वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया २१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यिर्मया रूपरेषा

      • यहोवा सिद्‌कीयाची विनंती अमान्य करतो (१-७)

      • लोकांना जीवन किंवा मरण निवडण्याची संधी (८-१४)

यिर्मया २१:१

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१८; १इत ३:१५; २इत ३६:९, १०
  • +यिर्म २९:२५; ३७:३; ५२:२४, २७
  • +यिर्म ३८:१

यिर्मया २१:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “नबुखद्रेस्सर,” एक वेगळं शब्दलेखन.

समासातील संदर्भ

  • +२रा २५:१; यिर्म ३२:२८; ३९:१
  • +१शमु ७:१०; २इत १४:११; यश ३७:३६, ३७

यिर्मया २१:४

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “त्या लोकांना.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३२:५

यिर्मया २१:५

समासातील संदर्भ

  • +यश ६३:१०; विल २:५
  • +यश ५:२५

यिर्मया २१:६

समासातील संदर्भ

  • +अनु २८:२१, २२; यहे ७:१५

यिर्मया २१:७

समासातील संदर्भ

  • +२रा २५:६, ७; यिर्म ३७:१७; ३९:५-७; ५२:९-११; यहे १७:२०
  • +अनु २८:४९, ५०; २इत ३६:१७

यिर्मया २१:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००७, पृ. ११

यिर्मया २१:९

समासातील संदर्भ

  • +यिर्म २७:१२, १३; ३८:२, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००२, पृ. १५-१६

यिर्मया २१:१०

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४४:११
  • +यिर्म ३८:३
  • +२इत ३६:१७, १९; यिर्म १७:२७; ३४:२; ३७:१०; ३९:८

यिर्मया २१:१२

समासातील संदर्भ

  • +यश १:१७; यिर्म २२:३; यहे २२:२९; मीख २:२
  • +यिर्म ७:५-७
  • +अनु ३२:२२; यश १:३१; यिर्म ७:२०

यिर्मया २१:१४

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५:९; ९:९
  • +२इत ३६:१७, १९; यिर्म ५२:१२, १३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यिर्म. २१:१२रा २४:१८; १इत ३:१५; २इत ३६:९, १०
यिर्म. २१:१यिर्म २९:२५; ३७:३; ५२:२४, २७
यिर्म. २१:१यिर्म ३८:१
यिर्म. २१:२२रा २५:१; यिर्म ३२:२८; ३९:१
यिर्म. २१:२१शमु ७:१०; २इत १४:११; यश ३७:३६, ३७
यिर्म. २१:४यिर्म ३२:५
यिर्म. २१:५यश ६३:१०; विल २:५
यिर्म. २१:५यश ५:२५
यिर्म. २१:६अनु २८:२१, २२; यहे ७:१५
यिर्म. २१:७२रा २५:६, ७; यिर्म ३७:१७; ३९:५-७; ५२:९-११; यहे १७:२०
यिर्म. २१:७अनु २८:४९, ५०; २इत ३६:१७
यिर्म. २१:९यिर्म २७:१२, १३; ३८:२, १७
यिर्म. २१:१०यिर्म ४४:११
यिर्म. २१:१०यिर्म ३८:३
यिर्म. २१:१०२इत ३६:१७, १९; यिर्म १७:२७; ३४:२; ३७:१०; ३९:८
यिर्म. २१:१२यश १:१७; यिर्म २२:३; यहे २२:२९; मीख २:२
यिर्म. २१:१२यिर्म ७:५-७
यिर्म. २१:१२अनु ३२:२२; यश १:३१; यिर्म ७:२०
यिर्म. २१:१४यिर्म ५:९; ९:९
यिर्म. २१:१४२इत ३६:१७, १९; यिर्म ५२:१२, १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यिर्मया २१:१-१४

यिर्मया

२१ यिर्मयाला यहोवाकडून एक संदेश मिळाला. त्याला हा संदेश तेव्हा मिळाला जेव्हा सिद्‌कीया+ राजाने मासेयाचा मुलगा सफन्या+ याजक आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर+ यांना यिर्मयाकडे असं विचारायला पाठवलं होतं: २ “बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर* आमच्याशी युद्ध करायला आलाय.+ म्हणून कृपा करून आमच्यासाठी यहोवाकडे मार्गदर्शन माग. कदाचित यहोवा आमच्यासाठी काहीतरी महान कार्य करेल, आणि बाबेलचा राजा आमच्यापासून निघून जाईल.”+

३ त्यावर यिर्मया त्यांना म्हणाला: “तुम्ही सिद्‌कीयाला जाऊन सांगा, ४ ‘इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो: “शहराच्या भिंतींबाहेर वेढा देणाऱ्‍या बाबेलच्या राजाशी आणि खास्दी लोकांशी लढण्यासाठी तुमच्या हातात जी शस्त्रं आहेत, ती मी तुमच्यावरच उलटवीन.+ आणि ती* शहराच्या मधोमध गोळा करीन. ५ मी स्वतः तुमच्याशी लढाई करीन.+ मी माझा शक्‍तिशाली हात तुमच्यावर उचलीन आणि रागाने, संतापाने आणि मोठ्या क्रोधाने तुमच्याशी लढीन.+ ६ मी या शहरातल्या सगळ्या माणसांना आणि प्राण्यांना मारून टाकीन. ते सगळे जीवघेण्या रोगांनी मरतील.”’+

७ ‘यहोवा म्हणतो “त्यानंतर मी यहूदाचा राजा सिद्‌कीया याला, त्याच्या सेवकांना आणि शहरातले जे लोक रोगराईपासून, तलवारीपासून व दुष्काळापासून वाचतील त्या सगळ्यांना त्यांच्या शत्रूंच्या, त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांच्या आणि बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हवाली करीन.+ तो त्यांना तलवारीने मारून टाकेल. तो कोणाचीही गय करणार नाही, किंवा कोणालाही दयामाया दाखवणार नाही.”’+

८ आणि या लोकांना तू असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “मी तुम्हाला जीवनाचा मार्ग किंवा मृत्यूचा मार्ग निवडायची संधी देतोय. ९ जे लोक या शहरात राहतील ते तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने मरतील. पण जो कोणी बाहेर पडेल आणि शहराला वेढा घातलेल्या खास्दी लोकांना शरण जाईल तो जिवंत राहील; तो आपला जीव वाचवेल.”’+

१० ‘“कारण, मी या शहराचं भलं नाही, तर त्याचा नाश करायचा पक्का निश्‍चय केलाय,”+ असं यहोवा म्हणतो. “हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती दिलं जाईल,+ आणि तो ते जाळून टाकेल.”+

११ हे यहूदाच्या राजाच्या घराण्या! यहोवाचा संदेश ऐक. १२ हे दावीदच्या घराण्यातल्या लोकांनो, यहोवा असं म्हणतो:

“दररोज खरेपणाने न्याय करा,

आणि जो लुबाडला जातोय, त्याला लुबाडणाऱ्‍याच्या हातून सोडवा.+

नाहीतर, तुमच्या दुष्ट कामांमुळे+ माझा क्रोध आगीसारखा तुमच्यावर भडकेल,+

आणि तो कोणीही शांत करू शकणार नाही.”’

१३ ‘हे खोऱ्‍यात राहणाऱ्‍या रहिवाशा! हे सपाट प्रदेशातल्या खडका!

बघ, मी तुझ्या विरोधात येतोय.’ असं यहोवा म्हणतो.

‘आणि तुम्ही जे असं म्हणता: “कोण आमच्या विरोधात येण्याची हिंमत करेल?

आणि कोण आमच्या वस्त्यांवर हल्ला करू शकेल?”

१४ त्या तुमच्याकडून मी तुमच्या कामांनुसार हिशोब घेईन,’+ असं यहोवा म्हणतो.

‘मी तुमच्या जंगलाला आग लावून टाकीन,

आणि त्यात तुमच्या आजूबाजूचं सगळं काही भस्म होऊन जाईल.’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा