यशया
५३ आमच्याकडून ऐकलेल्या गोष्टीवर* कोणी विश्वास ठेवला आहे?+
आणि यहोवाच्या हाताचं सामर्थ्य+ कोणाला प्रकट झालं आहे?+
२ तो त्याच्यासमोर* एका छोट्या फांदीसारखा वाढेल,+ कोरड्या जमिनीत तो मुळासारखा रुजेल.
त्याचं रूप दिमाखदार नाही किंवा वैभवशाली नाही;+
त्याला पाहून आकर्षित व्हावं असंही त्याचं रूप नाही.
३ त्याला तुच्छ समजण्यात आलं आणि लोकांनी त्याला टाळलं,+
दुःख काय असतं हे त्या माणसाला चांगलं समजत होतं, आणि आजारपण काय असतं हे त्याला चांगलं माहीत होतं.
त्याचा चेहरा जसा काय आमच्यापासून लपलेला होता.*
त्याला तुच्छ समजण्यात आलं, आणि आम्ही त्याची काहीच किंमत केली नाही.+
४ खरंच, त्याने आमचे आजार+ आणि आमची दुःखं स्वतःवर घेतली.+
आम्ही मात्र त्याला पिडलेला, देवाकडून शिक्षा झालेला आणि दुःख सोसलेला असं समजलं.
६ आम्ही सगळे मेंढरांसारखे भरकटलेले आहोत,+
प्रत्येक जण आपापल्या मार्गाने चालत आहे,
आणि आमच्या सगळ्यांच्या पापांचा भार यहोवाने त्याच्यावर लादला आहे.+
७ त्याच्यावर जुलूम करण्यात आले,+ पण त्याने ते सोसले.+
त्याने आपल्या तोंडातून एक शब्दही काढला नाही.
एखाद्या मेंढरासारखं त्याला कत्तल करण्यासाठी नेण्यात आलं.+
मेंढी जशी लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहते,
तसं तो गप्प राहिला; त्याने आपलं तोंड उघडलं नाही.+
८ त्याच्यावर जुलूम करण्यात आला आणि योग्य न्याय न करताच त्याला नेण्यात आलं;
कोणी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला का, की तो कोण आहे, कुठला आहे?*
पण तरी दुष्टांच्या कबरेत त्याची कबर नेमण्यात आली,*+
आणि मृत्यूनंतर त्याला श्रीमंताच्या कबरेत पुरण्यात आलं.+
१० पण, तो चिरडला जावा ही यहोवाची इच्छा होती, आणि म्हणून त्याने त्याला दुःख सोसू दिलं.
हे देवा, तू जर त्याचं जीवन दोषार्पण म्हणून दिलंस,+
आणि त्याच्याद्वारे यहोवाची इच्छा पूर्ण होईल.+
११ सगळं काही सोसल्यानंतर तो आपल्या कष्टाचं फळ पाहील आणि त्याला समाधान मिळेल.
माझा नीतिमान सेवक+ आपल्या ज्ञानाने
१२ म्हणून मी त्याला अनेकांसोबत वाटा देईन,
आणि तो शूरवीरांसोबत लूट वाटून घेईल.