यशया
४ आणि त्या दिवशी सात स्त्रिया एका माणसाला धरून+ त्याला म्हणतील:
“आम्ही आमच्या अन्न-पाण्याची,
आणि कपड्यालत्त्याची सोय स्वतः करू;
फक्त आमची बदनामी* दूर होण्यासाठी,
आम्हाला तुझं नाव लावू दे.”+
२ त्या दिवशी, यहोवा जमिनीतून जे काही उगवेल ते सुंदर आणि डौलदार असेल. आणि इस्राएलमध्ये वाचलेल्या लोकांसाठी जमिनीचं पीक, ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट ठरेल.+ ३ सीयोनमध्ये आणि यरुशलेममध्ये जे उरतील, म्हणजे यरुशलेममधले असे सर्व ज्यांची नावं जिवंत राहण्यासाठी लिहिण्यात आली आहेत, त्या सर्वांना पवित्र म्हटलं जाईल.+
४ यहोवा सीयोनच्या मुलींची घाण* धुऊन टाकेल.+ त्याचा क्रोध यरुशलेमवर भडकेल आणि तो तिचा न्याय करेल. अशा प्रकारे, तो यरुशलेममधून रक्तपाताचे डाग पुसून टाकेल.+ ५ त्या वेळी, यहोवा संपूर्ण सीयोन डोंगराला आणि पवित्र मेळावे भरवण्याच्या तिथल्या जागांना, दिवसा धुराच्या ढगाने आणि रात्री आगीच्या ज्वालेने झाकून टाकेल;+ आणि संपूर्ण वैभवशाली ठिकाणावर सुरक्षा राहील. ६ दिवसा उन्हापासून सावली मिळावी,+ तसंच वादळापासून आणि पावसापासून आसरा व सुरक्षा मिळावी, म्हणून तिथे एक मंडप असेल.+