वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • जखऱ्‍या १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

जखऱ्‍या रूपरेषा

      • मूर्तींना आणि खोट्या संदेष्ट्यांना काढून टाकलं जातं (१-६)

        • खोट्या संदेष्ट्यांना लाज वाटेल (४-६)

      • मेंढपाळाला मारलं जाईल (७-९)

        • तिसरा भाग शुद्ध केला जाईल (९)

जखऱ्‍या १३:१

समासातील संदर्भ

  • +यहे ३६:२५, २९

जखऱ्‍या १३:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१३
  • +अनु १३:५

जखऱ्‍या १३:३

समासातील संदर्भ

  • +अनु १३:६-९; १८:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १५

    ६/१/१९८९, पृ. ३२

जखऱ्‍या १३:४

तळटीपा

  • *

    किंवा “संदेष्ट्याचा झगा.”

समासातील संदर्भ

  • +२रा १:८; मत्त ३:४

जखऱ्‍या १३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१५, पृ. १५-१६

जखऱ्‍या १३:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “हातांच्या मधे.” म्हणजे, छातीवर किंवा पाठीवर.

  • *

    किंवा “माझ्यावर प्रेम करणाऱ्‍यांच्या.”

जखऱ्‍या १३:७

तळटीपा

  • *

    किंवा “कळपाची.”

समासातील संदर्भ

  • +यहे ३४:२३; मीख ५:४; योह १०:११; इब्री १३:२०
  • +यश ५३:८; दान ९:२६; प्रेका ३:१८
  • +मत्त २६:३१, ५५, ५६; मार्क १४:२७, ५०; योह १६:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १३-१४

जखऱ्‍या १३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १५

    ६/१/१९८९, पृ. ३२

जखऱ्‍या १३:९

समासातील संदर्भ

  • +मला ३:२, ३
  • +यिर्म ३०:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

जख. १३:१यहे ३६:२५, २९
जख. १३:२निर्ग २३:१३
जख. १३:२अनु १३:५
जख. १३:३अनु १३:६-९; १८:२०
जख. १३:४२रा १:८; मत्त ३:४
जख. १३:७यहे ३४:२३; मीख ५:४; योह १०:११; इब्री १३:२०
जख. १३:७यश ५३:८; दान ९:२६; प्रेका ३:१८
जख. १३:७मत्त २६:३१, ५५, ५६; मार्क १४:२७, ५०; योह १६:३२
जख. १३:९मला ३:२, ३
जख. १३:९यिर्म ३०:२२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
जखऱ्‍या १३:१-९

जखऱ्‍या

१३ त्या दिवशी, दावीदच्या घराण्यासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांसाठी त्यांची पापं आणि अशुद्धता धुऊन काढायला+ एक विहीर खोदली जाईल.”

२ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “त्या दिवशी, मी देशातून मूर्तींचं नामोनिशाण मिटवून टाकीन.+ कोणालाही त्यांची आठवण राहणार नाही. आणि मी देशातून संदेष्ट्यांना आणि अशुद्ध शक्‍तींना घालवून देईन.+ ३ जर कोणी पुन्हा भविष्यवाणी करायला लागला, तर त्याला जन्म देणारे त्याचे आईवडील त्याला म्हणतील: ‘तू यहोवाच्या नावाने खोट्या गोष्टी सांगितल्यास, म्हणून तू जिवंत राहणार नाहीस.’ आणि त्याने भविष्यवाणी केल्यामुळे, त्याला जन्म देणारे त्याचे आईवडीलच त्याला भोसकून मारून टाकतील.+

४ त्या दिवशी, प्रत्येक संदेष्ट्याला आपण पाहिलेल्या दृष्टान्ताबद्दल भविष्यवाणी करताना लाज वाटेल. आणि इतरांना फसवण्यासाठी तो आपला केसाळ झगा*+ घालणार नाही. ५ तो म्हणेल: ‘मी काही संदेष्टा नाही, मी शेती करणारा माणूस आहे. कारण मी तरुण असताना एका माणसाने मला दास म्हणून विकत घेतलं होतं.’ ६ आणि कोणी जर त्याला विचारलं: ‘तुझ्या शरीरावर* या जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल: ‘या जखमा मला माझ्या मित्रांच्या* घरी झाल्या आहेत.’”

 ७ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “हे तलवारी! माझ्या मेंढपाळाविरुद्ध+ ऊठ;

जो माझा सोबती आहे त्याच्याविरुद्ध ऊठ.

मेंढपाळाला मार,+ आणि मेंढरांची* पांगापांग होऊ दे.+

जे साधारण लोक आहेत त्यांच्याविरुद्ध मी आपला हात उचलीन.”

 ८ यहोवा म्हणतो: “संपूर्ण देशात असं होईल, की

त्यातले दोन भाग कापून टाकले जातील आणि त्यांचा नाश होईल.

पण त्यातल्या तिसऱ्‍या भागाला तसंच राहू दिलं जाईल.

 ९ तिसऱ्‍या भागाला मी आगीत टाकून बाहेर काढीन;

चांदी जशी शुद्ध केली जाते, तसं मी त्यांना शुद्ध करीन.

आणि सोनं जसं पारखतात, तसं मी त्यांची पारख करीन.+

ते माझं नाव घेऊन मला हाक मारतील,

आणि मी त्यांना उत्तर देईन.

मी म्हणीन, ‘हे माझे लोक आहेत,’+

आणि ते म्हणतील, ‘यहोवा आमचा देव आहे.’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा