वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय २५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

लेवीय रूपरेषा

      • शब्बाथ वर्ष (१-७)

      • सुटकेचं वर्ष (८-२२)

      • मालमत्ता परत मिळण्याविषयी (२३-३४)

      • गरिबांशी कसं वागावं (३५-३८)

      • दासांबद्दल नियम (३९-५५)

लेवीय २५:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१६
  • +लेवी २६:३४; २इत ३६:२०, २१

लेवीय २५:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१०, ११

लेवीय २५:९

समासातील संदर्भ

  • +लेवी १६:३०; २३:२७, २८

लेवीय २५:१०

तळटीपा

  • *

    किंवा “योबेल वर्ष.”

समासातील संदर्भ

  • +यश ६१:१, २; लूक ४:१८, १९; रोम ८:२०, २१
  • +लेवी २७:२४; गण ३६:४; अनु १५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१९, पृ. ८-९

    नवे जग भाषांतर, पृ. २५४५

लेवीय २५:११

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:५

लेवीय २५:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:११; लेवी २५:६

लेवीय २५:१३

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:२९, ३०; २७:२४

लेवीय २५:१४

समासातील संदर्भ

  • +१शमु १२:३; नीत १४:३१

लेवीय २५:१५

समासातील संदर्भ

  • +लेवी २७:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२१, पृ. ५-६

लेवीय २५:१७

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१३; नीत २२:२२
  • +लेवी २५:४३; नीत १:७; ८:१३
  • +यश ३३:२२

लेवीय २५:१८

समासातील संदर्भ

  • +अनु १२:१०; स्तो ४:८; नीत १:३३

लेवीय २५:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो ६७:६
  • +लेवी २६:३-५

लेवीय २५:२०

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:४, ५; मत्त ६:२५

लेवीय २५:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प २६:१२; अनु २८:८; मला ३:१०

लेवीय २५:२३

समासातील संदर्भ

  • +१रा २१:३
  • +स्तो २४:१
  • +१इत २९:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०११, पृ. १७

लेवीय २५:२५

समासातील संदर्भ

  • +रूथ २:२०; ४:४-६

लेवीय २५:२७

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:५०

लेवीय २५:२८

समासातील संदर्भ

  • +लेवी २७:२४
  • +लेवी २५:१०, १३

लेवीय २५:२९

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:२५-२७

लेवीय २५:३२

समासातील संदर्भ

  • +गण ३५:२, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२१, पृ. ५-६

लेवीय २५:३३

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:२८
  • +गण १८:२०; ३५:२, ४; अनु १८:१

लेवीय २५:३४

समासातील संदर्भ

  • +गण ३५:७; यहो १४:४

लेवीय २५:३५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२१; २३:९; लेवी १९:३४; अनु १०:१८
  • +अनु १५:७; स्तो ४१:१; ११२:५; नीत ३:२७; १९:१७; मार्क १४:७; प्रेका ११:२९; १ती ६:१८; १यो ३:१७

लेवीय २५:३६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२५; अनु २३:१९; स्तो १५:५; नीत २८:८
  • +नीत ८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००४, पृ. २४

लेवीय २५:३७

समासातील संदर्भ

  • +अनु २३:२०; लूक ६:३४, ३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००४, पृ. २४

लेवीय २५:३८

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:७
  • +निर्ग २०:२; १रा ८:५१

लेवीय २५:३९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २१:२; अनु १५:१२
  • +१रा ९:२२

लेवीय २५:४०

तळटीपा

  • *

    किंवा “परक्यासारखा.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:५३

लेवीय २५:४१

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलं.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २१:३; लेवी २५:१०

लेवीय २५:४२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १:१३, १४; १९:५; लेवी २५:५५

लेवीय २५:४३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:७; इफि ६:९; कल ४:१
  • +लेवी २५:१७; उप १२:१३

लेवीय २५:४५

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:३८; यहो ९:२१

लेवीय २५:४६

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:३९, ४३

लेवीय २५:४८

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:२५

लेवीय २५:४९

तळटीपा

  • *

    किंवा “रक्‍ताचा नातेवाईक.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:२६, २७

लेवीय २५:५०

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:१०
  • +लेवी २५:१५, १६
  • +अनु १५:१८

लेवीय २५:५३

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:४०, ४३; कल ४:१

लेवीय २५:५४

तळटीपा

  • *

    किंवा “मुलं.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २१:३

लेवीय २५:५५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:२; लेवी २५:४२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

लेवी. २५:२उत्प १५:१६
लेवी. २५:२लेवी २६:३४; २इत ३६:२०, २१
लेवी. २५:३निर्ग २३:१०, ११
लेवी. २५:९लेवी १६:३०; २३:२७, २८
लेवी. २५:१०यश ६१:१, २; लूक ४:१८, १९; रोम ८:२०, २१
लेवी. २५:१०लेवी २७:२४; गण ३६:४; अनु १५:१
लेवी. २५:११लेवी २५:५
लेवी. २५:१२निर्ग २३:११; लेवी २५:६
लेवी. २५:१३लेवी २५:२९, ३०; २७:२४
लेवी. २५:१४१शमु १२:३; नीत १४:३१
लेवी. २५:१५लेवी २७:१८
लेवी. २५:१७लेवी १९:१३; नीत २२:२२
लेवी. २५:१७लेवी २५:४३; नीत १:७; ८:१३
लेवी. २५:१७यश ३३:२२
लेवी. २५:१८अनु १२:१०; स्तो ४:८; नीत १:३३
लेवी. २५:१९स्तो ६७:६
लेवी. २५:१९लेवी २६:३-५
लेवी. २५:२०लेवी २५:४, ५; मत्त ६:२५
लेवी. २५:२१उत्प २६:१२; अनु २८:८; मला ३:१०
लेवी. २५:२३१रा २१:३
लेवी. २५:२३स्तो २४:१
लेवी. २५:२३१इत २९:१५
लेवी. २५:२५रूथ २:२०; ४:४-६
लेवी. २५:२७लेवी २५:५०
लेवी. २५:२८लेवी २७:२४
लेवी. २५:२८लेवी २५:१०, १३
लेवी. २५:२९लेवी २५:२५-२७
लेवी. २५:३२गण ३५:२, ८
लेवी. २५:३३लेवी २५:२८
लेवी. २५:३३गण १८:२०; ३५:२, ४; अनु १८:१
लेवी. २५:३४गण ३५:७; यहो १४:४
लेवी. २५:३५निर्ग २२:२१; २३:९; लेवी १९:३४; अनु १०:१८
लेवी. २५:३५अनु १५:७; स्तो ४१:१; ११२:५; नीत ३:२७; १९:१७; मार्क १४:७; प्रेका ११:२९; १ती ६:१८; १यो ३:१७
लेवी. २५:३६निर्ग २२:२५; अनु २३:१९; स्तो १५:५; नीत २८:८
लेवी. २५:३६नीत ८:१३
लेवी. २५:३७अनु २३:२०; लूक ६:३४, ३५
लेवी. २५:३८निर्ग ६:७
लेवी. २५:३८निर्ग २०:२; १रा ८:५१
लेवी. २५:३९निर्ग २१:२; अनु १५:१२
लेवी. २५:३९१रा ९:२२
लेवी. २५:४०लेवी २५:५३
लेवी. २५:४१निर्ग २१:३; लेवी २५:१०
लेवी. २५:४२निर्ग १:१३, १४; १९:५; लेवी २५:५५
लेवी. २५:४३निर्ग ३:७; इफि ६:९; कल ४:१
लेवी. २५:४३लेवी २५:१७; उप १२:१३
लेवी. २५:४५निर्ग १२:३८; यहो ९:२१
लेवी. २५:४६लेवी २५:३९, ४३
लेवी. २५:४८लेवी २५:२५
लेवी. २५:४९लेवी २५:२६, २७
लेवी. २५:५०लेवी २५:१०
लेवी. २५:५०लेवी २५:१५, १६
लेवी. २५:५०अनु १५:१८
लेवी. २५:५३लेवी २५:४०, ४३; कल ४:१
लेवी. २५:५४निर्ग २१:३
लेवी. २५:५५निर्ग २०:२; लेवी २५:४२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
लेवीय २५:१-५५

लेवीय

२५ सीनाय पर्वतावर यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात जेव्हा तुम्ही पोहोचाल,+ तेव्हा देश यहोवासाठी शब्बाथ* पाळेल.+ ३ सहा वर्षं तुम्ही आपल्या शेतात बियाणं पेरा. तसंच, सहा वर्षं आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करा आणि देशातून पीक गोळा करा.+ ४ पण सातव्या वर्षी देशासाठी संपूर्ण विश्रांतीचा शब्बाथ असावा. हा यहोवासाठी शब्बाथ असेल. त्या वर्षी तुम्ही आपल्या शेतात पेरणी करू नका किंवा आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करू नका. ५ कापणीनंतर उरलेल्या धान्यातून उगवणारं पीक कापू नका आणि छाटणी न केलेल्या वेलाची द्राक्षं गोळा करू नका. एक वर्ष देशाला संपूर्ण विश्रांती द्या. ६ पण या शब्बाथादरम्यान देशात उगवणारं अन्‍न तुम्ही खाऊ शकता. तुम्ही, तुमचे दास व दासी, तुमचे मजूर आणि तुमच्यामध्ये राहायला आलेले विदेशी ते अन्‍न खाऊ शकतात. ७ तसंच, तुमच्या देशातले पाळीव आणि जंगली प्राणीही ते खाऊ शकतात. देशात जे काही उगवेल ते खाल्लं जाऊ शकतं.

८ तुम्ही सात शब्बाथांची वर्षं मोजा, म्हणजे सात गुणिले सात वर्षं. या सात शब्बाथांचा काळ ४९ वर्षं इतका असेल. ९ मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, म्हणजे प्रायश्‍चित्ताच्या दिवशी+ तुम्ही मोठ्याने शिंग फुंका. शिंगाचा आवाज तुमच्या सबंध देशात ऐकू आला पाहिजे. १० तुम्ही ५० व्या वर्षाला पवित्र माना आणि देशाच्या सर्व रहिवाशांसाठी सुटकेची घोषणा करा.+ ते तुमच्यासाठी सुटकेचं वर्ष* असेल. तुमच्यापैकी प्रत्येकाला त्याची विकलेली जमीन परत मिळेल. तसंच, ज्या कोणाला दास म्हणून विकण्यात आलं होतं, त्याने आपल्या कुटुंबाकडे परत जावं.+ ११ ते ५० वं वर्ष तुमच्यासाठी सुटकेचं वर्ष असेल. त्या वर्षी तुम्ही बियाणं पेरू नका किंवा उरलेल्या धान्यातून आपोआप उगवलेलं पीक कापू नका, तसंच, छाटणी न झालेल्या द्राक्षवेलींची द्राक्षं गोळा करू नका.+ १२ कारण ते सुटकेचं वर्ष आहे. ते तुमच्यासाठी पवित्र असावं. जमिनीतून जे आपोआप उगवेल, फक्‍त तेच तुम्ही खाऊ शकता.+

१३ या सुटकेच्या वर्षात, तुमच्यापैकी प्रत्येकाला त्याची विकलेली जमीन परत मिळेल.+ १४ आपल्या शेजाऱ्‍याला काही विकताना किंवा त्याच्याकडून काही विकत घेताना, एकमेकांना लुबाडू नका.+ १५ आपल्या शेजाऱ्‍याकडून जमीन-जुमला विकत घेताना, सुटकेच्या वर्षानंतर किती वर्षं झाली आहेत हे मोजून किंमत ठरवा. तसंच त्यानेही जमीन विकताना, पीक घेण्याची किती वर्षं उरली आहेत हे मोजून किंमत ठरवावी.+ १६ जर बरीच वर्षं उरली असतील तर तो किंमत वाढवू शकतो आणि थोडीच वर्षं उरली असतील तर त्याने किंमत कमी करावी, कारण खरंतर तो तुम्हाला तितक्या वर्षांदरम्यानची पिकं विकत असतो. १७ तुमच्यापैकी कोणीही आपल्या शेजाऱ्‍याला लुबाडू नये+ आणि तुम्ही आपल्या देवाचं भय मानावं,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे.+ १८ तुम्ही माझ्या नियमांचं आणि माझ्या न्याय-निर्णयांचं पालन केलं, तर तुम्ही या देशात सुरक्षित राहाल.+ १९ देश तुम्हाला भरपूर पीक देईल+ आणि तुम्ही पोटभर खाल आणि तिथे सुरक्षित राहाल.+

२० पण तुम्ही कदाचित म्हणाल: “जर आम्ही सातव्या वर्षी पेरणी केली नाही आणि पीक गोळा केलं नाही, तर आम्ही काय खाणार?”+ २१ मी सहाव्या वर्षी तुमच्यावर माझा आशीर्वाद पाठवीन, म्हणजे जमीन तीन वर्षं पुरेल इतकं पीक देईल.+ २२ मग आठव्या वर्षी तुम्ही पेरणी कराल आणि नवव्या वर्षापर्यंत तुम्ही आधीच्याच पिकातून खाल. जोपर्यंत नवीन पीक येत नाही, तोपर्यंत तुम्ही जुन्या पिकातून खाल.

२३ कोणतीही जमीन कायमची विकली जाऊ नये,+ कारण देशातली जमीन माझी आहे.+ माझ्या दृष्टीने तुम्ही इथे राहायला आलेले विदेशी आणि परके आहात.+ २४ तुमच्या सबंध देशात, जमिनीच्या मूळ मालकाला ती परत विकत घेण्याचा हक्क तुम्ही दिला पाहिजे.

२५ समजा तुमच्या भावाला गरिबी आली आणि त्याला आपली काही जमीन विकावी लागली, तर ती सोडवण्याचा हक्क असलेल्या त्याच्या जवळच्या नातेवाइकाने येऊन आपल्या भावाने विकलेली जमीन परत विकत घ्यावी.+ २६ जर एखाद्याचा कोणी सोडवणारा नसेल, पण पुढे तो स्वतः श्रीमंत झाला आणि त्याच्याजवळ आपली जमीन सोडवून घेण्याइतकी संपत्ती आली, २७ तर त्याने जमीन विकल्यापासून जितकी वर्षं झाली असतील, तितक्या वर्षांच्या पिकांची किंमत मोजावी. मग त्याने ती रक्कम जमिनीच्या मूळ किंमतीतून वजा करून, उरलेली रक्कम जमीन विकत घेणाऱ्‍याला द्यावी. मग त्याला त्याची विकलेली जमीन परत मिळेल.+

२८ पण जर आपली जमीन परत विकत घेण्याइतकी त्याची ऐपत नसेल, तर विकलेली जमीन सुटकेच्या वर्षापर्यंत विकत घेणाऱ्‍याकडेच राहील.+ मग सुटकेच्या वर्षी ती पुन्हा त्याच्या मालकीची होईल आणि त्याला त्याची विकलेली जमीन परत मिळेल.+

२९ एखाद्या माणसाने तटबंदी असलेल्या शहरातलं आपलं घर विकलं, तर ते विकल्यानंतर एका वर्षापर्यंत ते सोडवण्याचा त्याला हक्क असेल; एक संपूर्ण वर्षभर त्याला ते सोडवण्याचा हक्क+ असेल. ३० पण वर्षाच्या शेवटापर्यंत, जर त्याने ते पुन्हा विकत घेतलं नाही, तर तटबंदी असलेल्या शहरातलं ते घर विकत घेणाऱ्‍याचं होईल आणि पिढ्या न्‌ पिढ्या, कायमचं त्याच्या मालकीचं राहील. ते सुटकेच्या वर्षात परत दिलं जाऊ नये. ३१ पण ज्यांच्याभोवती भिंती नाहीत अशा वस्त्यांमधली घरं ही शेतजमिनीचाच भाग समजली जावीत. विकणाऱ्‍याला पुढेही ते घर सोडवण्याचा हक्क राहील आणि सुटकेच्या वर्षी ते घर त्याला परत मिळेल.

३२ लेव्यांच्या शहरांतली+ त्यांची घरं विकल्यानंतर, ती सोडवण्याचा त्यांना कायमचा हक्क राहील. ३३ लेव्यांची मालमत्ता परत विकत घेण्यात आली नाही, तर सुटकेच्या वर्षी त्यांच्या शहरातलं त्यांचं घर त्यांना परत केलं जाईल,+ कारण लेव्यांच्या शहरांतली त्यांची घरं ही इस्राएली लोकांमधली लेव्यांची मालमत्ता आहे.+ ३४ शिवाय, त्यांच्या शहरांभोवती असलेली गुरं चारण्याची जमीन+ विकली जाऊ शकत नाही, कारण ती त्यांचा कायमचा वारसा आहे.

३५ जर तुमच्या जवळपास राहणाऱ्‍या तुमच्या भावाला गरिबी आली आणि तो आपलं पोट भरू शकत नसेल, तर तुमच्यामध्ये राहायला आलेल्या विदेश्‍याला आणि परक्याला+ जशी तुम्ही मदत कराल, तशीच त्याला करा,+ म्हणजे तोही तुमच्यासोबत जिवंत राहील. ३६ त्याच्याकडून व्याज घेऊ नका किंवा आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करू नका.+ तुम्ही आपल्या देवाचं भय मानलं पाहिजे,+ म्हणजे तुमचा भाऊ तुमच्यासोबत जिवंत राहील. ३७ तुम्ही त्याला व्याजाने पैसे देऊ नका+ किंवा आपल्या फायद्यासाठी त्याला अन्‍न देऊ नका. ३८ मी तुमचा देव यहोवा आहे. कनान देश तुम्हाला देण्यासाठी आणि मी तुमचा देव आहे हे सिद्ध करण्यासाठी,+ मीच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलं.+

३९ तुमच्या जवळपास राहणाऱ्‍या तुमच्या भावाला गरिबी आली आणि त्याने स्वतःला तुम्हाला विकलं,+ तर तुम्ही त्याच्याकडून दासासारखे कष्ट करून घेऊ नका.+ ४० तुम्ही त्याच्याशी मजुरासारखा, तुमच्यामध्ये राहायला आलेल्या माणसासारखा* व्यवहार करा.+ सुटकेच्या वर्षापर्यंत त्याने तुमची सेवा करावी. ४१ मग तो आणि त्याची मुलंबाळं* तुम्हाला सोडून आपल्या कुटुंबाकडे जातील. त्याने आपल्या वाडवडिलांकडून मिळालेल्या जमिनीकडे परत जावं.+ ४२ कारण मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणलं आणि ते माझे दास आहेत.+ म्हणून दासाला विकलं जातं, तसं त्यांनी स्वतःला विकू नये. ४३ तुम्ही त्यांच्याशी क्रूरपणे वागू नका+ आणि तुम्ही तुमच्या देवाचं भय माना.+ ४४ तुमचे दास आणि तुमच्या दासी आसपासच्या राष्ट्रांमधून असाव्यात आणि त्यांच्यामधून तुम्ही दास किंवा दासी विकत घेऊ शकता. ४५ तसंच तुमच्यामध्ये राहायला आलेले विदेशी+ आणि तुमच्या देशात त्यांना झालेली मुलं यांमधून तुम्ही आपल्यासाठी दास विकत घेऊ शकता आणि ते तुमच्या मालकीचे होतील. ४६ तुम्ही त्यांना आपल्यानंतर कायमचा वारसा म्हणून आपल्या मुलांना देऊ शकता. तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेऊ शकता, पण आपल्या इस्राएली बांधवांशी तुम्ही कधी क्रूरपणे वागू नका.+

४७ जर तुमच्यामध्ये राहणारा एखादा विदेशी किंवा परका माणूस श्रीमंत झाला आणि तुमच्या भावाला गरिबी आली; आणि जर तुमच्या भावाला स्वतःला त्या विदेशी माणसाला, किंवा परक्याला किंवा त्या विदेशी माणसाच्या एखाद्या नातेवाइकाला विकावं लागलं, ४८ तर स्वतःला विकल्यावरही त्याला स्वतःला सोडवून घेण्याचा हक्क असेल. त्याच्या भावांपैकी एक त्याला परत विकत घेऊ शकतो.+ ४९ किंवा त्याचा काका किंवा त्याच्या काकाचा मुलगा त्याला परत विकत घेऊ शकतो. तसंच, त्याच्या कुटुंबातला कोणताही जवळचा नातेवाईक* त्याला परत विकत घेऊ शकतो.

शिवाय, जर तो स्वतः श्रीमंत झाला असेल, तर तोसुद्धा स्वतःला परत विकत घेऊ शकतो.+ ५० त्याने स्वतःला ज्या वर्षी विकलं, त्या वर्षापासून त्याने सुटकेच्या वर्षापर्यंतचा काळ आपल्या विकत घेणाऱ्‍यासोबत मोजावा.+ त्या वर्षांनुसार त्याच्या विक्रीची किंमत ठरेल.+ त्या वर्षांमध्ये त्याच्या कामाच्या दिवसांची मजुरी, मजुराला दिल्या जाणाऱ्‍या मोबदल्याच्या हिशोबाने मोजली जाईल.+ ५१ जर अजून बरीच वर्षं असतील, तर उरलेल्या वर्षांच्या प्रमाणात त्याने स्वतःला सोडवण्याची किंमत द्यावी. ५२ पण जर सुटकेच्या वर्षासाठी थोडीच वर्षं उरली असतील, तर त्याने तसा हिशोब लावावा आणि उरलेल्या वर्षांच्या प्रमाणात स्वतःला सोडवण्याची किंमत द्यावी. ५३ त्याने दरवर्षी त्याची मजुरासारखी सेवा करावी आणि तो त्याला क्रूरपणे वागवत नाही याची तुम्ही खातरी करावी.+ ५४ पण जर या अटींप्रमाणे तो स्वतःला परत विकत घेऊ शकला नाही, तर तो आणि त्याची मुलंबाळं* सुटकेच्या वर्षी मुक्‍त होतील.+

५५ कारण इस्राएली लोक माझे दास आहेत. मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणलं आणि ते माझे दास आहेत.+ मी तुमचा देव यहोवा आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा