वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल ४७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • मंदिरातून वाहणारी नदी (१-१२)

        • पाण्याची खोली वाढत जाते (२-५)

        • मृत समुद्राचं पाणी निरोगी होतं (८-१०)

        • दलदलीची ठिकाणं खारीच राहतात (११)

        • झाडांच्या फळांचा खाण्यासाठी आणि पानांचा औषधांसाठी वापर (१२)

      • देशाच्या सीमा (१३-२३)

यहेज्केल ४७:१

समासातील संदर्भ

  • +यहे ४१:२
  • +जख १३:१; १४:८; प्रक २२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०२-२०३, २०६-२०७, २०८-२०९

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००७, पृ. १०-११

    ३/१/१९९९, पृ. १०-११, १८-२०

    ११/१/१९८८, पृ. २७

यहेज्केल ४७:२

समासातील संदर्भ

  • +यहे ४०:२०
  • +यहे ४०:६; ४४:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०६

यहेज्केल ४७:३

तळटीपा

  • *

    हे “लांब हातांचं” माप आहे. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहे ४०:३; प्रक २१:१५

यहेज्केल ४७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०२-२०३, २०६-२०७, २०८-२०९

यहेज्केल ४७:७

समासातील संदर्भ

  • +प्रक २२:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९९, पृ. १०-११

    ७/१/१९९०, पृ. ११

यहेज्केल ४७:८

तळटीपा

  • *

    किंवा “वाळवंटी प्रदेशातून.”

समासातील संदर्भ

  • +अनु ४:४७, ४९
  • +जख १४:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०२-२०५, २०९-२१०

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९०, पृ. ११

    ११/१/१९८८, पृ. २७

यहेज्केल ४७:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०२-२०७, २०९-२१०

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००७, पृ. ११

    ३/१/१९९९, पृ. १०-११, १८-१९, २१-२२

    ११/१/१९८८, पृ. २७

यहेज्केल ४७:१०

तळटीपा

  • *

    म्हणजे, भूमध्य समुद्र.

समासातील संदर्भ

  • +यहो १५:२०, ६२; २इत २०:२
  • +गण ३४:२, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०३-२०५

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९९, पृ. २१

यहेज्केल ४७:११

समासातील संदर्भ

  • +अनु २९:२२, २३; स्तो १०७:३३, ३४; यिर्म १७:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०३-२०८, २०९-२१०

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००७, पृ. ११

    ३/१/१९९९, पृ. २१-२२

यहेज्केल ४७:१२

समासातील संदर्भ

  • +यहे ४७:१
  • +प्रक २२:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०२-२०३, २०५-२०६, २०७-२०८, २१०

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००७, पृ. ११

    ३/१/१९९९, पृ. २१-२२

    ११/१/१९८८, पृ. २७

यहेज्केल ४७:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४८:५; १इत ५:१; यहे ४८:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २१३-२१५

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९९, पृ. १८, २२-२३

    ११/१/१९८८, पृ. २५, २७

यहेज्केल ४७:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प २६:३; २८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २१३-२१६

यहेज्केल ४७:१५

समासातील संदर्भ

  • +यहे ४८:१
  • +गण ३४:२, ८

यहेज्केल ४७:१६

समासातील संदर्भ

  • +गण १३:२१
  • +२शमु ८:८
  • +यहे ४७:१८

यहेज्केल ४७:१७

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ९
  • +यहे ४८:१

यहेज्केल ४७:१८

तळटीपा

  • *

    म्हणजे, मृत समुद्र.

समासातील संदर्भ

  • +गण ३२:१

यहेज्केल ४७:१९

तळटीपा

  • *

    म्हणजे, इजिप्तच्या ओढ्यापर्यंत.

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:५१
  • +यहे ४८:२८

यहेज्केल ४७:२०

तळटीपा

  • *

    किंवा “हमाथच्या प्रवेशद्वाराच्या.”

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ८

यहेज्केल ४७:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २१६-२१७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. ४७:१यहे ४१:२
यहे. ४७:१जख १३:१; १४:८; प्रक २२:१
यहे. ४७:२यहे ४०:२०
यहे. ४७:२यहे ४०:६; ४४:१, २
यहे. ४७:३यहे ४०:३; प्रक २१:१५
यहे. ४७:७प्रक २२:१, २
यहे. ४७:८अनु ४:४७, ४९
यहे. ४७:८जख १४:८
यहे. ४७:१०यहो १५:२०, ६२; २इत २०:२
यहे. ४७:१०गण ३४:२, ६
यहे. ४७:११अनु २९:२२, २३; स्तो १०७:३३, ३४; यिर्म १७:६
यहे. ४७:१२यहे ४७:१
यहे. ४७:१२प्रक २२:१, २
यहे. ४७:१३उत्प ४८:५; १इत ५:१; यहे ४८:५
यहे. ४७:१४उत्प २६:३; २८:१३
यहे. ४७:१५यहे ४८:१
यहे. ४७:१५गण ३४:२, ८
यहे. ४७:१६गण १३:२१
यहे. ४७:१६२शमु ८:८
यहे. ४७:१६यहे ४७:१८
यहे. ४७:१७गण ३४:२, ९
यहे. ४७:१७यहे ४८:१
यहे. ४७:१८गण ३२:१
यहे. ४७:१९अनु ३२:५१
यहे. ४७:१९यहे ४८:२८
यहे. ४७:२०गण ३४:२, ८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल ४७:१-२३

यहेज्केल

४७ मग त्या माणसाने मला परत मंदिराच्या प्रवेशाजवळ आणलं.+ तिथे मला मंदिराच्या उंबरठ्याखालून पूर्व दिशेला पाणी वाहताना दिसलं.+ कारण मंदिराचं तोंड पूर्वेकडे होतं. ते पाणी मंदिराच्या उजव्या बाजूने, वेदीच्या दक्षिणेकडून खाली वाहत होतं.

२ त्यानंतर, त्याने मला उत्तरेकडच्या प्रवेश-इमारतीच्या मार्गाने बाहेर नेलं.+ आणि वळसा घालून पूर्वेकडे तोंड असलेल्या बाहेरच्या प्रवेश-इमारतीकडे आणलं.+ त्या इमारतीच्या उजवीकडून मला पाण्याचा एक छोटासा प्रवाह वाहताना दिसला.

३ मग तो माणूस हातात मोजमापाची दोरी घेऊन पूर्वेकडे गेला.+ त्याने १,००० हात* अंतर मोजून मला त्या पाण्यातून चालायला लावलं. तिथे पाणी माझ्या पायाच्या घोट्यापर्यंत होतं.

४ पुढे त्याने आणखी १,००० हात अंतर मोजलं आणि मला पाण्यातून चालायला लावलं. तिथे पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत होतं.

तिथून पुढे त्याने परत १,००० हात अंतर मोजून मला त्या पाण्यातून चालायला लावलं, तेव्हा पाणी कमरेपर्यंत लागलं.

५ त्याने आणखी १,००० हात अंतर मोजलं, पण तोपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढून त्याची नदी झाली होती. आणि मला त्या पाण्यातून चालणं अशक्य होतं. पाणी इतकं खोल होतं, की त्यातून एखाद्याला पोहूनच जावं लागणार होतं; त्यातून चालणं शक्य नव्हतं.

६ तेव्हा त्या माणसाने मला विचारलं: “मनुष्याच्या मुला, तू हे पाहतोस ना?”

मग तो मला चालवत परत नदीकिनारी घेऊन आला. ७ मी किनाऱ्‍यावर आलो तेव्हा पाहिलं, की नदीच्या दोन्ही किनाऱ्‍यांवर भरपूर झाडं होती.+ ८ मग तो मला म्हणाला: “हे पाणी पूर्वेच्या प्रदेशाकडे वाहतं, आणि अराबामधून*+ वाहत-वाहत समुद्राला जाऊन मिळतं. हे पाणी समुद्राला जाऊन मिळेल,+ तेव्हा समुद्राचं पाणी निरोगी होईल. ९ जिथे कुठे हे पाणी वाहील तिथे भरपूर जीवजंतू जगतील. तिथे भरमसाट मासे असतील, कारण हे पाणी तिथे वाहील. समुद्राचं पाणी निरोगी होईल, आणि जिथे-जिथे नदीचं हे पाणी वाहील तिथे-तिथे जीवन असेल.

१० मासेमारी करणारे एन-गेदीपासून+ एन-इग्लाईमपर्यंत समुद्रकिनाऱ्‍यावर उभे राहतील, आणि तिथे मासेमारीचं जाळं सुकवायची जागा असेल. महासागरासारखंच*+ तिथेही वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर मासे असतील.

११ तिथे दलदलीच्या आणि चिखलाच्या काही जागा असतील. पण त्या निरोगी होणार नाहीत; त्या खाऱ्‍याच राहतील.+

१२ नदीच्या दोन्ही किनाऱ्‍यांवर सर्व प्रकारची फळं देणारी झाडं असतील. त्यांची पानं कोमेजणार नाहीत आणि ती फळं द्यायचं कधीच बंद करणार नाहीत. मंदिरातून वाहणारं पाणी त्यांना मिळत असल्यामुळे ती दर महिन्याला फळं देतील.+ त्यांची फळं अन्‍न म्हणून आणि पानं औषध म्हणून वापरली जातील.”+

१३ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “तुम्ही हा देश इस्राएलच्या १२ वंशांना त्यांचा वारसा म्हणून वाटून द्या. आणि योसेफला त्यातले दोन हिस्से द्या.+ १४ हा देश तुम्हाला वारसा म्हणून मिळेल आणि तुम्हाला त्यात एकसारखे वाटे मिळतील. मी तुमच्या वाडवडिलांना हा देश द्यायची शपथ घेतली होती.+ आणि आता तो तुम्हाला वारसा म्हणून दिला जातोय.

१५ देशाची उत्तरेकडची सीमा ही आहे: महासागरापासून हेथलोनच्या+ रस्त्याने सदादपर्यंत;+ १६ आणि तिथून हमाथ,+ बेरोथाह,+ आणि सिब्राईमपर्यंत (सिब्राईम हे दिमिष्क आणि हमाथ या प्रदेशांच्या मधे आहे), आणि पुढे हौरानच्या+ सीमेजवळ असलेल्या हासेर-हत्तीकोनपर्यंत. १७ अशा प्रकारे ही सीमा समुद्रापासून थेट हसर-एनोनपर्यंत+ असेल. ती उत्तरेकडे दिमिष्कच्या सीमेला लागून आणि हमाथच्या+ सीमेला लागून असेल. ही उत्तरेकडची सीमा आहे.

१८ देशाची पूर्वेकडची सीमा ही हौरान व दिमिष्कच्या मधून, आणि गिलाद+ व इस्राएल देशाच्या मधे असलेल्या यार्देनला लागून जाते. तुम्ही उत्तरेच्या सीमेपासून पूर्वेकडच्या समुद्रापर्यंतचं* अंतर मोजा. ही पूर्वेकडची सीमा आहे.

१९ दक्षिणेकडची सीमा तामारपासून मरीबोथ-कादेशच्या+ जलाशयांपर्यंत असेल; तिथून ती खोऱ्‍यापर्यंत* आणि पुढे महासागरापर्यंत+ असेल. ही दक्षिणेकडची सीमा आहे.

२० पश्‍चिमेकडची सीमा ही आहे: दक्षिणेकडच्या सीमेपासून वर लेबो-हमाथच्या*+ समोर असलेल्या जागेपर्यंतचा महासागर. ही पश्‍चिमेकडची सीमा आहे.”

२१ “तुम्ही इस्राएलच्या १२ वंशांमध्ये हा देश वाटून घ्या. २२ तुम्ही तो वारसा म्हणून आपसात वाटून घ्या. तसंच, ज्या विदेश्‍यांना तुमच्यामध्ये राहून मुलंबाळं झाली आहेत, त्यांनाही देश वाटून द्या. ते तुमच्यासाठी इस्राएलमध्ये जन्म झालेल्यांसारखेच असतील. इस्राएलच्या वंशांसोबत त्यांनाही वारसा मिळेल. २३ विदेशी माणूस ज्या वंशाच्या प्रदेशात राहतोय, त्याच प्रदेशात त्याला वारसा दिला जावा,” असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा