यशया
३० यहोवा म्हणतो: “या हट्टी मुलांचा धिक्कार असो!+
माझ्याकडून नसलेल्या योजना ते राबवतात,+
माझ्या इच्छेविरुद्ध ते मैत्रीचे संबंध जोडतात,*
आणि असं करून ते आपल्या पापात आणखी भर घालतात.
२ माझ्याशी सल्लामसलत न करता+ ते खाली इजिप्तला जातात!+
फारोच्या किल्ल्याचा आश्रय घेण्यासाठी,
इजिप्तच्या सावलीचा आसरा घेण्यासाठी ते जातात.
३ पण फारोच्या किल्ल्याचा आश्रय तुमच्यासाठी लज्जेचं कारण बनेल,
आणि इजिप्तच्या सावलीचा आसरा तुमच्यासाठी अपमानाचं कारण ठरेल.+
४ कारण त्याचे अधिकारी सोअनमध्ये+ आहेत,
आणि त्याचे दूत हानेसला पोहोचले आहेत.
५ ज्या लोकांपासून कोणताही फायदा नाही,
जे कोणाचीही मदत किंवा कोणाचंही भलं करू शकत नाहीत,
त्या इजिप्तच्या लोकांमुळे सगळ्यांना आपली मान शरमेने खाली घालावी लागेल;
त्यांच्या वाट्याला फक्त लज्जा आणि अपमानच येईल.”+
६ दक्षिणेच्या पशूविरुद्ध न्यायाचा संदेश:
ते दुःखाच्या आणि संकटाच्या देशातून,
डरकाळी फोडणाऱ्या सिंहाच्या देशातून,
विषारी सापाच्या आणि चपळ व जहरी सापाच्या* देशातून प्रवास करत,
आपली धनसंपत्ती गाढवांच्या पाठीवर,
आणि आपला खजिना उंटांच्या पाठीवर लादून नेतात.
पण लोकांना त्याचा काहीएक फायदा होणार नाही.
७ इजिप्तकडून मिळणारी मदत काहीच कामाची नाही.+
म्हणून मी तिला, ‘नुसतीच बसून असलेली राहाब,’+ असं नाव दिलं आहे.
८ “तर आता जा, आणि हे त्यांच्यासमोर एका पाटीवर लिही,
आणि एका पुस्तकात नमूद करून ठेव;+
म्हणजे येणाऱ्या काळासाठी
ही एक कायमची साक्ष ठरेल.+
१० ते द्रष्ट्यांना* म्हणतात, ‘दृष्टान्त पाहू नका,’
आणि संदेष्ट्यांना म्हणतात, ‘आमच्याविषयी खऱ्या भविष्यवाण्या सांगू नका.+
उलट आम्हाला गोडगोड गोष्टी सांगा; फसव्या भविष्यवाण्या सांगा.+
११ तुमचा मार्ग सोडून द्या; त्यापासून वळा.
इस्राएलच्या पवित्र देवाविषयी आम्हाला काहीएक ऐकायचं नाही.’”+
१२ त्यामुळे इस्राएलचा पवित्र देव म्हणतो:
“तुम्ही माझा संदेश ऐकत नाही,+
उलट खोट्या आणि फसव्या गोष्टींवर भरवसा ठेवता,
आणि त्यांवरच विसंबून राहता,+
१३ म्हणून तुमचा हा अपराध भगदाड पडलेल्या भिंतीसारखा होईल;
फुगून पडायला आलेल्या एका उंच भिंतीसारखा होईल.
तो अचानक, एका झटक्यात कोसळून पडेल.
१४ तो कुंभाराच्या एका मोठ्या मडक्यासारखा फोडला जाईल,
त्याचा असा चुराडा होईल, की आगीतून निखारा काढण्यासाठी,
किंवा डबक्यातून* पाणी काढण्यासाठी त्याचा एक तुकडाही उरणार नाही.”
१५ सर्वोच्च प्रभू, इस्राएलचा पवित्र देव यहोवा म्हणतो:
“माझ्याकडे परत या आणि शांत राहा, म्हणजे तुम्ही वाचाल;
तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्तिशाली व्हाल.”+
पण तुम्ही तसं करायला तयार नव्हता.+
१६ उलट तुम्ही म्हणाला: “नाही, आम्ही घोड्यांवर बसून पळून जाऊ!”
म्हणून आता तुम्ही नक्कीच पळाल.
तुम्ही असंही म्हणाला: “आम्ही वेगवान घोड्यांवर स्वारी करू!”+
म्हणून आता पाठलाग करणारेही वेगाने तुमचा पाठलाग करतील.+
१७ एकाच्या धमकावण्याने तुमचे हजार जण थरथर कापतील;+
आणि पाच लोकांच्या घाबरवण्याने तुम्ही पळून जाल.
शेवटी तुमच्यापैकी जे उरतील ते डोंगरावरच्या एकाकी ध्वजस्तंभासारखे,
निशाणी म्हणून टेकडीवर असलेल्या एकट्या झेंड्यासारखे होतील.+
१८ पण तुमच्यावर कृपा करण्यासाठी यहोवा धीराने वाट पाहत आहे,+
तुम्हाला दया दाखवण्यासाठी तो पाऊल उचलेल.+
कारण यहोवा हा न्यायी देव आहे.+
त्याची वाट पाहत राहणारे* सर्व आनंदी असतात.+
१९ लोक सीयोनमध्ये, यरुशलेममध्ये राहतील+ तेव्हा तू मुळीच शोक करणार नाहीस.+ तू मदतीसाठी हाक मारताच देव* तुझ्यावर कृपा करेल; तुझी हाक ऐकताच तो तुला उत्तर देईल.+ २० यहोवाने तुम्हाला खायला दुःखाची भाकर जरी दिली आणि प्यायला जुलमाचं पाणी जरी दिलं,+ तरी तुमचा महान शिक्षक तुमच्यापासून लपून राहणार नाही. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या महान शिक्षकाला पाहाल.+ २१ तुम्ही योग्य मार्ग सोडून जर उजवीकडे किंवा डावीकडे वळलात, तर मागून एक आवाज तुमच्या कानांवर पडेल,+ आणि तो म्हणेल: “योग्य मार्ग हा आहे.+ यावर चाला.”
२२ तुम्ही चांदीने मढवलेल्या तुमच्या कोरीव मूर्तींना आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या धातूच्या* मूर्तींना अशुद्ध कराल;+ मासिक पाळीचं कापड फेकून द्यावं तसं तुम्ही त्या फेकून द्याल आणि म्हणाल: “चालते व्हा!”*+ २३ मग, पेरणी केलेल्या तुमच्या जमिनीवर देव पाऊस पाडेल+ आणि जमिनीतून उत्तम व भरपूर पीक येईल.+ त्या दिवशी तुमची गुरंढोरं मोठमोठ्या कुरणांत चरतील.+ २४ शेतात राबणाऱ्या बैलांना आणि गाढवांना भुसा वेगळं केलेलं उत्तम प्रतीचं धान्य खायला मिळेल.* २५ मोठ्या कत्तलीच्या दिवशी बुरूज पडतील, तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर आणि प्रत्येक उंच टेकडीवर पाण्याचे झरे व ओढे वाहतील.+ २६ ज्या दिवशी यहोवा आपल्या लोकांच्या जखमांची मलमपट्टी करेल*+ आणि त्याने दिलेले घाव बरे करेल,+ त्या दिवशी पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशासारखा होईल; आणि सूर्याचा प्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा, म्हणजे सातपटीने प्रखर होईल.+
२७ पाहा! यहोवा* दुरून येत आहे!
तो जळजळीत क्रोधाने दाट ढगांसोबत येत आहे.
त्याचे ओठ संतापाने भरले आहेत,
आणि त्याची जीभ भस्म करणाऱ्या आगीसारखी आहे.+
२८ त्याचा श्वास* गळ्यापर्यंत येणाऱ्या पुराच्या पाण्यासारखा आहे,
तो राष्ट्रांना नाशाच्या चाळणीने चाळतो;
राष्ट्रा-राष्ट्रांतल्या लोकांच्या तोंडात तो बहकवणारा लगाम घालतो.+
२९ पण तुमचं गाणं हे सणाची तयारी करताना* रात्री गायल्या जाणाऱ्या गाण्यासारखं असेल,+
आणि तुमचं मन हे यहोवाच्या डोंगराकडे, इस्राएलच्या खडकाकडे+ बासरी वाजवत* जाणाऱ्या माणसासारखं आनंदी असेल.
३० यहोवा आपला प्रभावशाली आवाज ऐकवेल.+
त्याचा सामर्थ्यशाली हात+ भस्म करणाऱ्या आगीच्या ज्वालेसोबत,+
ढगफुटी,+ गडगडाट, वादळ आणि गारांचा वर्षाव+ यांच्यासोबत क्रोधाने त्याच्या शत्रूंवर पडेल.+
३२ यहोवा युद्धात अश्शूरवर आपला हात उगारेल.+
तो त्याच्यावर आपल्या शिक्षेच्या छडीने वार करेल;
छडीचा प्रत्येक वार होत असताना,
डफांचा आणि वीणांचा नाद होईल.+
देवाने रचलेली लाकडांची रास खोल आणि रुंद आहे,
आणि लाकडांची व आगीची काहीच कमी नाही.
यहोवाचा श्वास गंधकाच्या वर्षावासारखा तोफेत पेटवेल.