वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय १८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

लेवीय रूपरेषा

      • नियमाविरुद्ध असलेले शरीरसंबंध (१-३०)

        • कनानी लोकांचं अनुकरण करू नका (३)

        • जवळच्या नातेवाइकांशी शरीरसंबंध (६-१८)

        • मासिक पाळी सुरू असताना (१९)

        • समलैंगिक कृत्यं (२२)

        • प्राण्यांसोबत शरीरसंबंध (२३)

        • शुद्ध राहा, नाहीतर देश तुम्हाला ओकून टाकेल (२४-३०)

लेवीय १८:२

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:७; निर्ग ६:७

लेवीय १८:३

तळटीपा

  • *

    किंवा “नियमांप्रमाणे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२४; लेवी २०:२३

लेवीय १८:४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:२२; अनु ४:१

लेवीय १८:५

समासातील संदर्भ

  • +लूक १०:२७, २८; रोम १०:५; गल ३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००९, पृ. ६

लेवीय १८:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “नग्नता उघडी करण्यासाठी.” या आणि पुढच्या वचनांत.

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:१७

लेवीय १८:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “ही तुझ्या वडिलांची नग्नता आहे.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:२२; ४९:४; लेवी २०:११; अनु २७:२०; २शमु १६:२१; १कर ५:१

लेवीय १८:९

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:१७; अनु २७:२२; २शमु १३:१०-१२

लेवीय १८:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्या तुझीच नग्नता आहेत.”

लेवीय १८:१२

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:१९

लेवीय १८:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “वडिलांच्या भावाची नग्नता उघडी करू नको.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:२०

लेवीय १८:१५

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:१२

लेवीय १८:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “ही तुझ्या भावाची नग्नता आहे.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:२१; अनु २५:५; मार्क ६:१७, १८

लेवीय १८:१७

तळटीपा

  • *

    किंवा “लाजिरवाणी वागणूक; बीभत्स.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:१४; अनु २७:२३

लेवीय १८:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प ३०:१५

लेवीय १८:१९

समासातील संदर्भ

  • +लेवी १५:१९, २४; २०:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९१, पृ. २४-२५

लेवीय १८:२०

तळटीपा

  • *

    किंवा “तुझ्या शेजाऱ्‍याच्या; तुझ्या सोबत्याच्या.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:१४; लेवी २०:१०; अनु २२:२२; नीत ६:२९; मत्त ५:२७, २८; १कर ६:९, १०; इब्री १३:४

लेवीय १८:२१

तळटीपा

  • *

    किंवा “वाहू नको; बलिदान करू नको.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:२; अनु १८:१०; १रा ११:७; २रा २३:१०
  • +लेवी २०:३

लेवीय १८:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प १९:५; लेवी २०:१३; शास १९:२२; रोम १:२६, २७; १कर ६:९, १०; यहू ७

लेवीय १८:२३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:१९; लेवी २०:१५, १६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००३, पृ. २७

लेवीय १८:२४

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:२३; अनु १८:१२

लेवीय १८:२५

तळटीपा

  • *

    किंवा “देशातून रहिवाशांना काढून टाकलं जाईल.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१६

लेवीय १८:२६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:४९
  • +लेवी २०:२२; अनु ४:१, ४०

लेवीय १८:२७

समासातील संदर्भ

  • +अनु २०:१७, १८; २रा १६:२, ३; २१:१, २

लेवीय १८:२८

तळटीपा

  • *

    किंवा “जसं त्या देशातून काढून टाकलं जाणार आहे.”

  • *

    किंवा “तसं तुम्हाला काढून टाकलं जाणार नाही.”

लेवीय १८:२९

तळटीपा

  • *

    किंवा “त्या जिवाला.”

लेवीय १८:३०

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:३; २०:२३; अनु १८:९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

लेवी. १८:२उत्प १७:७; निर्ग ६:७
लेवी. १८:३निर्ग २३:२४; लेवी २०:२३
लेवी. १८:४लेवी २०:२२; अनु ४:१
लेवी. १८:५लूक १०:२७, २८; रोम १०:५; गल ३:१२
लेवी. १८:६लेवी २०:१७
लेवी. १८:८उत्प ३५:२२; ४९:४; लेवी २०:११; अनु २७:२०; २शमु १६:२१; १कर ५:१
लेवी. १८:९लेवी २०:१७; अनु २७:२२; २शमु १३:१०-१२
लेवी. १८:१२लेवी २०:१९
लेवी. १८:१४लेवी २०:२०
लेवी. १८:१५लेवी २०:१२
लेवी. १८:१६लेवी २०:२१; अनु २५:५; मार्क ६:१७, १८
लेवी. १८:१७लेवी २०:१४; अनु २७:२३
लेवी. १८:१८उत्प ३०:१५
लेवी. १८:१९लेवी १५:१९, २४; २०:१८
लेवी. १८:२०निर्ग २०:१४; लेवी २०:१०; अनु २२:२२; नीत ६:२९; मत्त ५:२७, २८; १कर ६:९, १०; इब्री १३:४
लेवी. १८:२१लेवी २०:२; अनु १८:१०; १रा ११:७; २रा २३:१०
लेवी. १८:२१लेवी २०:३
लेवी. १८:२२उत्प १९:५; लेवी २०:१३; शास १९:२२; रोम १:२६, २७; १कर ६:९, १०; यहू ७
लेवी. १८:२३निर्ग २२:१९; लेवी २०:१५, १६
लेवी. १८:२४लेवी २०:२३; अनु १८:१२
लेवी. १८:२५उत्प १५:१६
लेवी. १८:२६निर्ग १२:४९
लेवी. १८:२६लेवी २०:२२; अनु ४:१, ४०
लेवी. १८:२७अनु २०:१७, १८; २रा १६:२, ३; २१:१, २
लेवी. १८:३०लेवी १८:३; २०:२३; अनु १८:९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
लेवीय १८:१-३०

लेवीय

१८ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, ‘मी तुमचा देव यहोवा आहे.+ ३ ज्या इजिप्त देशात तुम्ही राहत होता, तिथल्या लोकांसारखं वागू नका. तसंच, ज्या कनान देशात मी तुम्हाला नेणार आहे, त्या लोकांसारखंही वागू नका.+ तुम्ही त्या लोकांच्या रीतींप्रमाणे* चालू नका. ४ तुम्ही माझे न्याय-निर्णय* पाळले पाहिजेत आणि माझ्या नियमांप्रमाणे चाललं पाहिजे.+ मी तुमचा देव यहोवा आहे. ५ तुम्ही माझे नियम आणि माझे न्याय-निर्णय पाळा. जो कोणी असं करेल तो त्यांमुळे जगेल.+ मी यहोवा आहे.

६ तुमच्यापैकी कोणत्याही माणसाने शरीरसंबंध ठेवण्यासाठी* आपल्या जवळच्या नातेवाइकांपैकी कोणाजवळ जाऊ नये.+ मी यहोवा आहे. ७ तू आपल्या वडिलांशी शरीरसंबंध ठेवू नको आणि आपल्या आईशी शरीरसंबंध ठेवू नको. ती तुझी आई आहे आणि तू तिच्याशी शरीरसंबंध ठेवू नये.

८ तू आपल्या वडिलांच्या बायकोशी शरीरसंबंध ठेवू नको.+ हे तुझ्या वडिलांची लाज उघडी करण्यासारखं आहे.*

९ तू आपल्या बहिणीशी, म्हणजे तुझ्या वडिलांच्या मुलीशी किंवा तुझ्या आईच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवू नको; मग तुमचा जन्म एकाच घरात झालेला असो, किंवा वेगवेगळ्या घरांत.+

१० तू आपल्या मुलाच्या मुलीशी किंवा आपल्या मुलीच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवू नको, कारण यामुळे तुझीच बेअब्रू होईल.*

११ तुझ्या वडिलांच्या बायकोला, तुझ्या वडिलांपासून झालेल्या मुलीशी तू शरीरसंबंध ठेवू नको, कारण ती तुझी बहीण आहे.

१२ तू आपल्या आत्याशी शरीरसंबंध ठेवू नको. तिचं तुझ्या वडिलांशी रक्‍ताचं नातं आहे.+

१३ तू आपल्या मावशीशी शरीरसंबंध ठेवू नको, कारण तिचं तुझ्या आईशी रक्‍ताचं नातं आहे.

१४ तू आपल्या काकांच्या बायकोशी शरीरसंबंध ठेवून त्यांची लाज उघडी करू नको.* ती तुझी काकू आहे.+

१५ तू आपल्या सुनेशी शरीरसंबंध ठेवू नको.+ ती तुझ्या मुलाची बायको आहे, म्हणून तू तिच्याशी शरीरसंबंध ठेवू नये.

१६ तू आपल्या वहिनीशी शरीरसंबंध ठेवू नको,+ कारण हे तुझ्या भावाची लाज उघडी करण्यासारखं आहे.*

१७ तू एखाद्या स्त्रीशी आणि तिच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवू नको.+ तू तिच्या नातीशी, मग ती तिच्या मुलाची मुलगी असो, किंवा मुलीची मुलगी असो; तिला आपली बायको करून तिच्याशी शरीरसंबंध ठेवू नको. त्यांच्याशी तिचं जवळचं नातं आहे; हे एक अश्‍लील कृत्य* आहे.

१८ तू आपल्या बायकोच्या बहिणीशी लग्न करून तिला आपल्या बायकोची सवत करू नको,+ आणि तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीशी शरीरसंबंध ठेवू नको.

१९ मासिक पाळीमुळे अशुद्ध असलेल्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवायला तिच्याजवळ जाऊ नको.+

२० तू दुसऱ्‍याच्या* बायकोशी शरीरसंबंध ठेवून स्वतःला अशुद्ध करू नको.+

२१ तू आपल्या मुलांपैकी कोणालाही मोलख दैवताला अर्पण करू नको.*+ असं करून तू आपल्या देवाच्या नावाचा अनादर करू नको.+ मी यहोवा आहे.

२२ तू स्त्रीसोबत शरीरसंबंध ठेवतोस, तसे पुरुषाशी ठेवू नकोस.+ हे घृणास्पद कृत्य आहे.

२३ कोणत्याही माणसाने प्राण्याशी संभोग करून अशुद्ध होऊ नये; तसंच, स्त्रीनेही प्राण्याशी संभोग करायला त्याच्याजवळ जाऊ नये.+ हे अनैसर्गिक कृत्य आहे.

२४ यांपैकी कोणत्याही गोष्टीमुळे स्वतःला अशुद्ध करू नका, कारण ज्या राष्ट्रांना मी तुमच्यासमोरून हाकलून लावणार आहे, त्यांनी याच सर्व गोष्टींमुळे स्वतःला अशुद्ध केलं आहे.+ २५ म्हणूनच, तो देश अशुद्ध झाला आहे आणि मी त्याच्या पापांबद्दल त्याला शिक्षा देईन आणि तो देश आपल्या रहिवाशांना ओकून टाकेल.*+ २६ पण तुमच्यापैकी प्रत्येकाने, मग तो तुमच्या देशाचा रहिवासी असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी असो,+ त्याने माझे नियम आणि न्याय-निर्णय पाळले पाहिजेत+ आणि त्याने यांपैकी कोणत्याही घृणास्पद गोष्टी करू नयेत. २७ कारण तुमच्याआधी त्या देशात राहणाऱ्‍यांनी या सगळ्या घृणास्पद गोष्टी केल्या+ आणि त्यामुळे आता तो देश अशुद्ध आहे. २८ पण जर तुम्ही या प्रकारे त्या देशाला दूषित केलं नाही, तर तुमच्याआधी तिथे राहणाऱ्‍या राष्ट्रांना जसा तो देश ओकून टाकणार आहे,* तसा तुम्हाला ओकून टाकणार नाही.* २९ जर कोणीही यांपैकी कोणतीही घृणास्पद गोष्ट केली, तर त्याला* ठार मारलं जावं. ३० तुमच्याआधी तिथे केल्या जाणाऱ्‍या कोणत्याही घृणास्पद रीती तुम्ही पाळू नका आणि त्यांमुळे स्वतःला अशुद्ध करू नका+ आणि अशा रितीने माझ्याबद्दल असलेलं तुमचं कर्तव्य पूर्ण करा. मी तुमचा देव यहोवा आहे.’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा