यशया
५२ हे सीयोन,+ ऊठ! जागी हो! शक्तिशाली हो!+
हे पवित्र नगरी यरुशलेम! आपले सुंदर कपडे घाल!+
कारण सुंता* न झालेला किंवा अशुद्ध असा कोणीही आता तुझ्यात प्रवेश करणार नाही.+
२ हे यरुशलेम, ऊठ! आपली धूळ झटक आणि वर बस.
बंदिवासात असलेल्या सीयोनच्या मुली! आपल्या मानेवरचे साखळदंड मोकळे कर.+
३ यहोवा असं म्हणतो:
४ कारण सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो:
“आधी माझे लोक इजिप्तमध्ये गेले आणि तिथे विदेशी म्हणून राहिले.+
नंतर अश्शूरी लोकांनी विनाकारण त्यांचा छळ केला.”
५ म्हणून यहोवा म्हणतो: “तर आता मी काय करू?
कारण माझ्या लोकांना फुकट नेण्यात आलं.”
यहोवा म्हणतो: “त्यांच्यावर अधिकार गाजवणारे जयघोष करत आहेत,+
आणि माझ्या नावाचा सतत, दिवसभर अनादर केला जातोय.+
६ त्यामुळे माझ्या लोकांना माझ्या नावाची ओळख पटेल;+
आणि त्यामुळे त्या दिवशी त्यांना समजेल, की त्यांच्याशी बोलणारा मीच आहे.
हो! तो मीच आहे.”
७ पाहा! जो आनंदाचा संदेश घेऊन येतोय,+
आणि शांतीची घोषणा करतोय;+
जो चांगल्या गोष्टींविषयीचा आनंदाचा संदेश घेऊन येतोय,
जो तारणाची घोषणा करतोय,
आणि “तुझा देव राजा बनलाय!”+ असं जो सीयोनला म्हणतोय,
त्याचे पाय डोंगरावरून येताना किती सुंदर दिसत आहेत!
८ ऐक! तुझे पहारेकरी मोठ्याने ओरडत आहेत.
ते एकत्र मिळून आनंदाने ओरडत आहेत.
कारण यहोवा सीयोनला परत आणत असल्याचं ते स्पष्टपणे पाहतील.
९ हे यरुशलेमच्या उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणांनो! आनंदी व्हा, सगळे मिळून जयघोष करा.+
कारण यहोवाने आपल्या लोकांचं सांत्वन केलंय;+ त्याने यरुशलेमला सोडवलंय.+
१० यहोवाने सगळ्या राष्ट्रांसमोर आपल्या पवित्र हाताचं बळ दाखवलंय.+
पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत राहणारे सगळे लोक आमच्या देवाचा विजय* पाहतील.+
११ दूर व्हा! दूर व्हा! तिथून बाहेर निघा!+ कुठल्याही अशुद्ध गोष्टीला स्पर्श करू नका!+
यहोवाच्या मंदिरातली भांडी वाहून नेणाऱ्यांनो,+ तिच्यामधून बाहेर निघा!+ स्वतःला शुद्ध ठेवा!
१२ तुम्हाला घाईघाईने निघावं लागणार नाही,
किंवा तुम्हाला पळ काढावा लागणार नाही.
१३ पाहा! माझा सेवक+ सुज्ञतेने कार्य करेल.
त्याचा गौरव होईल,
त्याला प्रतिष्ठा आणि महानता मिळेल.+
१४ जसं त्याला पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले,
(कारण त्याचं स्वरूप कोणत्याही माणसापेक्षा जास्त बिघडलेलं होतं,
त्याचं सुंदर रूप मानवांपेक्षा जास्त बिघडलेलं होतं)
१५ तसं तो अनेक राष्ट्रांना आश्चर्यचकित करेल.+
त्याच्यासमोर राजे आपली तोंडं बंद ठेवतील.*+
कारण त्यांना कोणी सांगितल्या नाहीत, अशा गोष्टी ते पाहतील,
आणि त्यांनी ऐकल्या नाहीत अशा गोष्टींकडे ते लक्ष देतील.+