यशया
२१ समुद्राच्या ओसाड प्रदेशाविरुद्ध* न्यायाचा संदेश:+
दक्षिणेकडून येणाऱ्या वादळी वाऱ्यांसारखं मोठं संकट,
ओसाड प्रदेशातून, एका भयानक देशातून येत आहे.+
२ मला एक भयंकर दृष्टान्त दाखवण्यात आला:
विश्वासघात करणारा विश्वासघात करत आहे,
आणि विनाश करणारा विनाश करत आहे.
हे एलाम! जा, हल्ला कर. हे मेद! जाऊन वेढा घाल.+
तिच्यामुळे* झालेल्या सगळ्या दुःखांचा मी अंत करीन.+
३ हा दृष्टान्त पाहून माझ्या मनाला भयंकर वेदना होत आहेत;+
प्रसूतीच्या वेळी स्त्रीला वेदना होतात,
तशा वेदना मला होत आहेत.
मला इतकं दुःख झालं आहे, की मला काही ऐकू येत नाही;
मी इतका घाबरलो आहे, की मला काही दिसत नाही.
४ माझं हृदय जोरजोराने धडधडत आहे; भीतीने मी थरथर कापत आहे.
माझी आवडती वेळ, संध्याकाळ मला भयभीत करत आहे.
५ मेजवानीसाठी मेज तयार करा, खुर्च्या लावा!
खाणंपिणं करा!+
हे अधिकाऱ्यांनो, उठा! ढालीचा अभिषेक करा!*
६ कारण यहोवाने मला असं सांगितलं आहे:
“जा, एका पहारेकऱ्याला नेम. आणि त्याला जे काही दिसेल ते त्याने तुला सांगावं.”
७ तेव्हा त्याला दोन घोडे जोडलेला एक युद्धाचा रथ,
गाढवं जोडलेला एक युद्धाचा रथ,
आणि उंट जोडलेला एक युद्धाचा रथ दिसला.
तेव्हा तो काळजीपूर्वक, अगदी लक्ष देऊन पाहत राहिला.
८ मग सिंहासारखी गर्जना करून तो म्हणाला:
“हे यहोवा, मी दिवसभर टेहळणी बुरुजावर उभा राहतो,
आणि रात्रभर माझ्या चौकीवर तैनात असतो.+
९ पाहा! काय येत आहे ते पाहा:
दोन घोड्यांच्या युद्ध-रथावर माणसं स्वार होऊन येत आहेत!”+
मग तो मोठ्याने ओरडून म्हणाला:
“पडली! बाबेल पडली!+
तिच्या दैवतांच्या सगळ्या कोरीव मूर्तींचा चुराडा करण्यात आलाय!”+
१० माझ्या लोकांनो! धान्यासारखं भरडलेल्या माझ्या लोकांनो!
तुम्ही माझ्या खळ्यातलं धान्य* आहात.+
मी इस्राएलच्या देवाकडून, सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून जे ऐकलं, ते मी तुम्हाला सांगितलं आहे.
११ दुमा* याच्याविरुद्ध न्यायाचा संदेश:
सेईरमधून+ कोणीतरी मला हाक मारून विचारत आहे:
“पहारेकऱ्या, रात्र अजून किती बाकी आहे?
पहारेकऱ्या, पहाट व्हायला आणखी किती वेळ आहे?”
१२ त्यावर पहारेकरी म्हणतो:
“पहाट होत आहे आणि रात्रही होईल.
तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा.
परत या!”
१३ वाळवंटाविरुद्ध न्यायाचा संदेश:
ददानच्या काफिल्यांनो!+
तुम्ही ओसाड प्रदेशातल्या जंगलात रात्र काढाल.
१५ कारण ते तलवारीपासून, उपसलेल्या तलवारीपासून;
ताणलेल्या धनुष्यापासून आणि घनघोर युद्धापासून पळत आहेत.
१६ कारण यहोवा मला म्हणाला: “मजुराच्या वर्षांप्रमाणे* एका वर्षात केदारचं+ वैभव नाहीसं होईल. १७ केदारच्या योद्ध्यांमध्ये धनुष्य चालवणारे फार कमी उरतील, कारण इस्राएलचा देव यहोवा हे बोललाय.”