९९२, पृ. १७

अनुवाद १:१९

समासातील संदर्भ

  • +गण १३:२९
  • +गण १०:१२; अनु ८:१४, १५; यिर्म २:६
  • +गण १३:२६

अनुवाद १:२१

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२७; अनु १:८

अनुवाद १:२२

समासातील संदर्भ

  • +गण १३:१, २

अनुवाद १:२३

समासातील संदर्भ

  • +गण १३:३

अनुवाद १:२४

समासातील संदर्भ

  • +गण १३:१७

अनुवाद १:२५

समासातील संदर्भ

  • +गण १३:२३-२७

अनुवाद १:२६

समासातील संदर्भ

  • +गण १४:१-४

अनुवाद १:२७

तळटीपा

  • *

    किंवा “मिसरमधून.”

अनुवाद १:२८

तळटीपा

  • *

    म्हणजे, भिंती खूपच उंच होत्या.

  • *

    शब्दशः “आमचं हृदय वितळायला लावलं.”

समासातील संदर्भ

  • +गण १३:२८, ३३
  • +गण १३:२२; यहो ११:२१
  • +गण ३२:९; यहो १४:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१३, पृ. ११

अनुवाद १:२९

समासातील संदर्भ

  • +गण १४:९

अनुवाद १:३०

समासातील संदर्भ

  • +गण १४:२२
  • +निर्ग १४:१४; यहो १०:४२

अनुवाद १:३२

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:२२; १०६:२४; इब्री ३:१६, १९; यहू ५

अनुवाद १:३३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:२१; ४०:३६; गण १०:३३, ३४; स्तो ७८:१४

अनुवाद १:३४

समासातील संदर्भ

  • +गण १४:२८, ३५; ३२:१०-१२; अनु २:१४; स्तो ९५:११; इब्री ३:११

अनुवाद १:३५

समासातील संदर्भ

  • +गण १४:२९, ३५; १कर १०:१, ५; इब्री ३:१७

अनुवाद १:३६

तळटीपा

  • *

    शब्दशः “पूर्णपणे; संपूर्ण रितीने.”

समासातील संदर्भ

  • +गण १४:२४; यहो १४:९

अनुवाद १:३७

समासातील संदर्भ

  • +गण २०:१२; २७:१३, १४; अनु ३:२६; स्तो १०६:३२

अनुवाद १:३८

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुझ्यापुढे उभा राहणारा.”

  • *

    किंवा कदाचित, “देवाने त्याला बळ दिलंय.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३३:११; गण ११:२८
  • +गण १४:३८
  • +गण २७:१८; अनु ३१:७; यहो १:६, ९

अनुवाद १:३९

समासातील संदर्भ

  • +गण १४:३
  • +गण १४:३०, ३१

अनुवाद १:४०

समासातील संदर्भ

  • +गण १४:२५

अनुवाद १:४१

समासातील संदर्भ

  • +गण १४:३९-४५

अनुवाद १:४२

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१४, १७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. १:२अनु ९:२३
अनु. १:३गण ३२:१३; ३३:३८
अनु. १:४गण २१:२३, २४; यहो १२:१, २
अनु. १:४यहो १३:८, १२
अनु. १:४गण २१:३३-३५
अनु. १:५अनु ४:८; १७:१८; नहे ८:७
अनु. १:६निर्ग १९:१; गण १०:११, १२
अनु. १:७यहो १३:१, ५; १रा ९:१९
अनु. १:७उत्प १५:१८
अनु. १:७उत्प १५:१६
अनु. १:७यहो १२:२, ३
अनु. १:७यहो ९:१, २
अनु. १:८उत्प २६:३
अनु. १:८उत्प २८:१३
अनु. १:८उत्प १२:७; १३:१४, १५; १७:१, ७
अनु. १:९निर्ग १८:१७, १८
अनु. १:१०उत्प १५:१, ५; निर्ग ३२:१३; गण २६:५१; अनु १०:२२
अनु. १:१११रा ३:८
अनु. १:११उत्प १२:१-३; २२:१५, १७; २६:३, ४; निर्ग २३:२५
अनु. १:१२निर्ग १८:१७, १८; गण ११:११; २०:३
अनु. १:१३निर्ग १८:२१
अनु. १:१५निर्ग १८:२५
अनु. १:१६निर्ग २३:८; अनु १६:१८; योह ७:२४
अनु. १:१६निर्ग २२:२१; लेवी १९:३४; २४:२२
अनु. १:१७लेवी १९:१५; रोम २:११
अनु. १:१७निर्ग २३:३
अनु. १:१७नीत २९:२५
अनु. १:१७२इत १९:६
अनु. १:१७निर्ग १८:२५, २६
अनु. १:१९गण १३:२९
अनु. १:१९गण १०:१२; अनु ८:१४, १५; यिर्म २:६
अनु. १:१९गण १३:२६
अनु. १:२१निर्ग २३:२७; अनु १:८
अनु. १:२२गण १३:१, २
अनु. १:२३गण १३:३
अनु. १:२४गण १३:१७
अनु. १:२५गण १३:२३-२७
अनु. १:२६गण १४:१-४
अनु. १:२८गण १३:२८, ३३
अनु. १:२८गण १३:२२; यहो ११:२१
अनु. १:२८गण ३२:९; यहो १४:७, ८
अनु. १:२९गण १४:९
अनु. १:३०गण १४:२२
अनु. १:३०निर्ग १४:१४; यहो १०:४२
अनु. १:३२स्तो ७८:२२; १०६:२४; इब्री ३:१६, १९; यहू ५
अनु. १:३३निर्ग १३:२१; ४०:३६; गण १०:३३, ३४; स्तो ७८:१४
अनु. १:३४गण १४:२८, ३५; ३२:१०-१२; अनु २:१४; स्तो ९५:११; इब्री ३:११
अनु. १:३५गण १४:२९, ३५; १कर १०:१, ५; इब्री ३:१७
अनु. १:३६गण १४:२४; यहो १४:९
अनु. १:३७गण २०:१२; २७:१३, १४; अनु ३:२६; स्तो १०६:३२
अनु. १:३८निर्ग ३३:११; गण ११:२८
अनु. १:३८गण १४:३८
अनु. १:३८गण २७:१८; अनु ३१:७; यहो १:६, ९
अनु. १:३९गण १४:३
अनु. १:३९गण १४:३०, ३१
अनु. १:४०गण १४:२५
अनु. १:४१गण १४:३९-४५
अनु. १:४२लेवी २६:१४, १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद १:१-४६

अनुवाद

१ मोशेने इस्राएली लोकांना पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ आणि दी-जाहाब यांच्याजवळ असलेल्या सुफासमोरच्या मैदानांत, रानातल्या यार्देन प्रदेशात या सर्व गोष्टी सांगितल्या. २ (होरेबपासून सेईर पर्वताच्या मार्गाने कादेश-बर्ण्याला+ जायला ११ दिवस लागतात.) ३ चाळीसाव्या वर्षाच्या+ अकराव्या महिन्यातल्या पहिल्या दिवशी, मोशे इस्राएली लोकांशी* बोलला. यहोवाने* ज्या सर्व गोष्टी इस्राएली लोकांना सांगण्याची आज्ञा दिली होती, त्या गोष्टी मोशेने त्यांना सांगितल्या. ४ हेशबोनमध्ये राहणारा अमोऱ्‍यांचा राजा सीहोन+ आणि एद्रईमधल्या अष्ठरोथ+ इथे राहणारा बाशानचा राजा ओग,+ यांना त्याने हरवल्यानंतर हे घडलं. ५ मवाब देशातल्या यार्देनच्या प्रदेशात, मोशे हे नियमशास्त्र लोकांना समजावून सांगू लागला.+ तो म्हणाला:

६ “आपला देव यहोवा, होरेब इथे आपल्याला म्हणाला, ‘या डोंगरांच्या प्रदेशात तुम्ही बराच काळ राहिला आहात.+ ७ आता अमोरी+ लोकांच्या डोंगरांच्या प्रदेशाकडे जायला निघा; तसंच, अराबात,*+ डोंगराळ प्रदेशात, शेफीलामध्ये,* नेगेबमध्ये* आणि समुद्रकिनाऱ्‍याजवळच्या प्रदेशात+ असलेल्या त्यांच्या आसपासच्या राष्ट्रांकडे जा. तुम्ही कनानी लोकांच्या देशात, लबानोनकडे*+ महानदीपर्यंत, म्हणजेच फरात नदीपर्यंत+ जा. ८ पाहा, मी सगळा देश तुमच्यापुढे ठेवला आहे. म्हणून जा आणि यहोवाने तुमच्या वाडवडिलांना, म्हणजेच अब्राहाम, इसहाक+ आणि याकोब+ यांना व त्यांच्यानंतर त्यांच्या संततीला* जो देश देण्याचं वचन दिलं होतं,+ त्याचा ताबा घ्या.’

९ त्या वेळी मी तुम्हाला म्हणालो होतो, ‘आता तुमचा भार मला एकट्याला झेपत नाही.+ १० तुमचा देव यहोवा याने तुम्हाला फलदायी केलं आहे आणि आज तुमची संख्या आकाशातल्या ताऱ्‍यांसारखी अगणित झाली आहे.+ ११ तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा तुम्हाला आणखी हजारपटीने फलदायी करो,+ आणि त्याने वचन दिल्याप्रमाणेच तो तुम्हाला आशीर्वाद देवो.+ १२ पण, तुमच्या सर्वांचा भार मी एकटा कसा वाहू? आणि तुमची भांडणं मी कुठपर्यंत सहन करू?+ १३ म्हणून तुमच्या वंशांतून बुद्धिमान, समजदार आणि अनुभवी माणसं निवडा, म्हणजे मी त्यांना तुमच्यावर प्रमुख म्हणून नेमीन.’+ १४ तेव्हा तुम्ही मला म्हणालात, ‘तू म्हणतोस ते योग्य आहे.’ १५ म्हणून मी तुमच्या वंशांतून बुद्धिमान आणि अनुभवी माणसांना तुमच्यावर प्रमुख म्हणून नेमलं. मी त्यांना हजार जणांवर, शंभर जणांवर, पन्‍नास जणांवर आणि दहा जणांवर नेमलं. तसंच, मी तुमच्या वंशांवर अधिकारीही नेमले.+

१६ त्या वेळी मी तुमच्या न्यायाधीशांना अशी आज्ञा दिली, ‘तुमच्या भावांमधले वाद सोडवताना तुम्ही नीतीने न्याय करा,+ मग कोणाचा वाद आपल्या भावाशी असो किंवा तुमच्यात राहणाऱ्‍या एखाद्या विदेश्‍याशी.+ १७ न्यायनिवाडा करताना पक्षपात करू नका.+ मोठ्या माणसांसारखंच दीनदुबळ्यांचंही ऐकून घ्या.+ माणसांना घाबरू नका,+ कारण न्याय करणारा देव आहे;+ आणि जर एखादा वाद सोडवणं तुम्हाला कठीण जात असेल, तर तो माझ्याकडे आणा. मी तो ऐकेन.’+ १८ तुम्ही ज्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, त्यांबद्दल मी तुम्हाला तेव्हाच आज्ञा दिल्या.

१९ मग आपला देव यहोवा याच्या आज्ञेप्रमाणे आपण होरेबवरून निघालो. तिथून अमोऱ्‍यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे+ जाताना आपल्याला किती मोठ्या आणि भयानक रानातून+ जावं लागलं, हे तुम्ही पाहिलं. मग शेवटी आपण कादेश-बर्ण्याला+ पोहोचलो. २० तेव्हा मी तुम्हाला म्हणालो, ‘आपला देव यहोवा अमोऱ्‍यांचा जो डोंगराळ प्रदेश आपल्याला देणार आहे तिथे तुम्ही पोहोचला आहात. २१ पाहा, तुमचा देव यहोवा याने हा देश तुम्हाला दिला आहे. म्हणून तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जाऊन त्याचा ताबा घ्या.+ अजिबात घाबरू नका.’

२२ पण तुम्ही सर्व जण माझ्याकडे येऊन म्हणालात, ‘आपण काही माणसांना त्या देशाची पाहणी करायला पुढे पाठवू; म्हणजे, आपण कोणत्या रस्त्याने जावं आणि रस्त्यात कशा प्रकारची शहरं लागतील, हे ते येऊन आपल्याला सांगतील.’+ २३ तुम्ही सुचवलेली गोष्ट मला पटली. म्हणून मी तुमच्यातून १२ जणांना, म्हणजे प्रत्येक वंशातून एका माणसाला निवडलं.+ २४ तेव्हा ती माणसं डोंगराळ प्रदेशातून प्रवास करून+ अष्कोलच्या खोऱ्‍यात पोहोचली आणि त्यांनी त्या प्रदेशाची पाहणी केली. २५ परत येताना त्यांनी तिथली काही फळं आणली आणि आपल्याला अशी खबर दिली की, ‘जो देश आपला देव यहोवा आपल्याला देणार आहे, तो चांगला आहे.’+ २६ पण तुम्ही त्या देशात जायला तयार झाला नाहीत आणि तुमचा देव यहोवा याच्या आज्ञेविरुद्ध तुम्ही बंड केलं.+ २७ तुम्ही तुमच्या तंबूंमध्ये कुरकुर करत राहिलात आणि म्हणालात, ‘यहोवा आपला द्वेष करतो. त्यामुळेच अमोऱ्‍यांकडून आपला नाश व्हावा, म्हणून तो आपल्याला इजिप्तमधून* बाहेर घेऊन आला. २८ हे कोणत्या देशात जायला निघालोय आपण? “तिथली माणसं आपल्यापेक्षा उंच-धिप्पाड आहेत, तिथली शहरं मोठी आणि त्यांच्याभोवती असलेल्या भिंती आकाशापर्यंत पोहोचल्या आहेत;*+ शिवाय आम्हाला तिथे अनाकची मुलंही+ दिसली,” असं म्हणून आमच्या भावांनीच आमचं धैर्य खचवलं.’*+

२९ तेव्हा मी तुम्हाला म्हणालो, ‘त्यांना अजिबात घाबरू नका.+ ३० तुमचा देव यहोवा तुमच्यापुढे जाईल आणि जसं त्याने इजिप्तमध्ये तुमच्या डोळ्यांदेखत केलं,+ तसंच आताही तो तुमच्यावतीने लढेल.+ ३१ रानात तुम्ही स्वतः पाहिलं, की जसा एखादा माणूस आपल्या मुलाला कडेवर घेऊन चालतो, तसंच इथे येईपर्यंत तुम्ही जिथेजिथे गेलात, तिथेतिथे तुमचा देव यहोवा याने तुम्हाला सांभाळून नेलं.’ ३२ पण इतकं होऊनही तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यावर विश्‍वास ठेवला नाही.+ ३३ तुम्हाला छावणी करता यावी अशी ठिकाणं शोधण्यासाठी तो तुमच्यापुढे चालत होता. तो रात्री आगीत आणि दिवसा ढगात प्रकट होऊन तुम्ही ज्या मार्गाने चालावं, तो तुम्हाला दाखवत होता.+

३४ या सर्व काळात तुम्ही जे काही बोलत होता ते यहोवाने ऐकलं. यामुळे तो संतापला आणि शपथ घेऊन म्हणाला,+ ३५ ‘जो देश देण्याचं वचन मी तुमच्या वाडवडिलांना दिलं होतं, तो देश या दुष्ट पिढीतला एकही माणूस पाहणार नाही.+ ३६ फक्‍त यफुन्‍नेचा मुलगा कालेब तो देश पाहील. ज्या देशात तो गेला होता तो देश मी त्याला आणि त्याच्या मुलांना देईन, कारण त्याने यहोवाच्या आज्ञा पूर्ण मनाने* पाळल्या आहेत.+ ३७ (यहोवा तर तुमच्यामुळे माझ्यावरही रागावला आणि म्हणाला, “तूही त्या देशात जाणार नाहीस.+ ३८ तुझा सेवक* म्हणजे नूनचा मुलगा यहोशवा,+ हा त्या देशात जाईल.+ त्याला हिंमत दे,*+ कारण तोच इस्राएलला त्या देशावर ताबा मिळवून देईल.”) ३९ आणि तुमच्या ज्या मुलांबद्दल तुम्ही म्हणाला होता, की त्यांना उचलून नेलं जाईल+ आणि ज्या तुमच्या मुलांना आज चांगल्यावाइटातला फरक कळत नाही, ती तुमची मुलं त्या देशात जातील आणि त्यांना मी त्या देशाचा ताबा देईन.+ ४० तुम्ही मात्र मागे वळा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानाकडे निघून जा.’+

४१ यावर तुम्ही मला म्हणाला, ‘आम्ही यहोवाविरुद्ध पाप केलंय. तर आता आमचा देव यहोवा याने आम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ आणि लढू!’ म्हणून तुमच्यापैकी प्रत्येक जण आपली युद्धाची शस्त्रं घेऊन निघाला. डोंगरावर चढून जाणं अगदी सोपं असेल, असं तुम्हाला वाटलं.+ ४२ पण यहोवा मला म्हणाला, ‘त्यांना सांग: “तुम्ही युद्ध करायला वर जाऊ नका, कारण मी तुमच्यासोबत नसेन.+ जर तुम्ही गेलात, तर तुमचे शत्रू तुम्हाला हरवतील.”’ ४३ तेव्हा मी तुमच्याशी बोललो, पण तुम्ही ऐकलं नाही. उलट, तुम्ही यहोवाच्या आज्ञेविरुद्ध बंड केलं आणि धीटपणे डोंगरावर जायचा प्रयत्न केला. ४४ तेव्हा त्या डोंगरात राहणारे अमोरी लोक तुमचा सामना करायला आले आणि ते मधमाश्‍यांसारखे तुमच्यावर तुटून पडले. त्यांनी तुम्हाला सेईरमध्ये, थेट हर्मापर्यंत पळवून लावलं. ४५ मग तुम्ही परत आलात आणि यहोवासमोर रडू लागलात, पण यहोवाने तुमचं ऐकलं नाही आणि तुमच्याकडे लक्षही दिलं नाही. ४६ म्हणूनच, तुम्हाला इतके दिवस कादेशमध्ये राहावं लागलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा