होशेय
१३ “एफ्राईम बोलायचा तेव्हा लोक थरथर कापायचे;
तो इस्राएलमध्ये प्रतिष्ठित होता.+
पण बआलमुळे तो दोषी ठरला+ आणि मेला.
२ आता ते आपल्या पापांमध्ये भर घालतात
आणि आपल्या चांदीपासून मूर्ती* बनवतात;+
कारागिरांप्रमाणे ते कुशलतेने मूर्ती बनवतात.
ते त्यांना म्हणतात, ‘बलिदानं देणाऱ्या माणसांनी वासरांचं चुंबन घ्यावं.’+
३ म्हणून ते सकाळच्या मेघांसारखे,
लगेच नाहीशा होणाऱ्या दवासारखे,
वादळाने खळ्यातून* उडून जाणाऱ्या भुशासारखे,
आणि धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरासारखे होतील.
४ पण इजिप्तपासून मीच तुमचा देव यहोवा आहे;+
तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा कोणी देव माहीत नव्हता,
आणि माझ्याशिवाय कोणी तारणकर्ता नाही.+
५ ओसाड रानात, दुष्काळ पडलेल्या देशात मी तुझी काळजी घेतली.+
आणि त्यामुळे ते मला विसरले.+
७ मी त्यांच्यासाठी तरुण सिंहासारखा,+
आणि वाटेवर लपून बसलेल्या चित्त्यासारखा होईन.
८ पिल्लं हरवलेल्या अस्वलीसारखा मी त्यांच्यावर हल्ला करीन,
आणि मी त्यांची छाती* फाडीन.
सिंहासारखा मी त्यांचा फडशा पाडीन.
रानातला जंगली पशू त्यांचे तुकडेतुकडे करेल.
९ हे इस्राएल, तो तुझा नाश करेल,
कारण तू माझ्यावर, तुला मदत करणाऱ्यावर उलटलास.
१० मग आता तुझ्या सर्व शहरांमध्ये तुला सोडवू शकेल, असा तुझा राजा कुठे आहे?+
आणि ‘मला राजा आणि अधिकारी दे,’ असं तू ज्यांच्याबद्दल बोललास, ते तुझे शासक* कुठे आहेत?+
१२ एफ्राईमच्या अपराधाचं गाठोडं बांधलेलं आहे;*
त्याचं पाप साठवून ठेवलेलं आहे.
१३ जन्म देणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला वेदना होतील.
तो एका मूर्ख मुलासारखा आहे;
जन्माच्या वेळी तो गर्भाशयाच्या मुखाजवळ येत नाही.
अरे मरणा, तुझा डंख कुठे आहे?+
अगं कबरे, तुझी नाश करण्याची शक्ती कुठे आहे?+
मी दया दाखवणार नाही.
१५ जरी त्याची गवतामध्ये भरभराट झाली,
तरी पूर्वेचा, म्हणजे यहोवाकडून येणारा वारा
वाळवंटातून येईल आणि त्याची विहीर सुकवेल आणि त्याचा झरा आटवेल.
तो त्याच्या मौल्यवान वस्तूंचा खजिना लुटेल.+
त्यांचा तलवारीने नाश होईल,+
त्यांच्या मुलांना आपटून मारलं जाईल,
आणि त्यांच्या गरोदर बायकांना चिरून टाकलं जाईल.”