यहेज्केल
७ यहोवाकडून मला पुन्हा एकदा संदेश मिळाला. तो म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला, इस्राएल देशाबद्दल सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘अंत आलाय! देशाच्या चारही बाजूंनी अंत आलाय. ३ तुमचा अंत जवळ आलाय. मी तुमच्यावर माझ्या क्रोधाचा पूर्णपणे वर्षाव करीन. तुमच्या वागणुकीप्रमाणेच मी तुमचा न्याय करीन. आणि तुम्ही केलेल्या सगळ्या घृणास्पद कामांचा मी तुमच्याकडून हिशोब घेईन. ४ तुमच्याबद्दल मला अजिबात वाईट वाटणार नाही, किंवा तुमच्यावर मी जरासुद्धा दयामाया करणार नाही.+ तुम्ही ज्याप्रमाणे वागलात, त्याचप्रमाणे मी तुम्हाला फळ देईन. तुमच्या घृणास्पद कामांचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.+ तेव्हा तुम्हाला समजून येईल, की मी यहोवा आहे.’+
५ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘पाहा! एक संकट येत आहे; यापूर्वी कधीही आलं नाही, असं एक संकट लवकरच येत आहे.+ ६ अंत येतोय; तो नक्की येईल; तो अचानक तुमच्यावर कोसळून पडेल. पाहा! अंत येतोय. ७ देशात राहणाऱ्या लोकांनो! आता तुमची वेळ आली आहे.* ती वेळ जवळ येत आहे, तो दिवस जवळ आलाय.+ डोंगरांवरून जल्लोषाचा नाही, तर गडबडीचा, गोंधळ माजल्याचा आवाज ऐकू येतोय.
८ आता लवकरच मी माझ्या क्रोधाचा प्याला तुमच्यावर ओतीन.+ मी तुमच्यावर माझ्या क्रोधाचा पूर्णपणे वर्षाव करीन.+ तुमच्या वागणुकीप्रमाणेच मी तुमचा न्याय करीन. आणि तुम्ही केलेल्या सगळ्या घृणास्पद कामांचा मी तुमच्याकडून हिशोब घेईन. ९ तुमच्याबद्दल मला अजिबात वाईट वाटणार नाही; किंवा तुमच्यावर मी जरासुद्धा दयामाया करणार नाही.+ तुम्ही ज्याप्रमाणे वागलात, त्याचप्रमाणे मी तुम्हाला फळ देईन. तुमच्या घृणास्पद कामांचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तेव्हा तुम्हाला समजून येईल, की मी यहोवा आहे, आणि मीच तुम्हाला शिक्षा करतोय.+
१० पाहा तो दिवस! तो दिवस जवळ येतोय!+ तुमची वेळ आली आहे.* शिक्षा द्यायची माझी छडी तयार आहे आणि शत्रूचाही अहंकार वाढलाय. ११ हिंसाचार वाढत जाऊन तो दुष्टाला शिक्षा करण्याची छडी बनलाय.+ कोणीही वाचणार नाही; ते, त्यांची धनसंपत्ती, त्यांचा जमाव किंवा त्यांची प्रतिष्ठा यांपैकी काहीच उरणार नाही. १२ ती वेळ नक्की येईल. तो दिवस आल्याशिवाय राहणार नाही. विकत घेणाऱ्याने आनंदी होऊ नये आणि विकणाऱ्याने शोक करू नये. कारण त्यांच्या संपूर्ण जमावाविरुद्ध माझा क्रोध भडकलाय.*+ १३ विकणाऱ्याचा जीव जरी वाचला, तरी त्याने जे विकलंय त्याकडे तो परत जाणार नाही. कारण या दृष्टान्तात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी संपूर्ण जमावावर पूर्ण होणार आहेत. कोणीही परत येणार नाही, आणि आपण केलेल्या अपराधामुळे कोणाचाही जीव वाचणार नाही.
१४ त्यांनी कर्णा फुंकलाय+ आणि ते सगळे तयार आहेत. पण युद्ध करायला कोणीही जात नाही. कारण माझा क्रोध त्या संपूर्ण जमावावर भडकलाय.+ १५ बाहेर तलवार आहे,+ आणि आत रोगराई व दुष्काळ आहे. जे शहराबाहेर आहेत ते तलवारीने मरतील, आणि जे शहराच्या आत आहेत ते दुष्काळ आणि रोगराईला बळी पडतील.+ १६ जे कसेबसे निसटून आपला जीव वाचवतील, ते डोंगरांकडे पळून जातील. आणि खोऱ्यात राहणारी कबुतरं जशी घुमत राहतात, तसं ते आपल्या अपराधांमुळे कण्हत राहतील.+ १७ त्यांचे हात लुळे पडतील आणि त्यांच्या गुडघ्यांवरून पाणी गळेल.*+ १८ त्यांनी गोणपाट घातलंय+ आणि भीतीने त्यांचा थरकाप उडालाय. त्यांच्यातल्या प्रत्येकाला लज्जित केलं जाईल आणि प्रत्येकाच्या डोक्याचं मुंडण केलं जाईल.*+
१९ ते आपली चांदी रस्त्यावर फेकून देतील आणि आपल्या सोन्याची त्यांना किळस वाटेल. यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचं सोनं-चांदी त्यांना वाचवू शकणार नाही.+ ते* त्यांना तृप्त करू शकणार नाही किंवा त्यांचं पोट भरू शकणार नाही. कारण ते त्यांच्यासाठी अडखळण्याचं, त्यांच्या अपराधाचं कारण बनलंय. २० त्यांना आपल्या सुंदर दागदागिन्यांचा फार अभिमान वाटायचा. त्यांपासून त्यांनी घृणास्पद प्रतिमा आणि किळसवाण्या मूर्ती बनवल्या.+ म्हणून मी त्यांचं सोनं-चांदी त्यांच्या नजरेत किळसवाणं करीन. २१ मी ते* लूट म्हणून विदेशी लोकांच्या आणि पृथ्वीवरच्या दुष्ट लोकांच्या हाती देईन, आणि ते हा खजिना अशुद्ध करतील.
२२ मी त्यांच्यापासून* माझं तोंड फिरवीन.+ ते* माझं गुप्त स्थान* अशुद्ध करतील. आणि लुटारू त्यात शिरून ते अपवित्र करतील.+
२३ बेड्या* तयार कर.+ कारण अन्यायीपणे सुनावलेल्या शिक्षेमुळे संपूर्ण देश रक्तपाताने भरलाय+ आणि संपूर्ण शहर हिंसाचाराने भरून गेलंय.+ २४ मी राष्ट्रांमधल्या वाइटातल्या वाईट राष्ट्राला घेऊन येईन.+ आणि ते त्यांच्या घरादारांचा ताबा घेतील.+ मी शक्तिशाली लोकांची घमेंड उतरवीन. त्यांची मंदिरं अशुद्ध केली जातील.+ २५ ते जेव्हा दुःखाने त्रासून जातील, तेव्हा ते शांतीचा शोध करतील. पण त्यांना ती मिळणार नाही.+ २६ एकापाठोपाठ एक संकट कोसळेल, आणि एका मागून एक खबर येईल. लोक संदेष्ट्याकडून दृष्टान्ताची अपेक्षा करतील,+ पण त्याचा काही फायदा होणार नाही. याजकांकडून मिळणारं शिक्षण* आणि वडीलजनांचा सल्लाही काहीच उपयोगाचा ठरणार नाही.+ २७ राजा शोक करेल+ आणि प्रधान निराशेची वस्त्रं घालेल. देशातल्या लोकांचे हात भीतीने थरथर कापतील. ते जसं वागले, तसंच मी त्यांच्याशी वागीन. त्यांनी जसा न्याय केला, तसाच मी त्यांचा न्याय करीन. तेव्हा त्यांना समजून येईल, की मी यहोवा आहे.’”+