वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल ४६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • खास दिवसांसाठी असलेली अर्पणं (१-१५)

      • प्रधानाच्या मालमत्तेचा वारसा (१६-१८)

      • बलिदानाचं मांस शिजवण्याच्या जागा (१९-२४)

यहेज्केल ४६:१

समासातील संदर्भ

  • +यहे ४०:३२
  • +निर्ग २०:९
  • +यहे ४४:१, २

यहेज्केल ४६:२

समासातील संदर्भ

  • +यहे ४४:३

यहेज्केल ४६:३

समासातील संदर्भ

  • +स्तो ८१:३; यश ६६:२३

यहेज्केल ४६:४

समासातील संदर्भ

  • +गण २८:९, १०; यहे ४५:१७

यहेज्केल ४६:५

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

  • *

    अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहे ४६:११

यहेज्केल ४६:६

तळटीपा

  • *

    किंवा “तरणा बैल.”

समासातील संदर्भ

  • +गण २८:११-१५

यहेज्केल ४६:८

समासातील संदर्भ

  • +यहे ४६:२

यहेज्केल ४६:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१४; अनु १६:१६
  • +यहे ४०:२०
  • +यहे ४०:२४

यहेज्केल ४६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९९, पृ. १६

यहेज्केल ४६:११

समासातील संदर्भ

  • +यहे ४५:२१, २४; ४६:६, ७

यहेज्केल ४६:१२

समासातील संदर्भ

  • +लेवी १:३
  • +यहे ४५:१७
  • +यहे ४६:१, २

यहेज्केल ४६:१३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २९:३८; गण २८:३, ५

यहेज्केल ४६:१७

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:१०

यहेज्केल ४६:१९

समासातील संदर्भ

  • +यहे ४२:९
  • +यहे ४२:१

यहेज्केल ४६:२०

समासातील संदर्भ

  • +लेवी २:४, ५
  • +यहे ४४:१९

यहेज्केल ४६:२२

तळटीपा

  • *

    हे “लांब हातांचं” माप आहे. अति. ख१४ पाहा.

यहेज्केल ४६:२४

समासातील संदर्भ

  • +२इत ३५:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. ४६:१यहे ४०:३२
यहे. ४६:१निर्ग २०:९
यहे. ४६:१यहे ४४:१, २
यहे. ४६:२यहे ४४:३
यहे. ४६:३स्तो ८१:३; यश ६६:२३
यहे. ४६:४गण २८:९, १०; यहे ४५:१७
यहे. ४६:५यहे ४६:११
यहे. ४६:६गण २८:११-१५
यहे. ४६:८यहे ४६:२
यहे. ४६:९निर्ग २३:१४; अनु १६:१६
यहे. ४६:९यहे ४०:२०
यहे. ४६:९यहे ४०:२४
यहे. ४६:११यहे ४५:२१, २४; ४६:६, ७
यहे. ४६:१२लेवी १:३
यहे. ४६:१२यहे ४५:१७
यहे. ४६:१२यहे ४६:१, २
यहे. ४६:१३निर्ग २९:३८; गण २८:३, ५
यहे. ४६:१७लेवी २५:१०
यहे. ४६:१९यहे ४२:९
यहे. ४६:१९यहे ४२:१
यहे. ४६:२०लेवी २:४, ५
यहे. ४६:२०यहे ४४:१९
यहे. ४६:२४२इत ३५:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल ४६:१-२४

यहेज्केल

४६ “सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मंदिराच्या आतल्या अंगणात, पूर्वेकडे जी प्रवेश-इमारत आहे+ तिचं दार सहा दिवस, म्हणजे कामांच्या दिवशी+ बंद राहावं.+ पण शब्बाथाच्या दिवशी आणि नवचंद्राच्या दिवशी मात्र ते उघडलं जावं. २ प्रधान बाहेरच्या बाजूने या इमारतीच्या द्वारमंडपातून आत येईल+ आणि इमारतीच्या दाराच्या चौकटीजवळ येऊन उभा राहील. मग याजक त्याच्याकडून होमार्पण आणि शांती-अर्पण घेऊन ते बलिदान करतील. नंतर प्रधान इमारतीच्या उंबरठ्यावर आपलं डोकं टेकवून नमन करेल आणि बाहेर जाईल. पण इमारतीचं दार संध्याकाळपर्यंत उघडंच ठेवावं. ३ देशातले लोकसुद्धा शब्बाथाच्या आणि नवचंद्राच्या दिवशी त्या इमारतीच्या प्रवेशाजवळ यहोवाला नमन करतील.+

४ प्रधान शब्बाथाच्या दिवशी यहोवासाठी जे होमार्पण देईल, त्यात दोष नसलेली सहा नर कोकरं आणि दोष नसलेला एक मेंढा असावा.+ ५ मेंढ्यासोबत त्याने एक एफा* माप अन्‍नार्पण द्यावं, आणि नर कोकरांसोबत तो जितकं अन्‍नार्पण देऊ शकतो तितकं त्याने द्यावं; प्रत्येक एफा मापासोबत त्याने एक हिन* माप तेलही द्यावं.+ ६ नवचंद्राच्या दिवशी तो जे अर्पण देईल त्यात कळपांतला एक गोऱ्‍हा,* सहा नर कोकरं आणि एक मेंढा असावा; या प्राण्यांमध्ये कोणताही दोष नसावा.+ ७ त्याने गोऱ्ह्यासोबत आणि मेंढ्यासोबत एकेक एफा अन्‍नार्पण द्यावं, आणि नर कोकरांसोबत आपल्या ऐपतीप्रमाणे अन्‍नार्पण द्यावं. तसंच, प्रत्येक एफा मापासोबत त्याने एक हिन माप तेलही द्यावं.

८ प्रधानाने प्रवेश-इमारतीच्या द्वारमंडपातून आत यावं आणि त्याच मार्गाने बाहेर जावं.+ ९ सणांच्या वेळी देशातले लोक उपासना करायला जेव्हा यहोवासमोर येतील,+ तेव्हा जे उत्तरेकडच्या प्रवेश-इमारतीतून आत आलेत,+ त्यांनी दक्षिणेकडच्या प्रवेश-इमारतीतून बाहेर जावं;+ आणि जे दक्षिणेकडच्या प्रवेश-इमारतीतून आत आलेत, त्यांनी उत्तरेकडच्या प्रवेश-इमारतीतून बाहेर जावं. कोणीही आत आलेल्या मार्गाने बाहेर जाऊ नये. लोकांनी त्यांच्या विरुद्ध दिशेला असलेल्या प्रवेश-इमारतीतूनच बाहेर जावं. १० लोक आत येतील, तेव्हा त्यांच्यातल्या प्रधानाने आत यावं, आणि लोक बाहेर जातील तेव्हा त्याने बाहेर जावं. ११ सणांच्या आणि उत्सवांच्या काळात त्याने गोऱ्ह्यासोबत आणि मेंढ्यासोबत एकेक एफा अन्‍नार्पण द्यावं; आणि नर कोकरांसोबत तो जितकं अन्‍नार्पण देऊ शकतो तितकं त्याने द्यावं. तसंच, प्रत्येक एफा मापासोबत त्याने एक हिन माप तेलही द्यावं.+

१२ प्रधानाने जर स्वेच्छेने यहोवासाठी होमार्पण+ किंवा शांती-अर्पण आणलं, तर पूर्वेकडे तोंड असलेल्या प्रवेश-इमारतीचं दार त्याच्यासाठी उघडलं जावं. आणि जसं तो शब्बाथाच्या दिवशी आपलं होमार्पण आणि शांती-अर्पण देतो, तसं या वेळीही तो देईल.+ मग तो बाहेर गेल्यावर प्रवेश-इमारतीचं दार बंद करावं.+

१३ यहोवासाठी होमार्पण द्यायला तू दोष नसलेलं एक वर्षाचं नर कोकरू दररोज पुरव.+ असं तू रोज सकाळी कर. १४ त्यासोबतच तू रोज सकाळी हे अन्‍नार्पण पुरव: एक एफा मापाचा सहावा भाग, आणि चांगल्या पिठावर शिंपडण्यासाठी एक हिन तेलाचा तिसरा भाग. हे अन्‍नार्पण नियमितपणे यहोवाला दिलं जावं. आणि हा नियम कायम पाळला जावा. १५ अशा प्रकारे, नियमितपणे होमार्पण द्यायला नर कोकरू, अन्‍नार्पण आणि तेल दररोज सकाळी पुरवलं जावं.’

१६ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘प्रधानाने जर आपल्या मुलांना भेट म्हणून जमिनी दिल्या, तर त्या जमिनींवर त्यांचीच मालकी राहील. ती त्यांना वारशाने मिळालेली मालमत्ता असेल. १७ पण जर प्रधानाने आपल्या एखाद्या सेवकाला आपल्या वारशातून काही जमीन भेट म्हणून दिली, तर सुटकेच्या वर्षापर्यंत ती जमीन त्या सेवकाची राहील.+ त्यानंतर मात्र ती जमीन पुन्हा प्रधानाची होईल. पण, त्याच्या मुलांना वारशात मिळालेली जमीन कायम त्यांचीच राहील. १८ प्रधानाने लोकांना त्यांच्या वारशाच्या जमिनींवरून हाकलून देऊ नये आणि त्यांच्या जमिनी बळकावू नयेत. त्याने स्वतःच्या मालमत्तेतून आपल्या मुलांना वारसा द्यावा; म्हणजे माझे लोक आपली मालमत्ता गमावणार नाहीत आणि त्यांची पांगापांग होणार नाही.’”

१९ मग तो माणूस मला प्रवेश-इमारतीच्या जवळ असलेल्या प्रवेशमार्गातून आत घेऊन आला;+ हा प्रवेशमार्ग उत्तरेकडे तोंड असलेल्या पवित्र खोल्यांकडे, म्हणजे याजकांच्या जेवणाच्या खोल्यांकडे जाणारा होता.+ तिथे पश्‍चिमेकडे मागच्या बाजूला मला एक जागा दिसली. २० तो मला म्हणाला: “या ठिकाणी याजक पापार्पणांच्या आणि दोषार्पणांच्या प्राण्यांचं मांस शिजवतील आणि अन्‍नार्पणं भाजतील;+ म्हणजे त्यांना बाहेरच्या अंगणात काहीही न्यावं लागणार नाही आणि लोक त्यामुळे पवित्र होणार नाहीत.”+

२१ त्यानंतर तो मला बाहेरच्या अंगणात घेऊन आला आणि त्याने मला अंगणाचे चारही कोपरे फिरून दाखवले. तेव्हा मला अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्‍यावर आणखी एकेक अंगण दिसलं. २२ बाहेरच्या अंगणाच्या चारही कोपऱ्‍यांवर एक छोटं अंगण होतं. त्या प्रत्येकाची लांबी ४० हात* आणि रुंदी ३० हात होती. चारही अंगणं एकाच मापाची होती. २३ त्या चारही अंगणांना आतल्या बाजूने सभोवती ओटे असून अर्पणांचं मांस शिजवायला त्या ओट्यांखाली चुली बांधल्या होत्या. २४ मग तो मला म्हणाला: “लोकांनी आणलेल्या बलिदानांचं मांस मंदिराचे सेवक या ठिकाणी शिजवतात.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा