उपदेशक
५ तू खऱ्या देवाच्या मंदिरात जाशील, तेव्हा सांभाळून पाऊल ठेव;+ मूर्ख लोकांसारखं बलिदान द्यायला जाण्यापेक्षा,+ ऐकून घ्यायला तिथे जाणं+ कधीही चांगलं. कारण आपण जे करत आहोत ते वाईट आहे, याची त्यांना कल्पना नसते.
२ खऱ्या देवासमोर बोलण्याची घाई करू नकोस आणि त्याच्यासमोर विचार न करता बोलू नकोस.+ कारण खरा देव स्वर्गात आहे, पण तू पृथ्वीवर आहेस. म्हणून, जे काही बोलशील ते सांभाळून बोल.+ ३ मनात खूप चिंता असल्या की माणसाला स्वप्न पडतं+ आणि एखादा खूप जास्त बोलतो, तेव्हा त्याच्या वटवटीतून त्याचा मूर्खपणा दिसून येतो.+ ४ तू देवाला नवस करशील तेव्हा तो फेडायला उशीर करू नकोस,+ कारण मूर्खांमुळे देवाला आनंद होत नाही.+ तू केलेला नवस फेड.+ ५ नवस करून तो न फेडण्यापेक्षा, नवस न केलेलाच बरा.+ ६ तुझ्या तोंडामुळे तुझ्याकडून काही पाप होणार नाही याची काळजी घे+ आणि मी चुकून बोललो असं स्वर्गदूतासमोर* म्हणू नकोस.+ नाहीतर कदाचित, खऱ्या देवाला तुझ्या बोलण्याचा राग येईल आणि तो तुझ्या हाताचं कार्य नष्ट करेल.+ ७ कारण, जशी पुष्कळ चिंतांमुळे स्वप्नं पडतात,+ तसंच जास्त बोलल्यामुळे तोंडातून व्यर्थ गोष्टी निघतात. पण, तू खऱ्या देवाचं भय मान.+
८ तुझ्या प्रांतात गरिबावर अत्याचार होताना किंवा काही अन्याय किंवा दुष्टपणा घडताना तुला दिसला, तर याबद्दल आश्चर्य करू नकोस.+ कारण उच्च अधिकाऱ्यावर नजर ठेवणारा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा एक आहे; आणि त्यांच्यापेक्षा आणखी श्रेष्ठ असलेले इतरही आहेत.
९ तसंच, जमिनीतून मिळणारं उत्पन्न त्या सर्वांमध्ये वाटलं जातं; शेताच्या उत्पन्नातून राजाच्याही गरजा पूर्ण होतात.+
१० ज्याला चांदीची हाव असते, त्याचं चांदीने कधीच समाधान होत नाही आणि ज्याला धनसंपत्तीची हाव असते त्याचं धनसंपत्तीने कधीच समाधान होत नाही.+ हेही व्यर्थच.+
११ चांगल्या गोष्टी वाढल्या, की त्यांचा उपभोग घेणारेही वाढतात.+ त्यांच्या मालकाला त्यांच्याकडे पाहण्याशिवाय, दुसरा कोणता फायदा होतो?+
१२ सेवकाने कमी खाल्लं काय किंवा जास्त खाल्लं काय, त्याला चांगली झोप लागते. पण श्रीमंत माणसाकडे असलेली भरपूर संपत्ती त्याला झोपू देत नाही.
१३ सूर्याखाली मी एक फार दुःखाची गोष्ट* पाहिली: संपत्ती साठवून ठेवणारा आपल्या संपत्तीमुळे स्वतःवर दुःख ओढवून घेतो. १४ व्यवसाय बुडाल्यामुळे त्याची सगळी संपत्ती जाते. त्याला मुलगा होतो, तेव्हा आपल्या मुलाला वारशात देण्यासाठी त्याच्याजवळ काहीही नसतं.+
१५ माणूस जसा आपल्या आईच्या उदरातून नग्न येतो, तसाच तो परत जाईल.+ आयुष्यभर मेहनत करूनही, तो आपल्यासोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही.+
१६ हीसुद्धा फार दुःखाची गोष्ट* आहे: तो जसा आला, तसाच परत जाईल; मग, इतकी मेहनत करण्याचा आणि वाऱ्यामागे धावण्याचा काय उपयोग?+ १७ तो दररोज अंधारात बसून जेवतो आणि निराशा, आजारपण, राग यांनी ग्रासलेला असतो.+
१८ पण मला जे चांगलं आणि योग्य असल्याचं दिसून आलं ते हे: माणसाने खावं-प्यावं आणि आपल्या मेहनतीमुळे आनंद करावा.+ कारण खऱ्या देवाने त्याला दिलेल्या थोड्याशा आयुष्यात तो सूर्याखाली जी मेहनत करतो, त्याचं हे प्रतिफळ* आहे.+ १९ खरा देव जेव्हा एखाद्याला धनसंपत्तीसोबतच+ तिचा आनंद उपभोगण्याचं सामर्थ्यही देतो, तेव्हा त्याने हे प्रतिफळ* स्वीकारावं आणि आपल्या मेहनतीमुळे आनंद करावा. ही देवाची देणगी आहे.+ २० आपल्या आयुष्याचे दिवस कसे निघून गेले हे त्याला कळणारसुद्धा नाही, कारण खरा देव त्याला मनापासून आनंद करण्यात गुंतवून ठेवतो.+